Sharad Pawar Gram Samridhi Yojana 2024 महाराष्ट्र शासन हे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असते. वेगवेगळ्या योजना ही शेतकऱ्यांसाठी घेऊन येते पोल्ट्री फार्मिंग ही शासनाने 3 फेब्रुवारी 2019 रोजी शेतकऱ्यांसाठी राबवलेली योजना आहे. नुकतीच एक नवीन योजना जाहीर झाली आहे ती म्हणजे शरद पवार ग्राम समृद्धी योजना या योजनेत मधून शेतकऱ्यांना जोड उद्योग चालू करता येतील जसे की शेळी , गाय, म्हैस , कुकुट पालन यांसाठी अनुदान दिले जाईल . यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मोठ्या प्रमाणावर होईल. यामध्ये म्हैस व गाय यांच्यासाठी पक्का गोठा बांधणे शेळीपालनासाठी शेड कुकुट पालनासाठी शेड भूसंजीवनी नाडे कंपोस्टिंग साठी अनुदान या प्रकारचे सर्व अनुदान या योजनेमध्ये दिले जाईल.
अनुदान कसे मिळेल हे खालील प्रमाणे.
गाय व म्हैस यांसाठी पक्का गोठा बांधण्यासाठी दोन ते सहा गुरांसाठी 77 हजार 188 रुपये एवढे अनुदान मिळेल .
शेळीपालन दहा शेळ्यांकरिता शेड बांधण्यासाठी 49 हजार 284 रुपये अनुदानामध्ये दिले जातील.
कुकुट पालन शेड बांधण्यासाठी शंभर पक्षांकरिता 49 हजार 760 रुपये ही अनुदानाची रक्कम दिली जाईल.