PM Kisan Samman Nidhi Yojna पीएम किसान सम्मान निधि योजनाच्या नवव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यास सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांना त्यांची स्थिती सुधारता यावी याकरिता केंद्र सरकार ही योजना चालवत आहे या योजनेच्या माध्यमातून दोन हेक्टरपर्यंत लागवड योग्य जमीन असलेल्या सीमांत आणि छोट्या शेतकऱ्यांना सरकार दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत करत असते परंतु असे काहि शेतकरी आहेत की ज्यांच्या बद्दल सरकारने स्पष्ट केलेले आहे की त्यांना या योजनेचा आता लाभ मिळणार नाही
PM Kisan Samman Nidhi Yojna
Table of Contents
सरकारने एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर या बाबतीमध्ये सूचना जारी केलेल्या आहेत आपण त्या सूचना किंवा एम किसान योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही अशा शेतकऱ्यांबद्दल जाणून घेऊया.
आयसीआयसीआय बँक करंट अकाऊंट ओपेन ऑनलाइन
कोणत्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही?
* सर्व संस्थात्मक जमीन धारक असलेले शेतकरी
* डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, अभियंते आणि आर्किटेक्ट यांसारखे व्यावसायिक नोंदणीकृत आहेत आणि व्यावसायिक संस्थांकडे सराव करतात अशा व्यक्तींनाही पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही.
* मागच्या वर्षात तनी आयकर भरलेला आहे अशा व्यक्तींना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे.
* जे निवृत्त वेतनधारक आहेत आणि त्यांचे मासिक वेतन दहा हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक आहे त्यांना या योजनेची रक्कम मिळणार नाही.
* चतुर्थ श्रेणी आणि ड गटातील कर्मचाऱ्यांना तसेच मल्टिटास्किंग कर्मचारी यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळेल.
* केंद्र किंवा राज्य सरकारची मंत्रालय कार्यालय किंवा विभाग असतील आणि त्यांच्या क्षेत्रीय युनिटमध्ये केंद्रीय किंवा राज्य सार्वजनिक उपक्रम व संलग्न कार्यालय असतील किंवा स्वायत्त संस्था आणि सरकार अंतर्गत स्थानिक संस्थांचे नियमित कर्मचारी सेवेत असलेले किंवा सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.