Crop Loan Maharashtra List 2022 | Regular Karj Mafi List 2022 | नियमित कर्ज माफी योजना यादी

Regular Karj Mafi List 2022 – , नियमित कर्जदार अनुदान यादी जाहीर करण्यात आलेली आहे तुमचं नाव यादीमध्ये आहे का हे बघावे लागेल आणि नसेल तर का नाही हे सुद्धा आपण बघणार आहोत पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणारे जे शेतकरी आहेत त्यांना दिल्या जाणाऱ्या 50 हजार प्रोत्साहन पर अनुदानाच्या लाभार्थींची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे मात्र यामधील काही गावे वगळले गेलेले आहेत ती का हे आपण जाणून घेऊया.

Crop Loan Maharashtra List 2022

वर्ष 2017 ते 2020 या कालावधीमध्ये पीक कर्जाची नियमित परतफेड करणारे जे शेतकरी आहेत त्यांना 50000 पर्यंत प्रोत्साहन पर लाभ देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेला आहे जे पात्र शेतकरी आहेत त्यांची यादी जाहीर करण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली.

Read  Bank Of Maharashtra Mega Job 2022 | बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मेघा भरती

ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे त्यांची यादी संबंधित बँक शाखा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी ठिकाणी तेथील सूचनाफलकांवर यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

ज्या शेतकऱ्यांची यादीमध्ये नाव आहे, त्यांनी आपले कर्ज खाते पासबुक, बचत खाते पासबुक तसेच आधार कार्ड घेऊन जवळच्या “आपले सरकार सेवा केंद्र” किंवा बँकेच्या शाखेमध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यायचे आहे. त्यानंतर थेट संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट प्रोत्साहन पर लाभाची रक्कम वर्ग करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

नियमित कर्ज माफी योजना यादी

बँक कर्ज खात्यास आधार क्रमांक उपलब्ध करून न दिलेल्या शेतकऱ्यांची नावे पूर्तता झाल्यानंतर यादीमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत आणि ज्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागू असेल अशा गावातील पात्र शेतकऱ्यांची नावे रेगुलर कर्जदार अनुदान यादी मध्ये आचारसंहिता संपल्यानंतर समाविष्ट करण्यात येणार आहेत असेही सहकार मंत्री श्री सावे यांनी सांगितले आहे.

Read  Mahalaxmi Madir Kolhapur Live Darshan महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर लाईव्ह दर्शन

आमच्या बतमी मराठी ब्लॉगला अवश्य भेट द्या

Leave a Comment