Weather Update Maharashtra IMD शेतकरी तसेच सामान्य व्यक्ती सुद्धा पाऊस महाराष्ट्रामध्ये कधी येणार याकडे डोळे लावून बसला आहे. कारण पाऊस म्हटलं की आनंद उत्साह. पुढील चार दिवस राज्यामध्ये पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे महाराष्ट्र मधील काही भागांमध्ये रविवारी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावलेली आहे के एस होसाळीकर हवामान विभागाचे अधिकारी यांनी पालघर ठाणे मुंबई या भागांमध्ये पावसाच्या सरी बरसतील अशा प्रकारची माहिती दिली.
महाराष्ट्रात कधी येईल पाऊस?
सध्या बघता महाराष्ट्र वरती कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाला आहे त्यामुळे पश्चिम बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर पास पण निर्माण झालाय त्यामुळे महाराष्ट्रात काही भागात पावसाची शक्यता आहे.
कुठे आहे पावसाचा अंदाज?
गेल्या चोवीस तासांमध्ये मुंबई पालघर नवी मुंबई ठाणे या परिसरामध्ये हलके पावसाच्या सरी पडल्या अशा प्रकारची माहिती भारतीय हवामान विभागाचे अधिकारी केस होसाळीकर यांनी दिली. त्याचबरोबर त्यांचे असेही म्हणणे आहे की याच परिसरामध्ये आजही ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाच्या सरी कोसळतील अशी शक्यता आहे.
मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार?
महाराष्ट्रात विशेषतः सातारा सांगली कोल्हापूर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र मध्ये हवामान विभागाने वर्तवला अंदाजानुसार पाऊस पडू शकतो. डॉक्टर रामचंद्र साबळे हे आयएमडी चे माजी प्रमुख हवामान तज्ञ आहेत त्यांनी या विषयी बोलताना सांगितलं कि, केरळमध्ये मान्सून 3 जूनला दाखल होणार आहे. मात्र महाराष्ट्र राज्याची परिस्थिती पाहता महाराष्ट्रात तो वेळेत न येता 4 ते 5 दिवस उशिरा ही येऊ शकतो.नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून तीन जूनला केरळमध्ये दाखल होईल अशाप्रकारे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे.
यंदाचा पाऊस कसा राहील?
जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या चार महिन्यांमध्ये सरासरीच्या बीबीएम 6 मीमी च्या तुलनेत 2021 मध्ये 103 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे स्कायमेट ने अंदाज दिला आहे की, यामध्ये पाच टक्के कमी किंवा पाच टक्के जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागांमध्ये संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची शक्यता आहे अशाप्रकारचा पावसाळ्याच्या प्रादेशिक कामगिरीवर स्कायमेट चा अंदाज आहे.
गेल्या 24 तासात, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर परीसरात हलक्या पावसाच्या सरी☔ पडल्या.
ढगाळ आकाश ☁☁व हलक्या पावसाच्या सरीची आजही शक्यता.🌦 pic.twitter.com/0xTk7turcL— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 31, 2021