PM Kisan Samman Nidhi Yojana Changes पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातून 3 वेळा पी एम किसान योजनेचा pm Kisan samman nidhi yojana लाभ मिळतो. आता या योजनेचा 9 वां हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. PM Kisan योजनेच्या नियमांमध्ये वेळोवेळी बदल केले जातात म्हणूनच या लेखात आपण झालेल्या बदलांविषयी जाणुन घेऊयात.
पंतप्रधान किसान सन्मान निधी pm kisan samman nidhi योजनेत झालेले बदल
1) आता शेतकऱ्यांना कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. सरकारने pm kisan च्या पोर्टल वरच नोंदी करण्याचा पर्याय दिला आहे. म्हणजेच तुम्हाला सरकारी कार्यालयात जाण्याची तसदी घ्यावी लागणार नाही.
2) तुमच्याकडे pm kisan चे online खाते, तुमचा मोबाईल नंबर, तुमचे आधार कार्ड व तुमचा बँक खाते नंबर असला म्हणजे झाले. तूम्ही तुमचे खाते https://pmkisan.gov.in या वेबसाईट वर लॉगिन करून उघडू शकता. म्हणजेच तुम्ही वरील वेबसाईट वर नोंद करू शकता.
3) पी एम किसान च्या 8 व्या हप्त्यापर्यंत ज्या शेतकऱ्यांकडे शेती 2 हेक्टर पेक्षा कमी आहे असेच शेतकरी या योजनेकरीता पात्र होते किंवा अर्ज करु शकत होते परंतु आता केंद्र सरकारने जुने नियम रद्द केले असुन या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्याना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
4) pm kisan योजनेचा लाभ घेण्यासाठी आता आधार कार्ड अनिवार्य केल्या गेले आहे. म्हणून आपले आधार कार्ड या योजनेशी जोडणे अनिवार्य आहे. तरच आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तुम्ही तुमच्या आधार कार्ड, बँक अकाऊंट, चुकांची दुरुस्ती, किंवा बदल वरील वेबसाईटवर जाऊन करु शकता.
5) तुम्हीं स्वतः तुमचे हप्त्याचे स्टेटस वरील संकेत स्थळावर जाऊन करु शकता. म्हणजे आपले हप्ते का थांबले, चुका काय आहेत याची माहिती तपासू शकता. त्याकरिता तुम्हांला तुमचे आधर कार्ड डिटेल्स, बँक अकाऊंट नंबर, व मोबाईल नंबर नोंद करावा लागेल. त्यानंतरच तुम्हास तुमची स्थिती समजेल.
6) आता तुम्हाला केंद्र सरकारने पीम किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून किसान क्रेडिट कार्डशी योजनेशी जोडले आहे. त्यामुळे आता तुम्ही सहज किसान क्रेडिट कार्ड बनवून घेऊ शकता. तसेच या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या कर्जाच्या हप्त्याचा लाभ सुध्दा घेऊ शकता.
7) तुमच्या करीता आणखी एक खूशखबर म्हणजे तुम्हाला पी एम किसान योजनेकरीता कुठलाही कागद द्यावा लागणार नाही. याचा अर्थ असा की, पी एम किसान योजनेचा लाभ घेत असलेले शेतकरी आपल्या मानधन योजनेच्या खात्याकरिता पी एम किसान सन्मान निधीमधून सुध्दा पैसै देऊ शकणार आहेत.
अशाप्रकारे वरील प्रमाणे पी एम किसान सन्मान निधी योजने pm kisan samman nidhi मध्येबदल करण्यात आले आहेत. तुम्ही आमच्या aai marathi व adbhut marathi या ब्लॉगला अवश्य भेट द्या.