महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सरकारने घोषणा केलेली आहे की 2023 डिसेंबर या महिन्यापर्यंत नागरिकांना राशनचा पुरवठा हा फ्री मध्ये होणार आहे तरी यावर अशी ही घोषणा आली आहे की कोणाचे मोफत राशन बंद होणार चला तर खाली पाहूया. ही बातमी रेशन कार्डधारकांसाठी खूप महत्त्वाची आहे जे लोक चुकीच्या मार्गाने रेशन मोफत योजना या योजनेचा लाभ घेतात अशांचे रेशन आता बंद होणार आहे. आपल्या देशातील 80 कोटीहून जास्ती त जास्त लोक रेशनचा लाभ घेतात पण यातील खूप लोक हे अपात्र आहेत. त्यातून एक गोष्ट म्हणजे बनावट रेशन कार्ड यानेही या योजनेमध्ये भेसळ होत आहे. ज्या लोकांकडे प्रधानमंत्री गरीब कल्याण अण्णा योजनेअंतर्गत शिधापत्रिका नाही अशांना रेशन मोफत मिळणार होते पण राशन योजना सुरक्षा कायद्याअंतर्गत आता फक्त गरीब शिधापत्रिका वाल्यांनाच गहू आणि तांदूळ मोफत दिले जाणार आहे.