Underground Water Searching Method in Marathi जमिनीतील पाणी कसे शोधावे?

शेत जमिनीसाठी ( Underground Water Searching Method in Marathi ) पाणी खूप महत्त्वाचे साधन आहे. जर तुमच्याकडे शेतामध्ये पाणी असेल तर तुम्ही पिकाला पाणी देऊन जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकता. बरेच शेतकरी विहिरी खोदतात पण पाणी लागत नाही. शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात पैशांची नुकसान होते. तर पाण्याचा अचूक अंदाज घेणे जुन्या शास्त्रानुसार शक्य आहे. जमिनीमध्ये पाणी कुठे असते. हे पाणी सापडण्याची काही संकेत असतात. हे आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. आपल्याकडे जमिनीत पाणी पाहण्यासाठी दोन धातूच्या काड्या घेतल्या जातात त्या जवळ आल्या तर तेथे पाणी असते असे मानले जाते.

लोक जमिनीत पाणी कसे शोधतात? Underground Water Searching Method in Marathi

नारळ हातावर घेऊन आणखीन एक पाणी शोधण्याची (Searching Method) शास्त्रीय पद्धत आहे. परंतु या गोष्टीला कोणतेही आधार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे बरेच मोठे नुकसान  होऊ शकते. शेतकऱ्यांना बोरविहीर करायची असल्यास त्यामध्ये खूप सारा पैसा लागतो आणि पाणी जर लागल नाही तर वाया जातो. हा खर्च करण्यासाठी जर एखाद्या व्यक्तीने विहिरी खोदण्यासाठी किंवा बोर लावण्यासाठी जर गॅरंटी दिली असेल तरच हा खर्च करण्यास परवडेल..

Read  विज पडण्यापासून स्वतःला वाचण्याच्या काही सोप्या पद्धती

भूमीच्या अंतर्भागात असणारे पाण्याचे साठे शोधून काढणे हे मोठे आव्हान भूगर्भशास्त्रज्ञांसमोर पूर्वी होते आणि आताही आहे. वराहमिहीर यांच्या बृहत्‌संहितेत “दकार्गल’ नावाचा अध्याय असून, त्यात भूमीवरील लक्षणांवरून भूगर्भांतर्गत पाण्याचा साठा कसा शोधून काढावा याविषयी उद्‌बोधक, शास्त्रीय माहिती दिली आहे.

आपण पाण्यासाठी ज्या पद्धती वापरणारा होत्या पद्धती (Method) सतराव्या शतकात शिवाजी महाराजांनी लोकांना सांगितल्या होत्या.
त्याच पद्धतीने आपण पाहणार आहोत. तर पहिलीच पद्धत पाणी शोधण्याची म्हणजे तुमच्या शेताजवळ आंबा किंवा पिंपळ, उंबर असेल तर या झाडांच्या मुळाशी पाणी असतं. कारण असं आहे की वेळ असेल पिंपळ असेल किंवा आंबा उंबर असेल या झाडांची मुळे खोल वरती गेलेली असतात.

जमिनीत पाणी कसं पाहायचं? Underground Water Searching Method in Marathi 

त्यामुळे हे झाडांची मुळे त्या पाण्याची टाकी निर्माण करत असतात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठवून ठेवण्याचे काम झाडांची मुळे करत असतात. तुमच्या शेतात जर ही झाडे असतील तर त्या शेतामध्ये या झाडांच्या खाली पाणी आहेत. ही पहिली टेक्निक तुम्ही अमलात आणू शकता.

Read  महाराष्ट्रात येणाऱ्या दिवसात पाऊसाची शक्यता | Mansoon Weather in Maharashtra

आणखी दुसरी पद्धत म्हणजे की, एखादे फुलाचे झाड जर मोठ्या फळाच्या झाडावर गेले असेल तर हे सुद्धा एक निसर्गाचं लक्षण आहे, भूजल पातळी वर आहे. याचा उल्लेख केलेला आहे नामदेवराव जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ग्रिट इंजीनियरिंग या पुस्तकामध्ये. तर ही टेक्निक सुद्धा शेतकरी मित्रांसाठी उपयोगी ठरू शकते.

