तुरीचा दाणा नाकात अडकल्याने तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

सौंदळा : तुरीचे दाणे खात असताना अचानकपणे नाकात तुरीचा दाणा अडकल्याने एका तीन वर्षीय चिमुकल्याचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना पाटसूल येथे २३ जानेवारी रोजी रात्री घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

दहीहंडा पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या पाटसूल येथे २३ जानेवारी रोजी ८ वाजेच्या सुमारास घरात आजी तुरीचे दाणे काढत असताना त्यांचा नातू योगिराज अमोल इसापुरे (३) हा
आजीजवळ आला, आजीने काढून ठेवलेले तुरीचे दाणे त्या चिमुकल्याने मुठीत घेतले आणि तोंडात कोंबले. त्यातील एक दाणा मुलाच्या नाकात गेला. त्याला लगेच श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तो तडफडत असल्याचे पाहून कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात भरती करण्याचा प्रयत्न केला; परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली.

Leave a Comment