Sukanya Samruddhi Yojana | सुकन्या समृद्धी योजना

Sukanya Samruddhi Yojana आज 24 जानेवारी National Girl Child Day जानेवारी म्हणजेच राष्ट्रीय बालिका दिन. 24 जानेवारी हा संपूर्ण भारतभर राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच दिनी 1966 मध्ये इंदिरा गांधी यांनी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. राष्ट्रीय बालिका दिनाचे उद्दिष्ट म्हणजे मुलींना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे आहे. जर तुम्हालाही तुमच्या मुलीच्या भविष्य करिता आर्थिक तरतूद करायची असेल तर तुम्ही मुलीच्या नावे सुकन्या समृद्धी उघडायला पाहिजे.

10 वर्षाची मुलगी होईपर्यंत उघडू शकता खाते

सुकन्या समृद्धी योजना च्या मार्फत मुलींचे खाते जन्मापासून ते दहा वर्ष होईपर्यंत उघडता येते हे खाते एका कुटुंबांमधील जास्तीत जास्त 2 मुलींकरता उघडता येते जुळी किंवा तिहेरी मुली असल्यास दोन पेक्षा जास्त खाते उघडता येतात सुकन्या समृद्धी योजना वर सध्याच्या घडीला 7.6 टक्के व्याजदर मिळत आहे यामुळे 250 रुपयांमध्ये आपल्याला हे खाते उघडता येईल.

Read  Drip Subsidy Maharashtra 2022 | ठिबक व तुषार सिंचन योजना

या योजनेअंतर्गत एका वर्षात जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक आपण करू शकता खाते उघडण्या करिता मुलीचा जन्माचा दाखला देणे आवश्यक आहे. ही योजना बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये कुठेही आपल्याला सुरु करता येते.

आपली मुलगी 21 वर्षाची झाल्यानंतर किंवा मुलीचे लग्न झाल्यानंतर खाते मीचील होईल आणि तुम्हाला व्याजासह संपूर्ण रक्कम परत मिळेल.

आपल्याला जर मुलींच्या उच्च शिक्षणाकरिता खर्च लागत असेल तर अठरा वर्षानंतर सुकन्या समृद्धी योजना खात्यामधून आपण 50 टक्केपर्यंत रक्कम काढू शकता याशिवाय मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर मुलीच्या लग्नाच्या वेळी आपण पैसे काढू शकतो पाच वर्षानंतर ही खाते बंद करता येते खाते उघडण्या करता तारखेपासून आपल्याला पाच वर्षांनी बंद खाते बंद करता येईल.

Read  BSF Constable Tradesman Recruitment 2022 Online Form | बी एस एफ भरती 2022

आपल्याला इतरही वेळेस या मधून पैसे काढता येतील जसे की, धोकादायक आजाराच्या बाबतीत किंवा इतर कोणत्याही कारणास्तव खाते बंद केले जात असेल तर त्यास परवानगी दिली जाऊ शकते परंतु त्यावरील व्याज बचत खात्यानुसार असेल.

सुकन्या समृद्धी योजना मध्ये आपण जर गुंतवणूक केली तर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सूट आपणास मिळू शकते. Sukanya Samruddhi Yojana या विषयी आपणास आणखी माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा.

नक्की वाचा : आई मराठीअद्भुत मराठी

Leave a Comment