म्हणे माझ्याशी लग्न कर, अन्यथा आत्महत्या करेन; चाकू दाखवून दिली धमकी, गुन्हा दाखल

अमरावती : माझ्याशी लग्न कर, अन्यथा मी आत्महत्या करेन, अशी धमकी देत तरुणाने आपला पाठलाग चालविल्याची तक्रार एका तरुणीने खोलापुरी गेट ठाण्यात नोंदविली आहे. याप्रकरणी २० जानेवारी रोजी जीवन विशाल वानखडे (२३, रा. गांधी आश्रम) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी जीवन वानखडे तरुणीच्या ओळखीचा आहे. काही दिवसांपासून आपल्या मागे येऊन तो लग्नाची मागणी करतो, नकार दिला असता स्वतः च्या जिवाचे बरेवाईट करून घेईल, अशी धमकी देत असल्याचे तरुणीचे म्हणणे आहे. २० जानेवारीला दुपारी ती आत्याकडे जात असताना आरोपीने तिचा पाठलाग करून तिला थांबविले. माझ्या सोबत चल, असा आग्रह त्याने धरला, तिने नकार दिला असता आरोपीने शिवीगाळ केली. चाकू – काढून तिला मारण्याची धमकी दिली. दरम्यान, त्याच्या हाताला झटका देऊन ती आत्याच्या घरी गेली. घरी परतल्यानंतर तिने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यांनी मुलीला धीर देत तिच्यासह खोलापुरी – गेट पोलिस ठाणे गाठले.

Leave a Comment