अखेर पिक विमा pik vima 2021 मंजूर झाला असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता तर असे शेतकरी पीक विम्याची वाट बघून होते परंतु आता पिक विमा कंपन्यांना करुणा च्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा करावाच लागला.
अखेर पिक विमा Pik Vima मंजुर
गतवर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता; त्यांंना अद्यापही पीक विम्याची प्रतीक्षा होती. यंदाच्या खरीप हंगामाला सुरुवात होत असताना पीक विम्याची अधिकृत माहिती पीक विमा कंपन्यांकडून कृषी विभागाला देण्यात आली नव्हती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले असता पीक विमा कंपनीने तातडीने कृषी विभागाला माहिती सादर करून अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अकोला जिल्ह्याला पीक विम्यापोटी ७७.९० कोटी रुपये मिळाले आहेत.खरीप हंगामातील पिकांचा गेल्या अनेक वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती तसेच हवामान खात्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
उत्पादनात घट होऊन लागवडीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. यासाठी हजारो शेतकऱ्यांनी मूग, उडीद, सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर यासह इतर पिकांचा विमा काढला असता विमा कंपनीने शेतकरी, राज्य सरकार व केंद्र सरकार मिळून १३६ कोटी रुपये जिल्हाभरातून जमा केले. जिल्ह्याला पीक विम्यापोटी केवळ ७७.९० कोटी रुपयेच दिले आहेत.
सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान; परंतु एकाच मंडळाचा पीक विमा मंजूर
गतवर्षीच्या खरीप हंगामात सर्वात जास्त सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. असे असताना जिल्ह्यातील केवळ तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण या एका मंडळातील शेतकऱ्यांनाच सोयाबीनचा पीक विमा मंजूर झाला असून, इतरांना फटका बसला आहे. तर एक मंडळ वगळता ५१ मंडळातील शेतकऱ्यांना मूग पिकाचा विमा मंजूर झाला आहेत. जिल्ह्यात एकूण ५२ मंडळे आहेत.
——————————-
अशी मिळाली पीक विम्याची Pik Vaima मदत
पीक मंडळ मदत
उडीद ४१ ९ कोटी २३ लाख ४९ हजार रुपये
कपाशी २१ ४ कोटी ९ लाख ९६ हजार रुपये
मूग ५१ ४० कोटी ६९ लाख २९ हजार रुपये
तूर ३७ १९ कोटी ४७ लाख ८३ हजार रुपये
ज्वारी ३६ २ कोटी २० लाख ५९ हजार रुपये
सोयाबीन १२ कोटी १९ लाख ४९ हजार रुपये