मलकापूर:- ६७ वी शालेय राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस क्रीडा स्पर्धेत सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्स असो बुलढाणा व स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूर बुलढाणा जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील इतिहातात प्रथमच एका खेळात तब्बल सात खेळाडूची शालेय राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची संधी मलकापूर शहरातील खेळाडूचा सॉफ्ट टेनिस स्पधेच्या माध्यमातून मिळालेली आहेत सदर सर्व खेळाडूंना सॉफ्ट टेनिस असो बुलढाणा चे सचिव व स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूर चे सचिव विजय पळसकर याचे तालुका क्रीडा संकुल मलकापूर येथे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभत असल्याचे दिसत आहेत.
राज्याच्या सॉफ्ट टेनिस स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्यातील मुलींच्या संघाने आपले निर्वीवाद वर्चस्व कायम ठेवले असुन सबज्युनिअर ज्युनिअर सिनियर राज्यस्तरीय स्पर्धेत बुलढाणा संघाचा धबधबा कायम ठेवला असून गोंदिया लातूर जळगांव येथील तीनही स्पर्धेत मुलींच्या संघाने सुवर्णपदकाची हॅट्रिक केली असून शालेय राज्य स्पर्धेत सुद्धा अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करीत असताना आपले वर्चस्व कायम ठेवीत क्रीडा क्षेत्राचे हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलकापूर शहरातील तब्बल सात खेळाडूची महाराष्ट्र संघात निवड होण्याची पहिलीच वेळ सॉफ्ट टेनिस खेळाच्या माध्मामातून असून सदर राष्ट्रीय शालेय स्पर्धा १८ ते २३ जानेवारी दरम्यान रायपूर छत्तीसगड येथे सपंन होणार आहेत.
सदर खेळाडूंमध्ये १९ वर्ष मुलींमध्ये सृष्टी अतुल होले,भक्ती केशव साळुंके, १९ वर्ष मुलामध्ये लोकेश सुनिल चांडक १७ वर्ष मुलींमध्ये सोनल गणेश खर्च १७ वर्ष मुलांमध्ये तनिस राहुल तायडे १४ मुलीमध्ये भक्ती संदीप क्षीरसागर व पलक शेलेद्रसिग परदेशी याच्या महाराष्ट्र संघात निवड झालेली आहेत सदर खेळाडूंमध्ये सृष्टी होले भक्ती साळुंखे सोनल खर्चे तनिष तायडे पलक परदेशी यांनी यापूर्वीही राष्ट्रीय अजिंक्यपद महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केलेले असून सोनल खर्चे व पलक परदेशी यांनी श्रीनगर जम्मू काश्मीर येथे झालेल्या स्पर्धेत कास्यपदक पटकाविले आहेत. तसेच नुकत्याच वेल्लोर तामिळनाडू येथे संपन्न झालेल्या सबज्युनीयर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सोनल खर्चे ने सांघिक प्रकारात कास्यपदक पटकाविले असुन वैयक्तिक डबल्स मध्ये रजतपदक पटकावले होते.
महाराष्ट्र शालेय सॉफ्ट टेनिस संघात बुलढाणा जिल्ह्यातील सात खेळाडूची निवड झाल्याबद्दल सॉफ्ट टेनिस असो ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष सुनील पूर्णपात्रे सचिव रवींद्र सोनवणे
मा आ राजेशभाऊ एकडे सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्स असोसिएशन बुलढाणा चे अध्यक्ष संतोष बोरगावकर साहेब कार्याध्यक्ष राजेश महाजन बुलढाणा जिल्हा क्रिडा अधिकारी बाळकृष्ण महानकर तालुका क्रिडाअधिकारी लक्ष्मी शंकर यादव सर राजेश्वर खंगार राहुल चोपडे चंद्रकांत साळुंखे विनोदशेठ राजदेव प्रा कैलास पवार प्रा नितीन भुजबळ यांनी खेळाडूंचे राष्ट्रीय स्पर्धेसाठी अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.