Wine sales in Supermarket | आता सुपर मार्केट मध्ये मिळणार वाईन

Wine sales in Supermarket वाईन खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. राज्यातील सुपर मार्केटमध्ये वाईन मिळणार, असा राज्य सरकारचा मोठा निर्णय…!

राज्य सरकारचा वाईन विक्रीबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करता येणार आहे. तशा प्रकारचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. एक हजार स्केअर फुटाच्या सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करता येऊ शकेल.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सुपर मार्केट, वॉकिंग स्टोअरमध्ये वाईनच्या विक्रीला परवानगी देण्याबाबत प्रस्ताव आला होता. त्यावर हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी यासंबंधीची माहिती दिली.

आतापर्यंत राज्यात वाईनची विक्री ही दरवर्षी 70 लाख लिटरची होत होती. सरकारच्या या नव्या धोरणामुळं हा आकडा 1 हजार कोटी लिटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मात्र, त्या आधी राज्य सरकारनं वाईनवर प्रति लिटर 10 रुपयांचा अबकारी कर जाहीर केलाय. त्यामुळे वाईन थोडी महाग होणार आहे. दुसरीकडे, अनेक बेकरी पदार्थांमध्ये वाईनचा उपयोग राज्यात नवी वाईन पॉलिसी राबवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे आणि त्यादृष्टीनं राज्य सरकारनं आणखी एक पाऊल पुढं टाकलंय. पुढच्या वर्षापर्यंत वाईन उद्योगाचा विस्तार 1 हजार कोटी लिटरपर्यंत वाढवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यादृष्टीनं आता राज्य सरकारनं पाऊलं टाकायला सुरुवात केली आहे.

Read  9 जिल्ह्यांना अतिवृष्टी मदत Ativrushti Madat Maharashtra

या आधीच उत्पादन शुल्कानं आयात व्हिस्कीवरील शुल्क 300 टक्क्यांवरून 150 टक्क्यांवर आणले आहे. आता सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. दुकानात होणाऱ्या वाईनची विक्री ही बीअरच्या धर्तीवर कॅनमधून करण्याची मागणी होत आहे. उत्पादन शुल्कानं या आधीच आयात व्हिस्कीवरील शुल्क 300 टक्क्यांवरून 150 टक्क्यांवर आणले आहे. आता सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

Wine sales in Supermarket ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment