Gopinath Munde Shetkari Upghat Vima Yojana | गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

 दिवंगत नेते मा.गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना लागू केली आहे. राज्यातील शेतकरी नेहमीच मोठ्या अपघातांना, अडचणींना सामोरे जात असतात या अपघातांमध्ये प्रसंगी मृत्यूही ओढवतो यामध्ये वीज पडणे, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा शॉक लागने, हिंस्त्र प्राण्यांपासून उद्भवणारा धोका अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी नेहमी ग्रासला आहे

Gopinath Munde Shetkari Upghat Vima Yojana | गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

कृत्रिम अपघातात वाहन अपघात, रस्त्यावरील अपघात आणि अन्य कारणामुळे होणारे अपघात यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होत असतो पण असे मृत्यू झालेल्या कुटुंबाला फार मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते अपघात ग्रस्त शेतकरी हा घरातील कर्ता आणि मुख्य पुरुष असल्यामुळे कुटुंब आर्थिक संकटातून निघणे फार कठीण असते. अशावेळी कुटुंबाला आर्थिक मदतीची नितांत गरज असते . अपघातग्रस्त व आर्थिक दृष्ट्या कमकुवत झालेल्या शेतकरी कुटुंबाला आर्थिक लाभ देण्याकरिता ही योजना सुरू करण्यात आली आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत निकष –

* अपघातामध्ये जर शेतकऱ्याचे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय एक डोळा किंवा एक पाय निकामी झाल्यास दोन लाख रुपये आर्थिक मदत विमा स्वरूपात आहे.

* गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा अंतर्गत शेतकऱ्यांना मोठा दिलासा म्हणजे शेतकऱ्यांना विमा हप्ता भरावा लागत नाही.

* अपघातामुळे जर एक डोळा किंवा एक पाय निकामी झाला असेल तर एक लाख रुपये मदत .

* सर्व प्रकारातील शेतकरी यांच्यासाठी विमा हप्त्याची रक्कम प्रति शेतकरी 32 .23 रुपये शासनामार्फत विमा कंपनीत भरण्यात येतात त्यामुळे शेतकरी यांना विमा हप्ता भरण्याची गरज नाही.

* गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा काढण्याचा कालावधी दि. 10/12/2019 ते 09/12/2020 हा आहे.

* या योजनेत पात्र होण्यासाठी शेतकऱ्याने त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने अथवा वारसदाराने शासनाच्या विभागाकडून अपघातग्रस्त साठी असणाऱ्या योजनेचा लाभ घेतला नसला पाहिजे तेच लाभार्थी शेतकरी या योजनेअंतर्गत पात्र ठरणार.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा यासाठी लागणारी कागदपत्रे –

Read  कृषी कर्ज मित्र योजना | Krishi Karj Mitra Yojana 2021

 विहित नमुन्यातील अर्ज , तोही पूर्वसूचना सोबत . 7/12 उतारा किंवा 8 अ यांची मूळ प्रत, शेतकऱ्याच्या मृत्यूचा दाखला साक्षांकित प्रती मध्ये, प्रथम माहिती अहवाल, घटनास्थळ पंचनामा, वयाचा दाखला, अपघात विम्यासाठी दुर्घटनेनंतर शक्यतो 45 दिवसाच्या आत मध्ये दावा नोंदविण्यात यावा.  अपघात ग्रस्त शेतकऱ्याच्या शेतकरी कुटुंबाची शिधापत्रिका, अपघात वीज पडून मृत्यू, पाण्यामध्ये बुडून मृत्यू ,उंचावरून पडून झालेला मृत्यू ,सर्पदंशाने, विंचू दंश, विजेचा धक्का व अन्य कोणत्याही अपघातासाठी प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटील यांचा अहवाल सादर करणे बंधनकारक राहील.

या विमा प्रस्तावासोबत सादर करावयाची आवश्यक ती कागदपत्रे –

सर्पदंश किंवा विंचू दंशाने मृत्यू झाल्यास सदर घटनेचा पंचनामा ,पोस्टमार्टम अहवाल, वैद्यकीय उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याने पोस्टमार्टम झाले नसल्यास या अहवालातून सूट आहे मात्र वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र शासकीय आरोग्य केंद्र अधिकाऱ्याकडून प्रति साक्ष रीत असणे आवश्यक व बंधनकारक आहे.  पाण्यामध्ये बुडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला असल्यास सदर घटनेचा पंचनामा , पोस्टमार्टम अहवाल ,व्यक्तीकडून बेपत्ता झाल्यास प्रथम माहिती अहवाल व क्षतिपूर्ति बंधनकारक राहील.

रेल्वे अपघात, वाहन अपघातामध्ये मृत्यू झाल्यास सदर घटनेचा पंचनामा, पोस्टमार्टम रिपोर्ट, विमा संरक्षित व्यक्ती वाहन चालविताना अपघात झाल्यास सदर व्यक्तीचा मोटर वाहन परवाना बंधनकारक राहील. जनावराच्या चावल्यामुळे रेबीज होऊन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास औषधोपचाराची संपूर्ण कागदपत्रे जोडावी लागतील.

