Savkari Karj Mafi सावकारी कर्ज माफी होणार

Savkari Karj Mafi मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी जर सावकारी कर्ज घेतले असेल तर ते माफ होणार आहे याबद्दल चा शासन निर्णय 23 नोव्हेंबर 2021 रोजी घेण्यात आलेला आहे.

10 एप्रिल 2015 रोजी एका शासन निर्णयाद्वारे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी जर सावकारी कर्ज घेतले असेल तर त्याची कर्जमाफी होईल अशा प्रकारे शासन निर्णय घेण्यात आला होता.  मात्र यामध्ये काही अटी आणि शर्थी होत्या. सप्टेंबर 2019 मध्ये सुद्धा विनापरवाना सावकाराने कर्ज दिले असेल तर त्याच्याकडून शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईल त्यावर एक शासन निर्णय घेऊन मंजुरी देण्यात आली होती.

सावकाराकडून कर्ज माफ होण्याकरता 9 कोटी रुपयांची आवश्यकता होती. यापैकी पाच कोटी रुपये 2021 – 22 करिता अर्थ संकल्पित करण्यात आला आहे. यापैकी 2.50 कोटी रुपये वितरित करण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे. या संदर्भातील शासन निर्णय खाली क्लिक करून बघा.

Read  राजमाता माँ जिजाऊ साहेब यांच्या जयंती निमित्त प्रहार जनशक्ती पक्ष, महेश अर्बन व खामगाव निधी लि.च्या वतीने शहरातील गरजूंना साहित्य वाटप

शासन निर्णय

शासन निर्णयामध्ये सांगितल्याप्रमाणे विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेले कर्ज अदा करण्यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत.

जिल्हास्तरीय समितीने विदर्भ व मराठवाड्यातील 14 जिल्ह्यातील  3749 कर्जदार शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज रक्कम रुपये 9.04 कोटी कर्जमाफीसाठी पात्र असल्याची शिफारस केली आहे सदर कर्जाची परतफेड करण्यासाठी सन 2021 – 22 या आर्थिक वर्षासाठी रुपये पाच कोटी इतक्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे.

विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक शासन सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी सन दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षातील मंजूर तरतूद मधून रुपये 2.50 कोटी इतका निधी वितरीत करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

 

Leave a Comment