ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; एकाचा मृत्यू तर,एक गंभीर जखमी

ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; एकाचा मृत्यू तर,एक गंभीर जखमी

 

जळगाव जामोद : शहरातील जळगाव – नांदुरा रोडलगत असलेल्या महाराष्ट्र बँकेसमोर ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक इसम जागीच ठार तर एक इसम गंभीर जखमी झाल्याची घटना २३ जानेवारी रोजी घडली.
२३ जानेवारी रोजी दुपारी जळगाव शहरातील महाराष्ट्र बँकेसमोर ट्रक (एम.एच.२८-७८८९) चालकाने
दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये भिंगारा येथील दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर भेंडवळ येथील वासुदेव सोनोने (वय ६२) गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जळगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना खामगाव येथे रेफर करण्यात आले आहे. ट्रक पोलिस स्टेशन जळगाव जामोद येथे जमा करण्यात आला आहे.

Read  मुलींशी गैरवर्तन करून छेडछाड करणाऱ्याला महिलांनी दिला चोप,गळ्यात चपलांचा हार घालून काढली धिंड..

Leave a Comment