Saur Fancing Yojana Maharashtra | वन्य प्राण्यापासून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी मिळणार अनुदान.
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वन्य प्राण्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी सरकारने कोणत्या कोणत्या योजनांना प्रारंभ केला आहे. योजनेचे संपूर्ण माहिती पाहणार आहोत. शेती करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते गेल्या काही दिवसांमध्ये वन्य प्राण्यांच्या संख्येत फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कारण जंगले तोडल्यामुळे जंगले छोटी झाली आहेत त्यामुळे वन्य प्राण्यांना मनासारखे राहता येत नाही. त्यामुळे ते मानवी वस्तीत घुसून नुकसान करायला लागले आहेत. या वन्य प्राण्यांचा सर्वाधिक फटका बसतो, तो शेतकऱ्यांच्या पिकांना अनेकदा वन्यप्राणी शेतात घुसून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. पिकाचे नुकसान टाळण्यासाठी अनेक शेतकरी रात्रंदिवस पहारा देत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची फजिती देखील होते त्यांच्या त्यांच्या प्रकृतीवर सुद्धा याचा वाईट परिणाम होत आहे. तसेच शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचाही धोका मोठ्या प्रमाणात असतो वन्य प्राण्यांमुळे शेतीचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने खास योजना सुरू केली आहे. वन्य प्राण्यांमुळे पिकाचे होणारी नुकसान टाळण्यासाठी सौर ऊर्जा कुंपण उभारण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या योजनेत सरकारने मान्यता दिली आहे. जनविकास योजनेअंतर्गत लाभार्थ्याला सौर ऊर्जा कुंपणाच्या किमतीच्या 75 टक्के किंवा पंधरा हजार रुपये यापैकी जी कमी असेल त्या रकमेच्या अनुदान मिळेल सौर ऊर्जा साहित्याच्या किमतीच्या अनुषंगाने बाकीचे 25% रक्कम लाभार्थ्याला खर्च करावी लागेल.
या योजने करिता आवश्यक कागदपत्रे :-
विहित नमुन्यातील.
अर्ज सातबारा व 8 – अ उतारा.
जातीचा दाखला.
विहित नमुन्यातील अर्ज व्यवस्थितपणे भरून आवश्यक कागदपत्रे जोडून सर्वांग विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे सादर करावा अर्ज चा नमुना तुम्हाला कृषी विभाग पंचायत समितीकडे मिळून जाईल.