PM Kisan Yojana 13 Installment 2023 Maharashtra | पी एम किसान योजना १३ वा हप्ता 2023 .

पी एम किसान योजना  (PM Kisan Yojana 13 Installment 2023 Maharashtra ) ही शेतकरी बांधवांसाठी दरवर्षी राबविल्या जाते यामध्ये मागील वर्षीचा तेराव्या ची तारीख ही आलेली आहे पुढे आपण पाहू ही तारीख काय आहे तेराव्या हप्त्यांमध्ये दोन हजार रुपये शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये मिळणार होते. यामध्ये आता शासनाकडून तारीख जाहीर करण्यात आलेली आहे चला तर पाहूया पुढे माहिती. या योजनेमधून दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये असे अनुदान दिले जाते यामधून चार महिन्याला प्रति दोन हजार रुपये अशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शासनाकडून ट्रान्सफर केल्या जातात. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते त्यातून ते शेताला लागणारा अधिक खर्च किंवा स्वतःसाठी हे पैसे वापरू शकतात. आता लवकरच पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे. शासनाकडून आलेल्या माहितीनुसार पी एम किसान योजनेचा (पी एम किसान योजना १३ वा हप्ता 2023 .)तेरावा हप्ता हा मार्च 2023 आधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे . यादरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये सरकारकडून ट्रान्सफर केले जातील आणि तेराव्या हप्त्याचे पैसे हे 17 फेब्रुवारी पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची चान्सेस आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला ई केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे पी एम किसान योजना याचा लाभ घेण्यासाठी केवायसी करणे शेतकऱ्यांना आवश्यक आहे जे शेतकरी बांधव ही केवायसी करणार नाहीत अशा शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळणार नाही . इ केवायसी शेतकरी बांधव ते घरी स्वतःच्या मोबाईलवर सुद्धा करू शकतात हे करण्याची पद्धत एकदम सोपी आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांना हे करता येत नाही त्यांनी जवळच्या ई सेवा केंद्राला भेट देऊन ही योजना करता येते.

Read  Vilasrao Deshmukh Abhay Yojana Mahavitaran | महावितरणची विलासराव देशमुख अभय योजना

 

आमच्याशी जुळण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment