मलकापूर मध्ये घरो-घरी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या पुजित वितरण कार्य प्रारंभ

मलकापूर मध्ये घरो-घरी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या पुजित वितरण कार्य प्रारंभ

मलकापूर – श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या 22 जानेवारी 2024 ला होत असलेल्या रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा निमित्त 1 जानेवारी ते 15 जानेवारी पूजित अक्षद निमंत्रण माझे गाव माझी अयोध्या अंतर्गत प्रत्येक घरात श्रीराम जय राम जय जय राम या विजय मंत्राच्या जय घोषात दिंडी काढून निमंत्रण मलकापूर तालुका व शहर मधिल प्रत्येक घरो घरी जात, पात, पंथ, पक्ष विसरून वितरण कार्य प्रारंभ झाले आहे.

मलकापूर तालुका व नगर मधिल प्रभु श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र पुजित अक्षद वितरण समिती सदस्य व स्थानिक रामभक्त यांच्या द्वारे घरो घरी 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभु श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे अक्षद, माहिती,पत्रक व श्रीराम मंदिर तीर्थ क्षेत्र मंदिर चे फोटो घेऊन घरो-घरी पोहचवीत आहे .

Read  राम भक्तांच्या' जय श्रीराम च्या जयघोषाने दुमदुमली मलकापूर नगरी, शोभायात्रेत हनुमंत व श्रीरामभक्तांचा उत्साह ठरला लक्षवेधी..

समाजातील प्रत्येक बंधू-भगिनीचीं इच्छा आहे की त्यांनी 22जानेवारी ला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या करीता अयोध्या पोहोचावे पण हे संभव नाही या अक्षद अयोध्या येथिल श्रीराम मंदिर यांचे आमंत्रण असून भविष्य मध्ये आपणास अयोध्या येथे श्रीराम मंदिर येथे दर्शन घेण्या साठीच तीर्थ क्षेत्र अयोध्या द्वारे आपणास आले आहे पण तो पर्यंत ते अक्षद आपल्या देवघरात ठेवाव्यात. येणाऱ्या 20/21/22 जानेवारी रोजी त्यातील काही अक्षद आपल्या गावाला, वस्तीला, घराला अयोध्या मानून तर आपल्या गाव/वस्ती मधील श्रीराम मंदिर याला अयोध्येतील श्रीराम मंदिर आहे या भावनेने 22 तारखेस त्या मंदिरात सकाळी 11 ते 1 दरम्यान पोहोचून त्या अर्पित कराव्या सोबत पुढील कार्य करण्याचे आव्हान स्थानिक अक्षद वितरण समिती सदस्य करीत आहे.

Read  लोखंडी रॉड, फायटर,व चाकूने एकास जबर मारहाण, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल! मलकापूर शहरातील घटना

1) प्रत्येक हिंदूने आपापल्या घरी आकाश कंदील लावावेत.

2) आपले घर स्वदेशी लायटिंग, दिप माळांनी रोशन करावे.

3) घरासमोर आकर्षक रांगोळी काढावी.

4) दाराला झेंडूच्या फुलांचे आब्याच्या पाणाचे तोरण बांधावे.

5) घरात खायला व प्रसादा करीता गोड करावे .

6) लहान मुलांना फटाके आणून द्या.

7) भगवे ध्वज पताका आपल्या घरा वर घरा जवळील मंदिरा वर लावावी.

8) आपल्या घरा जवळील मंदिर व आपल्या घरा वर तीन दिवस कमीत कमी ५ दिवे लावावे

9) २२ तारखेस आपल्या घरा जवळील मंदिरावर सुंदरकांड, श्रीराम स्तृती, विजय महामंत्र,हनुमान चालीसा पठण करावे.

10)२२ ला रामलला यांची प्राणप्रतिष्ठा झाल्या वर त्यांची प्रथम आरती आपल्या घरा जवळील मंदिरावर सहपरीवार उपस्थती राहून एल.सी.डी. किंवा टी.व्ही चे नियोजन करावे व सोहळा बघावा

Read  विद्या विकास प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाकोडी शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा 2023-24 थाटामाटात संपन्न

11) यथा शक्ती प्रसाद सर्व राम भक्तांना वितरण करावे.

 

*५०० वर्षातून आपल्या प्रभू श्री रामलल्लाचे मंदिर निर्माण होत आहे त्यामुळे प्रत्येक हिंदूंनी आपापल्या परीने हा भव्य दिव्य महादिवाळी उत्सव साजरा करून प्रभू श्री राम यांना नमन करावे.*

Leave a Comment