Monsoon News Panjabrao Dakh | या तारखेपासून पावसाचा जोर कमी होणार पंजाब डक यांचा अंदाज

Monsoon News Panjabrao Dakh – पंजाबराव डख हवामान तज्ञ यांचा महाराष्ट्र व देशभरातील पावसाचा अंदाज हा खूप मोठ्या प्रमाणात सत्य ठरत असतो, त्यामुळे सर्वजण पंजाबराव डख हे पावसाबाबत कोणता अंदाज सांगतात यावर नजर असते. राज्यामध्ये सध्या परतीचा पाऊस चांगलाच बरसात आहे. काल मुंबई येथे पाऊस झाला. याचबरोबर पालघर, जळगाव, नंदुरबार, पुणे, नाशिक, धुळे या जिल्ह्यातही पावसाची हजेरी काल पाहायला मिळाली होती.

तसेच औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा काल पावसाने दमदार हजेरी लावली पैठण तालुक्यामध्ये ढग सदृश्य पाऊस झाला होता यामुळे पिकांना मोठा फटका बसला आहे भारतीय हवामान विभागाने राज्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण व मराठवाडा या ठिकाणी पावसाची शक्यता यापुढे आहे.

Read  PM Kisan Benefishary RFT Signed | पी एम किसान योजनेचा तुमचा हप्ता येणार का?

हवामान विभागाने येलो अलर्ट सांगितला आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडणार आहे निश्चितच सध्या कोसळत असलेला पाऊस हा रब्बी हंगामासाठी पोषक असल्याचे जाणकार लोकांचे मत आहे मात्र खरीप हंगाम यामुळे वाया जातो आहे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे सोयाबीन, मका व इतर खरीप पिक या पावसामुळे खराब होत आहे.

पंजाबराव डख यांचा यापुढील पावसाचा अंदाज

9 ते 13 ऑक्टोबर दरम्यान राज्यात काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडेल तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील कोसळणार आहे 13 ऑक्टोबर नंतर राज्यांमध्ये पावसाचा जोर कमी होईल मात्र 13 ते 15 ऑक्टोबर या दरम्यान राज्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे 15 ऑक्टोबर नंतर राज्यांमध्ये पावसाची उघडीप राहणार असून शेतकऱ्यांना घाबरण्यासारखे काही नाही. त्याचबरोबर राज्यामध्ये लवकरच थंडीचे आगमन सुद्धा होणार आहे पंजाबराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे सुधारित हवामान अंदाजानुसार 13 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील पूर्व विदर्भ, मराठवाडा, पश्चिम विदर्भ, सोलापूर सांगली, सातारा, अहमदनगर, उत्तर महाराष्ट्र, नाशिक व दक्षिण महाराष्ट्र या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Read  Pith Girni Yojana Maharashtra 2022 | पीठ गिरणी योजना महाराष्ट्र २०२२ .

आपण आमच्या बातमी मराठी या ब्लॉगला अवश्य भेट द्या

 

Leave a Comment