Read  Free Scooty Yojana 2023 Maharashtra | फ्री स्कूटर योजना २०२३ .

जनावरांच्या हल्ल्यात जखमी होऊन मृत्यू झाल्यास सदर घटनेचा पंचनामा ,पोस्टमार्टम अहवाल सादर करणे बंधनकारक राहील.
नक्षलवाद्यांकडून झालेल्या हत्या यामध्ये घटनास्थळाचा पंचनामा ,पोस्टमार्टम अहवाल व नक्षलवादी हत्या संदर्भातील कार्यालयीन कागदपत्रे सादर करणे बंधनकारक राहील.

ज्या नोंदीनुसार अपघात झालेल्या शेतकऱ्याचे नाव 7/12 वर आले ती संबंधित फेरफार नोंदीबाबत सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्याचे दिलेले प्रमाणपत्र, शेतकऱ्याचे वारस म्हणून तलाठ्याकडे गाव नमुना नंबर 6 नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद उतारा किंवा वारसाच्या नोंदी बाबत सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र .

अन्य कोणतेही अपघात ज्यामध्ये मृत्यू व भीषण नुकसान झाले असेल अशा घटनेचा पंचनामा, पोस्टमार्टम अहवाल व पोलिसांचा अंतिम अहवाल सादर करणे बंधनकारक राहील.

अपंगत्वाच्या लाभाच्या पुराव्यासाठी सादर करावयाची कागदपत्रे खालील प्रमाणे –

घटनेमध्ये शेतकऱ्याला अपंगत्व अथवा अवयव निकामी होण्याचे डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र अथवा दवाखान्याच्या मंदिर प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र व जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रति स्वाक्षरीसह कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.

 विमा मंजूर करण्यासाठी लाभार्थ्यांनी अर्ज कोठे करावा –

संबंधित घटनेचा विमा मिळण्यासाठी संबंधित तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावा. त्याच्या अनुषंगाने जेव्हा अर्ज दिला जाईल त्या तारखेला विमा कंपनीला प्रस्ताव प्राप्त होणार.

संबंधित विमा प्रस्ताव विहित कागदपत्र योजने अंतर्गत विमा संरक्षण कालावधीत कधीही प्राप्त झाला तरी तो विचारात घेणे तसे योजनेच्या अखेरच्या दिवसांत झालेल्या अपघातात साठी योजना चालू वर्षाचा कालावधी संपल्यानंतर 90 दिवसाच्या कालावधीपर्यंत तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे प्राप्त झालेले प्रस्ताव स्वीकारणे विमा कंपनीला बंधनकारक आहे.

Read  Mahajyoti Free Tablet Yojana maharashtra 2023 | महाज्योती मोफत टॅबलेट योजना महाराष्ट्र 2023.

या योजनेअंतर्गत चालू वर्षाचा कालावधी संपल्यानंतर 90 दिवसांपर्यंत संगणक प्रणाली मध्ये नोंद झालेल्या पूर्वसूचना अर्जा मार्फत तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे प्राप्त होणारे विमा प्रस्ताव सुद्धा विमा पॉलिसीचा कालावधी संपण्याच्या दिवसापासून 365 दिवसापर्यंत स्वीकारणे विमा कंपनीला बंधनकारक आहे मात्र सदर कालावधी नंतर कोणताही प्रस्ताव स्विकारला जाणार नाही तसेच यासंदर्भात ग्राहक मंच किंवा इतर निर्णय व आदेश शासनावर बंधनकारक राहणार नाहीत.

शासनाने आता सुधारित स्वरूपातील गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजना 10/12/2019 या कालावधीत ते 9/12/2020 या कालावधीत दि. युनिव्हर्सल सोंपो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीमार्फत प्रति शेतकरी प्रति वर्ष 32 . 23 रु. इतक्या विमाहप्ता दराने तसेच जायका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या विमा सल्लागार कंपनीमार्फत 0.08 टक्के क्या विमा ब्रोकरेज दराने राबविण्यासाठी शासनाची मान्यता देण्यात आली आहे.

कारण शेतकरी हा देशाचा कणा आहे शेतकरी शेतात राबून संपूर्ण जनतेला अन्नधान्य पुरवठा करत असतात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी किती भीषण स्वरूपाच्या आहेत हे माहीतच आहे शेतात काम करताना कधी वन्य प्राण्यांची भिती ,सर्पदंशाची भीती, विंचू चावेलयाची भीती विजेची कामे करताना कधी शाॅक लागेल तर कधी आकाशातील वीज पडून मृत्यू ओढवेल याचा अंदाज बांधणे कठीण ,अशा बिकट परिस्थितीत शेतकरी हा जनतेचा अन्नदाता असून त्याला त्याच्या कुटुंबाला मात्र काहीच किंमत नाही यावर आता शासनाने एक उपाययोजना म्हणून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना Gopinath Munde Shetkari Upghat Vima Yojana ही शेतकरी कुटुंबांना त्यांच्यावर ओढव नाऱ्या संकटकालीन परिस्थितीत मदत करेल.

शासन निर्णय पाहण्याकरिता येथे क्लीक करा

Leave a Comment