महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेळीपालन अनुदान दिल्या जाते. त्या अनुदानाच्या मर्यादेमध्ये आता मोठी वाढ करण्यात आलेली आहे. त्या संबंधी शासन निर्णय 9 जुलै 2021 रोजी निर्णय झालेला आहे.
निवड झालेल्या प्रत्येक लाभार्थीला वाटप करणे प्रस्तावित असलेल्या शेळी गटाचा एकूण अपेक्षित खर्च शेळी गट व शेळ्यांसाठी वाडा रुपये 231400 इतका आहे
गटाची स्थापना करताना सुरुवातीला लाभार्थ्यास 100 टक्के निधी स्वहिस्सा किंवा वित्तीय संस्थांचे कर्ज याद्वारे उभा करायचा आहे. सर्व प्रवर्गासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के तथापि प्रति गट कमाल मर्यादा रुपये 115700 रुपये याप्रमाणे अनुदान देय राहील.