नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना POCRA Nanasaheb Deshmukh Krushi Snajeevani Yojana 2022

नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना POCRA Nanasaheb Deshmukh Krushi Snajeevani Yojana

Table of Contents

  • जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणारी सर्वात मोठी योजना. नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना POCRA Nanasaheb Deshmukh Krushi Snajeevani Yojana शेतकऱ्यांसाठी शासनाकडून राबविण्यात येणारी सर्वात मोठी योजना सर्वधिक सबसिडी व त्वरित लाभ असे या योजनेचे वैशिष्ट्य . योजनेचे स्वरुप खालील प्रमाणे.
    शासनाने मराठवाडा विदर्भ या महाराष्ट्रातील दोन विभागांमध्ये सदर योजना राबविण्यास सुरुवात केलेली आहे सदर प्रकल्पास दिनांक ,७/७/२०१७ रोजी शासन निर्णय अंतर्गत मंजुरी मिळाली आहे जागतिक बॅंकेच्या अर्थसाहाय्याने सुमारे ४००० कोटिक अंदाजीत निधी उपलब्ध असणार असून नानासाहेब देशमुख कृषी योजना अंतर्गत निवडलेल्या गावात सदर योजना ही सहा वर्षे पूर्ण स्वरुपात राबविण्यात येईल.
  • नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेची अंमलबजावणी जिल्हास्तर उपविभाग तर व गाव समूह कशी होणार आहे यामध्ये विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा ,वाशीम ,यवतमाळ, वर्धा ,जळगाव तसेच मराठवाडा विभागात औरंगाबाद ,जालना, उस्मानाबाद, लातूर ,नांदेड ,परभणी ,बीड व हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.

नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत अर्ज कोणते शेतकरी करू शकतात त्याबद्दल पात्रता आणि निकष खालीलप्रमाणे -POCRA Nanasaheb Deshmukh Krushi Snajeevani Yojana

  • अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी असायला पाहिजे.
  • शेतकरी मध्यम किंवा अल्पभूधारक असेल तर यामध्ये अर्ज करू शकतात.
  • अर्जासोबत शेतकऱ्याचे आधार कार्ड निवासी प्रमाणपत्र ओळखपत्र ,मतदान कार्ड, मोबाइल नंबर व पासपोर्ट साईज फोटो इत्यादी आवश्यक बाबी द्याव्या लागतील.
  • शेतकरी या योजने अंतर्गत येणारे विविध लाभ सहा वर्षे म्हणजे नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना सदर गावांमध्ये असेपर्यंत घेऊ शकतो.
  • नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यास शासनाने ठरवून दिलेल्या निकषांना शेतकऱ्यास पूर्ण करणे अनिवार्य आहे.
  •  पात्र शेतकरी आपला अर्ज शासनाच्या dbt.mahapovra.gov.in या संकेतस्थळावर करू शकतात किंवा शासनाच्या mahapocra.gov.in या संकेतस्थळा वरून अधिक माहिती घेऊ शकतात. POCRA Nanasaheb Deshmukh Krushi Snajeevani Yojana
Read  Two Papers Are Important For Bank 2022 | बँकसाठी दोन महत्वाची कागदपत्रे २०२२.

सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण अंतर्गत, महाऊर्जा

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना घटक nanaji deshmukh krishi sanjivani yojana

  • POCRA Nanasaheb Deshmukh Krushi Snajeevani Yojana नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत शेतकऱ्यांसाठी लाभ युक्त घटक – पॉली हाउस ,हरित गृह ,पोल्ट्री फार्म ,स्प्रिंकलर, ठिबक सिंचन ,तुषार सिंचन ,विहीर ,विहीर दुरुस्ती ,शेततळे ,शेळीपालन, बंदिस्त शेळीपालन, मधुमक्षिका पालन, रेशीम उद्योग, गोड्या पाण्यातील मत्स्य पालन , फळबाग लागवड, वृक्ष लागवड, सामूहिक शेततळे ,ढाळीचे बांध, शेत बांध ,कूपनलिका चे पुनर्भरण, दगडाचे बांध ,गॅबियन बांध, समतल चार बनवणे ,खोल व समपातळीवर बनवणे ,गांडूळ खत निर्मिती ,सेंद्रिय खत युनिट, कृषी आधारित उद्योग ,शेडनेट हाऊस, बियाणे साठवणूक गोदाम ,ट्रॅक्टर ,पावर टिलर, बांबू लागवड, शेततळे अस्तरीकरण सिमेंट नाला बांध अनघड दगडाचे बांध पाणी उपसा साधने, बियाने सुकवणे ,कृषी अवजारे निर्मिती केंद्र पाईप (पीव्हीसी )व पाईप( एचडीपी ई) अशा अनेक उपयुक्त शेतकरी उपयुक्त घटकांना यामध्ये स्थान देण्यात आले आहे.
  • नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत जिल्ह्याचा कृषी विकास अधिक जोमाने होण्यास शासनाने त्याकडे लक्ष केंद्रित केले आहे या प्रकल्पाअंतर्गत जिल्हानिहाय शासनाने निवडलेली गावे – अमरावती 535, बुलढाणा 414 ,अकोला 498, वाशिम 149 यवतमाळ 309, वर्धा 125, जळगाव 460 हस्ती कशी विदर्भातील तर मराठवाडा विभागातील औरंगाबाद 406 ,बीड 391 ,जालना 363 ,लातूर 282 ,उस्मानाबाद 287 ,नांदेड 384, परभणी 275 ,व हिंगोली 240 अशा एकूण 15 जिल्ह्यांना शासनाने लाभक्षेत्रात बसवले आहे. महाराष्ट्रातील 155 तालुक्यांना कृषी विकास क्षेत्रात आणण्यासाठी या योजनेचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
Read  Pip Line Subsidy Online Application 2022 | पाईपलाईन अनुदान ऑनलाइन अर्ज 2022

