मलकापूर येथे पत्रकार सन्मान कार्यक्रम संपन्न

मलकापूर (प्रतिनिधी) पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्य साजरा केला जाणारा ६ जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते बाळासाहेब दामोदर यांच्या संकल्पनेतून पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन मलकापूर जिल्हा बुलढाणा येथील जुने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात बुधवार 10 जानेवारी रोजी  या पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून सुशील मोरे तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, अजयभाऊ सावळे, विलास भाऊ तायडे तालुका उपाध्यक्ष हे होते
त्यावेळी मलकापूर शहरातील संपादक व पत्रकारांना सप्रेम भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या सोहळयाला अध्यक्ष म्हणून बाळासाहेब दामोदर जिल्हा नेते वंचित बहुजन आघाडी, हे लाभले तर प्रमुख अतिथी म्हणून रमेश उमाळकर ज्येष्ठ पत्रकार, धनश्रीताई काटीकर पाटील महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघ, वीरसिंह दादा राजपूत ज्येष्ठ पत्रकार, आतिशभाई खराटे जिल्हा महासचिव हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व प्रथम महिला संपादक ताणुबाई बिरजे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली.

Read  मलकापूर मध्ये घरो-घरी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या पुजित वितरण कार्य प्रारंभ

कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब दामोदर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पत्रकारीतेच्या माध्यमातून जनप्रभोधन करून लोकशाही बळकट करणाऱ्या पत्रकार बांधवांचे भरीव कार्य देशासाठी खूप आवश्यक असल्याचे उद्गार याप्रसंगी काढले.
सदर कार्यक्रमात श्रीकृष्ण तायडे ,सतीश दांडगे, नितीन पवार, गजानन ठोसर, गौरव खरे ,संदीप सावजी, समाधान सुरवाडे, प्रा. प्रकाश थाटे, नारायण पानसरे, राजेश इंगळे अजय टप, उल्हास शेगोकार , नथूजी हिवराळे सय्यद ताहेर , कैलास काळे ,प्रवीण राजपूत मनोज पाटील, जमील पत्रकार, शेख निसार, मयूर लड्डा ,अबू बागवान, दीपक इटणारे, विश्वनाथ पुरकर, गणेश तायडे, विनायक तळेकर, अनिल गोठी यांचा सत्कार करण्यात आला

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीकृष्ण भगत यांनी केले तर आभार प्रदर्शन हिंदी मराठी पत्रकार संघाचे नथुजी हिवराळे यांनी केले.

Read  शालेय राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल सात खेळाडूंची निवड रायपूर छत्तीसगड येथे होणार राष्ट्रीय स्पर्धा

 

हिंदी मराठी पत्रकार संघातर्फे दिला जाणारा जिल्हा गौरव पुरस्कार यावर्षी बाळासाहेब दामोदर यांना प्रदान करण्यात आला आपल्या कार्यातून संपूर्ण जिल्ह्यात आपल्या गावाचे नावलौकिक करणाऱ्या बाळासाहेब दामोदर यांना हा पुरस्कार मिळाल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Leave a Comment