Pik Nuksan Bharpai पीक नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना मिळणार 365 कोटी रुपये

अतिवृष्टीमुळे जुलै महिन्यात वाशिम सह राज्यातील शेती पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. भरपाईपोटी राज्यातील शेतकऱ्यांना आता 365 कोटी मिळणार असून, यामध्ये वाशीम जिल्ह्याच्या वाट्यावर केवळ 1.53 कोटी आलेले आहेत.

Pik Nuksan Bharpai

राज्यात जुलै 2021 मध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले असून महसूल प्रशासनाने पंचनामे करीत नुकसानभरपाई संदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठवलेले आहेत आता नुकसान भरपाईपोटी राज्यातील शेतकऱ्यांकरिता 365 कोटी 67 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

यामध्ये वाशिम जिल्ह्याला 1 कोटी 53 लाख रुपये मिळणार आहेत तर अमरावती विभागाच्या वाट्यावर 118 कोटी 41 लाख रुपये आले असून सर्वाधिक 84 कोटी 26 लाख रुपये अकोला जिल्ह्याला मिळणार आहेत.

निधी खर्च करताना पारदर्शकता राहावी म्हणून मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थीची यादी व मदतीचा तपशील हा जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा अशा प्रकारच्या सूचना महसूल व वन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत.

Leave a Comment