Ramai Awas Yojana | रमाई आवास योजना 2021

Ramai Awas Yojana रमाई आवास योजनेअंतर्गत सन 2021 – 22 करता राज्यात मिळणार 1 लाख 36 हजार घरकुल,  याकरता मंजुरी सुद्धा मिळालेली आहे. बघूया तुमच्या विभागाला किती घरकुल मिळणार.

महाआवास अभियान 2 अंतर्गत सर्वांना चांगली घर, पक्के घर हा शासनाचा मुख्य उद्देश आहे. 5 लाखापर्यंत घरकुल देण्याचा मानस सरकारचा आहे. अनुसूचित जाती /नवबौद्ध बांधवाकरता रमाई आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागा करीता 1लाख 13 हजार, तर शहरी भागा करता 22 हजार ही घरकुल देण्याकरता 2021-22 करता मंजुरी देण्यात आलेली आहे.

अमरावती विभागात ग्रामीणच्या 21 हजार 978 तर शहरी भागातील 3210 घरकुलांना मंजुरी

लातूर विभागात ग्रामीणच्या 24 हजार 274 तर शहरी भागाच्या 2770 घरकुलांची मंजुरी आहे.

Read  नवीन आधार सेवा केंद्र करता अर्ज सुरू New Aadhar Center Registration 2021

मुंबई विभागात ग्रामीण च् 1942 तर शहरी भागातील 86 घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे.

नाशिक विभागात ग्रामीण च्या 14864 तर शहरी भागातील 3046 घरकुलांना मंजुरी.

मराठवाड्यात औरंगाबाद विभागात ग्रामीण च्या 30 हजार 116 व शहरी भागाच्या 7565 घरकुलांना मंजुरी.

नागपूर विभागात ग्रामीण च्या अकरा हजार 677 तर शहरी विभागाच्या 2987 घरकुलांना मंजुरी.

पुणे विभागात ग्रामीणच्या आज 8720 तर शहरी भागातील 5792 घरकुलांना मंजुरी.

 

 

 

Leave a Comment