Sakhrechya Utpannaat Ghat | साखरेच्या उत्पन्नात यावर्षी 20 ते 25 लाख टन घट शेतकऱ्याच्या आर्थिक नुकसान.

Sakhrechya Utpannaat Ghat | साखरेच्या उत्पन्नात यावर्षी 20 ते 25 लाख टन घट शेतकऱ्याच्या आर्थिक नुकसान. 

गेले काही दिवसापासून सातत्याने होणाऱ्या वातावरण बदलामुळे शेतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.  त्यामुळे या वर्षी सातत्याने बदलणार  वातावरण आणि लांबलेला पाऊस यामुळे अनेक पिकावर परिणाम झाला असून अनेक पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे.  त्यापैकी एक पीक म्हणजे ऊस.  यावर्षी बदलते  वातावरण आणि पाऊस हा जास्त काळ झाल्याने उसाची वाट पूर्ण होऊ शकली नाही.  त्यामुळे उसाच्या उत्पादनात घट झाली आहे.  याचा परिणाम साखरेच्या उत्पादनावर शुगर प्रोडक्शन होणार आहे. यावर्षी भारतामध्ये 20 ते 25 लाख टन साखरेच्या उत्पादनात घट होणार आहे. प्रती हेक्टर 15 ते 20 टन उसाचे उत्पादन कमी झाल्याने हा वाईट परिणाम झाला आहे.  त्यामुळे साखरेच्या निर्यातीला केंद्र सरकारने बंधने लावली आहेत. गेल्या वर्षी इतकीच या वर्षी उसाची लागवड करण्यात आली होती. परंतु यावर्षी साखरेचे उत्पादनात जास्त प्रमाणात घट होणार आहे.  निसर्ग बदललाय सतत पावसामुळे आणि हवामानातील  बदल यामुळे ऊस उत्पादनात जास्त प्रमाणात घट झाली आहे.  त्यामुळे हेक्टर 15 ते 20 टन साखर उत्पादन घटला आहे. व याचा परिणाम साखर 333 लाख टन किंवा त्यापेक्षाही कमी प्रमाणात उत्पादन होऊ शकते गेल्या काही वर्षी हेच उत्पादन 357 लाख टन इतकं होतं साखर उत्पादन जरी कमी झालं तरी देशातील साखरेच्या दरावर परिणाम होणार नाही. उसनेरतीला मोठी मागणी आहे.  परंतु केंद्र सरकारने साखर निर्यातीवर बंधने लावल्यामुळे आपली साखर जास्त प्रमाणात निर्यात करता येणार नाही.  देशात 275 लाख टन साखरेचा वापर इथेनॉल कडे 45 लाख टन साखरेचा वापर असा गृहीत धरला तर आपल्या देशात साखर मुबलक आहे.  ऊस उत्पादन कमी होण्याचे मुख्य कारण ऊस उत्पादन कमी होण्याचे मुख्य कारण हे आहे की निसर्गाच्या बदलत्या वातावरणामुळे तसेच सतत पाऊस चालू असल्यामुळे शेतात पाणी साचून राहिले परिणामी उसाची वाढ कमी झाली व त्यामुळे एकरी उत्पादन कमी होत आहे व पहिल्यांदा असं झाल्याचं संशोधन सुरू आहे.
                                                                                                                                     आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील साखरेवर परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचे भाव मागील तीन महिन्यापासून खूप चढलेल्या होत्या इतका भाव साखरेला कधीच मिळाला नव्हता मार्चपासून ब्राझीलचे उत्पादन सुरू होईल ते उत्पादन गृहीत धरल्यास जागतिक स्तरावर साखरेचा तुटवडा नाही हे स्पष्ट होतं त्यामुळे साखरेचे भाव फार काही वाढणार नाही. Sakhrechya Utpannaat Ghat | साखरेच्या उत्पन्नात यावर्षी वीस ते पंचवीस लाख टन घट शेतकऱ्याच्या आर्थिक नुकसान. 

Read  Kadaba Kutti Yantra Anudan Yojana | कडबा कुट्टी यंत्र अनुदान 100% योजना. |

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x