यानंतर महत्त्वाची तिसरी टेक्निक म्हणजे तुमच्या शेतामधील एखाद्या आंब्याच्या फांदी जर जमिनीच्या दिशेने खाली वाकली असेल तर तिथे सुद्धा पाणी मोठ्या प्रमाणावर असते किंवा पाण्याची भूजल पातळी ही वरच्या दिशेला असते. तर ही सुद्धा निसर्गाचा एक लक्षण आहे की, इथं पण पाणी मोठ्या प्रमाणात असू शकते. तिसरी पद्धत तुम्ही नक्की तुमच्या शेतामध्ये वापरू शकता.

जमिनीत पाणी कसे शोधायचे?

त्यानंतर चौथी महत्त्वाची पद्धत Underground Water Searching Method in Marathi ती म्हणजे तुमच्या शेतामध्ये बोर, बाबुळ एखादं झाड असेल तर आणि त्या झाडाच्या बाजूला वारूळ असेल तर हीसुद्धा निसर्गाचं एक लक्षण आहे, की तिथे सुद्धा पाण्याची भूजल पातळी ही वर असते. काही प्रदेशात खूप वारुळे असतात.

वारुळांमधून खूप आर्द्रता असते, त्या ठिकाणी वाळवीची वसाहत असते. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे वारूळ तयार करता करता त्या थेट भूगर्भातील पाण्यापर्यंत जातात. त्यामुळे वारूळ असणे हे त्याखाली निश्‍चित पाणी असल्याचे निदर्शक लक्षण मानले गेले आहे.

Read  राज्यात पुन्हा पावसाचा तडाखा Hawaman Andaz Maharashtra

खूप टेक्निक्स आहेत की पाणी कुठे आहे. या पद्धतींचा वापर करून तुम्ही तुमच्या शेतामध्ये पाण्यायोग्य जमीन शोधू शकता. शेतामध्ये बोर विहीर करायची असल्यास कोठे करायची हे आपण शोधू शकतो.

जांभूळ, अर्जुन, वेत, हस्तीकर्ण नागकेसर, शतपत्र, कदंब, करंज, सिंदुवार निर्गुंडी, बेहडा किंवा मेहंदी यांचे वृक्ष एखाद्या प्रदेशात असतील तर पंधरा हात खोलीवर पाणी मिळते. वृक्षांच्या किंवा वेलींच्या पानाला छिद्रे असतील तर त्यापासून दूर अंतरावर पाणी असते.
करीर वृक्षातून दूध येत असून, त्याला तांबडे कोंब येत असतील तर त्याच्या खाली पाणी असते.

जमिनीत पाणी कसे पाहावे?

पळस व शमी एकमेकांजवळ वाढून, एकमेकांत गुंतले असतील तर त्यांच्या पश्‍चिमेला पाच हातांवर साठ फूट खोलीवर पाणी सापडते. अडीच हात खोदल्यावर एक सर्प व नंतर वाळूमिश्रित माती असते, त्याखाली पाणी असते.

जर श्‍वेतरोहित वृक्ष वारुळांनी वेढला गेला असेल, तर पूर्वेला एका हातावर सत्तर फुटाच्या खोलीवर पाणी मिळते.

काटेरी शमीच्या दक्षिणेला एका हातावर 77 फूट खोलीवर पाणी सापडते. अडीच हात खणल्यावर एक साप दिसतो. वालुकामय प्रदेशातील लक्षणे कमी पाण्याच्या प्रदेशाला लागू पडत नाहीत. तर ह्या सर्व पद्धती तुम्हाला पाणी शोधण्यासाठी उपयोगी पडतील.

अशाप्रकारे आपण जमिनीत पाणी शोधण्याची पद्धती म्हणजेच Underground Water Searching Method in Marathi पाहले आहे. लेख आवडला असेल तर नक्की share करा.

Leave a Comment