card status list मित्रांनो रेशन कार्ड आज सर्वात मोठे कागदपत्र आहे आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी रेशन कार्डची झेरॉक्स मागितल्या जाते त्यामुळे आपल्याकडे रेशन कार्ड असणं खूप महत्त्वाचे आहे. रेशन कार्ड आपल्या कुटुंबाचा एक पुरावा आहे.
त्यामुळे सर्व ठिकाणी आपण रेशन कार्ड घेऊन जाऊ शकत नाही जर आपल्या मोबाईल मध्ये रेशन कार्ड असेल तर किती चांगले होईल म्हणूनच या लेखामध्ये मी आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये आपण रेशन कार्ड कसे ठेवू शकतो. हे सांगणार आहे चला तर मग बघुया.
मित्रांनो प्रत्येक रेशन कार्ड ला एक बारा अंकी SRC नंबर मिळालेला असतो हा नंबर आपल्याला माहिती असेल तर आपण आपल्या मोबाईल मध्येच अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये आपलं रेशन कार्ड डाउनलोड करून त्याची प्रिंट काढू शकता किंवा पीडीएफ स्वरूपामध्ये आपण ते मोबाईल मध्ये सेव ठेवू शकता. काही सोप्या पद्धतीने आपण ते करू शकता खालील प्रमाणे.
1. सर्वात प्रथम आपल्या मोबाईल मध्ये गुगल Crome Browser आहे गुगल Google वर जाऊन आपल्याला mahafood असे इंग्रजी मध्ये टाकायचे आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाची वेबसाईट तुम्हाला दिसेल, त्यावर क्लिक करायचे आहे.
2. वेबसाईटला क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली या पर्यायावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन वेबसाइट ओपन होईल.
3. येथे आल्यानंतर आपल्या क्रोम ब्राऊझर चा डेस्कटॉप मोड ऑन करायचा आहे. म्हणजेच ही वेबसाईट desktop mod लाच सपोर्ट करते रेशन कार्ड ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर know your ration card या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
4. हे झाल्यानंतर तुम्हाला एक कॅपच्या कोड इंटर करून व्हेरिफाय या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
5. पुढील पेज ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर राशन कार्ड नंबर म्हणजेच SRC नंबर टाकायची खिडकी उघडेल त्यामध्ये नंबर टाकल्यानंतर view report या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
6. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड मधील सर्व माहिती समोर दिसेल त्याची प्रिंट करण्याकरता print your ration card यावर क्लिक करायचे आहे तुमच्यासमोर पीडीएफ स्वरूपामध्ये रेशन कार्ड चे फॉरमॅट पाहायला मिळेल तुम्ही त्याची प्रिंट करू शकता किंवा मोबाईल मध्ये ते सेव्ह ठेऊ शकता.
तर अशाप्रकारे मित्रांनो रेशन कार्ड कसे डाउनलोड करायचे हे आपण या लेखांमध्ये बघितलं तुम्हाला आमचा Ration Card Status List हा लेख कसा वाटला नक्की कमेंट करा आणि हो आमच्या आई मराठी या ब्लॉगला अवश्य भेट द्या.