पत्रकार हे शासन व समाजातील महत्त्वाचा दुवा – निलेश तायडे

मलकापूर : पत्रकार हा समाजाचा अत्यंत महत्वाचा घटक असून, तो समाजाचा आरसाच नाही तर कान, नाक, डोळा आहे. समाजाचे अंतरंग टिपून त्याचे विश्लेषण करण्याची शक्ती पत्रकारात असते. पत्रकार नेहमी शासन व समाज यामधील दुवा म्हणून काम करतो. त्यामुळे माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या समाजाच्या अशा अविभाज्य घटकाच्या कल्याणासाठी शासन प्रयत्नशील आहे., असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय मुंबई येथील सहायक संचालक निलेश तायडे यांनी आयोजित पत्रकारांचा सन्मान व सत्कार सोहळ्याप्रसंगी केले केले.

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त ६ जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधून शहरातील व्हॉइस ऑफ मीडिया तर्फे घीर्णी रोड वरील मिलिंद डवले यांच्या शेतातील निसर्गरम्य फार्म हाऊसवर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार व सन्मान करून, वनभोजन तथा विविध उपक्रमांनी पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी व्हॉइस ऑफ मीडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, राज्य कार्यकारिणी सदस्य अरुण जैन, विदर्भ उपाध्यक्ष वीरसिंह राजपूत, जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा सपकाळ, जिल्हा सचिव गजानन धांडे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय सहा. संचालक निलेश तायडे, जेष्ठ पत्रकार रमेश उमालकर, अनिल भाटी, विनायक तळेकर, नंदकुमार वर्मा, मोहनलाल चोरडिया, विजयराव भगत, मा.नगरसेवक बंडूभाऊ चवरे,मिलिंद डवले, दीपक चांभारे यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रम प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणातून ज्येष्ठ पत्रकार अनिल भाटी यांनी भूतकाळातील पत्रकारिता व वर्तमानात असणारी अद्यावत तंत्रज्ञानाची पत्रकारिता यातील परिस्थिती समजावून सांगत पत्रकारांनी समाज हिताचे सकारात्मक पत्रकारिता करावी असे मनोगत व्यक्त केले. तसेच पत्रकार हनुमान जगताप, संपादक नारायण पानसरे, कृष्णा मेसरे, बंडूभाऊ चवरे यांनी पत्रकार दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी विदर्भ उपाध्यक्ष वीरसिंह राजपूत यांच्या हस्ते मलकापूर कार्यकारणी मध्ये कार्याध्यक्ष पदी नारायण पानसरे, उपाध्यक्षपदी समाधान सुरवाडे, कार्यवाहक पदी शेख जमील यांची नियुक्ती करण्यात येऊन सत्कार करण्यात आला. तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होऊन हर्ष उल्हासात पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. नितीन भुजबळ, प्रस्ताविक तालुकाध्यक्ष धीरज वैष्णव, तर आभार प्रदर्शन समाधान सुरवाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता व्हाईस ऑफ मीडिया मलकापूरच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Comment