मिसरूड न फुटलेल्या व फाटलेल्या चड्डीला थीगय लावून टवाळखोर भाईची शाळेसमोर दहशत; शिकण्यासाठी येत असलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनकडून पैसे उखडण्याचा गोरख धंदा

मलकापूर( दिपक इटणारे ):- ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी बसेस अथवा खाजगी वाहनांनी मलकापूर शहरात येत असतात. शिक्षण घेऊन मोठे होण्याचे स्वप्न बघत असतात मात्र त्यांच्या स्वप्नांची राख रंगोळी करून त्याना आई वडिलांन कडून मिळालेले खाऊचे पैसे शहरातील टवाळखोर मुले अर्थात फाटलेल्या चड्डीला थिगय लावलेलं मिसरूड न फुटलेले मुले शालेय विद्यार्थ्यांन कडून मारण्याची धमकी देत पैसे उखडत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर शहरात शिक्षण घेण्यासाठी तालुक्यातील असंख्य मुले येत असतात. भल्या पहाटे विद्यार्थी ऊन, वारा, पाऊस असो अश्या आसमानी संकटांना सामोरे जाऊन आई वडिलांच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. भल्या पहाटे विद्यार्थी येत असल्यामुळे शेतकरी, शेतमजूर आई वडील आपल्या मुलांकडे खाऊ साठी अथवा अडीअडचणी साठी पैसे देतात मात्र अश्या शालेय विद्यार्थ्यांन कडून शहरातील स्थानिक टवाळखोर तरुण अर्थात फाटलेल्या चड्डीला थीगये लावलेले भाई शालेय विद्यार्थ्यांना दादागिरी व दहशत दाखवून त्यांच्या खिशातून पैसे उखडतात म्हणजेच “आईजीची जीवावर बाईजी उदार” अशी म्हणायची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांना सोडा अशी धमक कोणामध्ये नाही. फाटलेल्या चड्डीला थिगय लावलेल्या अश्या टवाळखोर मुलांच्या दहशतीला घाबरून तक्रार करायला सुद्धा शालेय विद्यार्थी समोर येत नाही. टवाळखोरांची ही दहशत मोडून काढण्यासाठी व विद्यार्थ्यांची शिकण्याची द्वार ज्या पद्धतीने खुली आहेत तसेच त्यांची मनही मोकळे केले पाहिजे जेणेकरून ते बिनधास्तपणे शाळेत येतील ही नैतिक जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे. अश्या फाटलेल्या चड्डीला थिगय लावून शालेय विद्यार्थ्यांना त्रास देणाऱ्या भाईच्या मुसक्या आवळणे ही काळाची गरज आहे.

Read  लोखंडी रॉड, फायटर,व चाकूने एकास जबर मारहाण, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल! मलकापूर शहरातील घटना

@ बुलढाणा रोड लगत एकाच मार्गावर दोन विद्यालय आहेत. दोन्ही शाळा एकाच वेळेवर सुटतात त्यामुळे या रोडवर विद्यार्थ्यांची गर्दी होत असते याच गर्दीचा फायदा घेत स्थानिक असलेले फाटलेल्या चड्डीला थिगय लावलेले टवाळखोर भाई शालेय विद्यार्थ्यांच्या मनात दादागिरी व दहशत निर्माण करून पैसे उखाडतात. या गंभीर बाबीकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

Leave a Comment