शेतातील गवत/तण बांधावर(धुऱ्या वर)का टाकू नये?

या योजनेत किती गावांचा समावेश आहे?POCRA Nanasaheb Deshmukh Krushi Snajeevani Yojana

  • तर  यामध्ये 3755 ग्रामपंचायतींना सरळ लाभ मिळणार आहे त्यामध्ये 670 गाव समूहांचा समावेश असून संपूर्ण महाराष्ट्रातील प्रकल्पांतर्गत 5142 गावांना कृषी विकास क्षेत्रात आणले आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत निवडलेल्या 5142 गावात प्रत्येक गावांमध्ये ग्रामसभेद्वारे कृषी संजीवनी समिती स्थापन करण्यात आली आहे. 
  • प्रकल्पासाठी निवडलेल्या गावासाठी ग्राम कृषी संजीवनी समिती या गावच्या ग्रामपंचायतीचे विकास समिती म्हणून कार्यरत राहील प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या कामाचा पाठ्यक्रम निश्चित करण्यासाठी कृषी विभागास सहाय्य करण्यासाठी ग्राम कृषी समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. गावातील सरपंच या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात व सदस्य म्हणून उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य प्रगतशील शेतकरी महिला बचत गट प्रतिनिधी कृषीपूरक व्यवसाय शेतकरी इत्यादींना समितीमध्ये कार्यकारी स्वरूपात स्थान देण्यात आले आहे.POCRA Nanasaheb Deshmukh Krushi Snajeevani Yojana
  • कार्यकारी सदस्य यामध्ये कृषी सहाय्यक ग्रामसेवक ग्राम विकास अधिकारी समूह सहायक व गावातील कृषी मित्र इत्यादींनी मंडळींचा समावेश आहे. ग्रामीण कृषी विकासाच्या दृष्टीने शासनाने शेती मर्यादा ही अडीच हेक्‍टर वरून पाच हेक्‍टर केली आहे .तसेच भूमिहीन अनुसूचित जाती जमाती महिला शेतकरी विधवा परित्यक्ता अशा महिलांना बंदिस्त शेळी पालन व कुक्कुटपालन व्यवसाय निवडीचा पर्याय दिला गेला आहे.
  • या योजनेमध्ये शासनाने आता नवीन निकष निकष अंतर्गत पुर्वी पेक्षा जास्त म्हणजे 50 ते 100 टक्के पर्यंत अनुदान ठेवले आहे तसेच गावांमध्ये प्रक्रिया उद्योगाला 60 टक्के पर्यंत अनुदान नियोजित केले गेले आहे योजनेमध्ये अधिक पारदर्शकता येण्यासाठी शासनाने निकष ठरवले आहेत सदर लाभार्थी शेतकऱ्याचा अनुदान हे त्याने पूर्ण केलेल्या सर्व योजनेतील निकषांना पूर्ण केल्यानंतरच मंजूर केले जाते

जमिनीत पाणी शोधण्याचे प्राचीन शास्त्र Science of Water Source Under the Earth in Marathi

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची अमंलबजावणी (POCRA Nanasaheb Deshmukh Krushi Snajeevani Yojana)

  • भारतीय शेतकऱ्यास योजनेची सर्व प्रक्रियेची माहिती ग्रामपंचायत, ग्राम कृषी समिती, कृषी अधिकारी, यांच्या कडुन किंवा नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • ग्राम कृषी संजीवनी समिती स्थापना व 13 सदस्यांची निवड संबंधित ग्रामपंचायतच्या ग्रामसभेद्वारे करण्यात येते ग्राम कृषी संजीवनी समितीत सरपंच व उपसरपंच या पदावरील व्यक्ती बघता अन्य कार्यकारी अधिकारी ज्या गावात प्रकल्प राबविण्यात येणार आहे यामध्ये गावातील सदस्यांचा समावेश असेल POCRA Nanasaheb Deshmukh Krushi Snajeevani Yojana
  • तेरा सदस्यांपैकी नऊ सदस्य अल्पभूधारक अथवा अत्यल्पभूधारक असणे गरजेचे आहे तसेच सर्वसाधारण अनुसूचित जाती, जमाती ,विमुक्त भटक्या जाती, पुरुष व महिला यांचा सदस्य म्हणून समावेश असेल सोबतच गावातील शेतकरी गट ,शेती पूरक व्यवसाय करणाऱ्या महिला बचत गट प्रतिनिधी, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत गाव समीतीकरीता समूह सहाय्यक कृषी विभागाच्या आत्मा समितीमार्फत निवडलेले कृषिमित्र इत्यादींचा समितीअंतर्गत समावेश आहे.
Read  हरभरा लागवड तंत्रज्ञान | Harbhara Lagwad

