PM Kisan Status 2022 11th Kist Beneficiary Status, Date पी एम किसान योजनेचा अकरावा हप्ता 31 मे 2022 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला, परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही एम किसान योजनेचा अकरावा हप्ता जमा झालेला नाही अशा शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचा हप्ता 2 हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा झाले किंवा नाही हे कसे तपासायचे? खालील प्रमाणे जाणून घ्या.
पी एम किसान योजनेचा हप्ता कसा पाहायचा?
1- प्रथम आपल्याला पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला https://pmkisan.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल
2- त्यानंतर मुख्य पृष्ठाच्या डाव्या बाजूला “लाभार्थी यादी” यावर क्लिक करावे लागेल.
3- यानंतर आपला आधार क्रमांक आणि बँक खात्याचा नंबर टाकावा लागेल.
4- त्यानंतर “डेटा मिळवा” या बटणावर क्लिक करा.
आपल्यासमोर माहिती उपलब्ध होईल आणि आपल्याला कळेल की आपल्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा 11वा हप्ता 2 हजार रुपये जमा झाले आहेत किंवा नाही समजेल आणि त्याच बरोबर आपली चूक कुठे झाली हे सुद्धा कळेल.