Ration Card – कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या आर्थिक साहाय्यांतर्गत रेशनवर मोफत धान्याचा पुरवठा केला जातो.
अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट असणाऱ्या अंत्योदय योजनेतील व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना गहू व तांदूळ विनाशुल्क मिळते. हे धान्य आता नोव्हेंबरअखेरपर्यंत मोफत मिळेल. त्यानंतर मात्र विकत घ्यावे लागणार आहे.
आता केवळ नियमित धान्य मिळणार
नोव्हेंबरअखेरपर्यंत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना मोफत धान्य पुरवठा होईल. त्यानंतर मात्र योजना बंद होणार आहे. लाभार्थ्यांना त्यासाठी पैसे द्यावे लागतील. अंत्योदय प्रवर्गातील लाभार्थी कुटुंबांना दोन रुपये किलो दराने गहू आणि तीन रुपये किलो दराने तांदूळ घ्यावा लागेल.
काळात रोजगार गमावलेल्या कुटुंबांचा चरितार्थ या धान्यातून झाला. विशेषत: हातावर पोट असणाऱ्यांची भूक धान्याने भागविली.
कोविडकाळात मोफत धान्याने तारले
कोरोना व लॉकडाऊनमुळे कंपनीचे कामकाज बंद झाले. सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. नोकरी गेल्याने पोटाचा प्रश्न निर्माण झाला होता. अनेकांचा रोजगार गेला. रेशनवरील मोफत धान्याने कसाबसा चरितार्थ चालविला. आता रोजगार पुन्हा सुरू झाल्याने मोफत धान्याची गरज राहिलेली नाही. – सिकंदर शिकलगार, लाभार्थी
गहू आणि तांदूळ मोफत मिळाले. सरकारने रेशनवर डाळी, तेल व साखरही अल्पदरात उपलब्ध करण्याची गरज होती. धान्य मिळाले, तरी अन्य गरजांसाठी धडपड करावी लागली. तरीही रेशनवरील मोफत धान्याने मोठा दिलासा दिला.
वृत्त्त – लोकमत
I am poor condition