समितीत गावातील सदस्य असल्यामुळे योजनेचा लाभ जास्तीत जास्त देण्यावर शासनाचा कल स्पष्ट आहे.

जमिनीची सुपीकता कशी वाढवाल? जमिनीची देखभाल कशी कराल?

ग्राम कृषी संजीवनी समिती च्या कर्तव्य व जबाबदाऱ्या खालील प्रमाणे – POCRA Nanasaheb Deshmukh Krushi Snajeevani Yojana

  • नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत निवडलेल्या गावांचे सविस्तर प्रकल्प नियोजन करून आराखडा तयार करण्याचा प्रकल्प यंत्रमाग कृषी विभाग तयार करणे.
  •  ग्राम कृषी संजीवनी समितीच्या सभा आवश्यकतेनुसार नियमितपणे आयोजित करून सभेतील निर्णयांच्या अनुषंगाने कार्यवाहीचा पाठपुरावा व समन्वय करणे.
  •  सहभागी सूक्ष्म नियोजन आराखडा सविस्तर प्रकल्प ग्रामसभेची मान्यता घेणे.
  •  मंजूर वार्षिक कृती आराखड्यानुसार घटकाची व कामाची अंमलबजावणी करणे.
  •  प्रकल्पाचा लाभ लहान सिमांत शेतकरी अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतील शेतकरी व महिला शेतकऱ्यांना मिळण्याच्या उद्देशाने प्रकल्पाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र शेतकऱ्यांची संबंधित घटकांच्या लाभासाठी निवड करणे.
  •  निवडलेल्या शेतकऱ्यांना संबंधित घटकाचे निकष समजावून आवश्यक तेथे लाभार्थी हिस्सा जमा करण्यास प्रवृत्त करणे व प्रयोजनार्थ गरजेनुसार मात्र शेतकऱ्यांना स्थानिक बँकेकडून अर्थसाह्य मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणे आणि घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड करण्यास लाभार्थ्यांना प्रोत्साहित करणे.
  •  प्रकल्पा अंतर्गत केल्या जाणार्‍या कामाच्या नोंदी करणे व संपूर्ण अभिलेख ग्रामपंचायत कार्यालयात जतन करणे.
  • समितीच्या कामकाजाचे वार्षिक विवरण स्वतंत्रपणे ठेवणे.POCRA Nanasaheb Deshmukh Krushi Snajeevani Yojana
  •  गावातील शेती विषयक गरजा भागवण्यासाठी सदर प्रकल्प अंतर्गत उपलब्ध होणारा निधी बरोबरच कृषी व संलग्न विभागाच्या वेगवेगळ्या योजनांची सांगड घालण्यासाठी समन्वय साधणे.
  •  ग्राम कृषी संजीवनी समितीच्या आर्थिक व्यवहार व प्रशासकीय कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी समितीचे अध्यक्ष व संबंधित गावातील कृषी सहाय्यक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने राष्ट्रीय बँकेत खाते उघडण्यात येऊन सर्व रकमांची प्रधान समितीने घेतलेल्या ठरावानुसार व शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार करणे.
  •  मासिक प्रगती अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करण्याची जबाबदारी समुह सहाय्यक यांच्यावर राहील.
  •  समीतीची कामे पूर्ण झाल्यानंतर गरजेनुसार वरिष्ठ कार्यालयाकडे निधीची मागणी करणे.
  •  हवामानातील बदलांमुळे निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत पीक आराखडा तयार करणे .
  •  nanaji deshmukh समितीचे अध्यक्ष आणि गैर व्यवहार केल्याचे दिसून आल्यास ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार तसेच शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांनुसार कारवाई करण्यात येईल.

अशाप्रकारे योजनेची पारदर्शकता व नियम बद्धता तसेच योग्य दिशा निर्देश ठरवून शासनाने नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेला (POCRA Nanasaheb Deshmukh Krushi Snajeevani Yojana) महाराष्ट्रातील शेतकरी हितासाठी अधिक बळकट केले आहे.

27 जानेवारीचा जी आर बघा

आपण हे लेख वाचलेत का?

कांदा लागवड करतांना अशी घ्या खबरदारी, नाहीतर उत्पादन होईल कमी

Marathi Essay

Leave a Comment