Police recruitment Maharashtra2022 – महाराष्ट्र 2019 ची पोलीस भरती प्रक्रिया पुन्हा नव्याने 7,231 पदांची भरती करण्याची गृहमंत्र्यांचे आदेश सूत्रांची माहिती आहेपोलिस दलामध्ये नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांना येत्या काही दिवसांत नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. महाराष्ट्र पोलिस दलामध्ये (Maharashtra Police Force) 7,200 पदांसाठी भरती लवकरच होणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip walse Patil) यांनी यासंदर्भात माहिती दिली.
मागील पाच वर्षांपासून गृह खात्यात कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू होती. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी मंत्रीमंडळात प्रस्ताव मांडला होता. त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
2019 मध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. 2019 च्या भरती प्रक्रियेतील 5297 उमेदवाराच्या मूलभूत प्रशिक्षणाला 7 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. जुनी पोलीस भरती पूर्ण झाल्याने आता 7221 पदांसाठी पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली.
राज्यातील पोलीस दलात 7231 नव्याने कर्मचारी भरती केले जाणार आहेत. यासाठी उमेदवारांची अंतिम यादी पुढील महिन्यात जाहीर करणार असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं. तर, भरतीची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात असल्याचं ते म्हणाले.
तसेच 50 हजार पदांची भारती करण्यासंदर्भात माहिती देणार असून त्यासंदर्भात निर्णय घेऊ असे देखील म्हटले.
हे नक्की वाचा: अद्भुतमराठी व आई मराठी
ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.