अतिवृष्टी मदत पहा कोणाला मिळेल निघाला जी आर नियम व अटी जाणून घ्या

मित्रांनो बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित ज्याची याची वाट शेतकरी बांधव बघत होते, तो जीआर अखेर नऊ तारखेला निघालेला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून देणारा हा जीआर आहे याच व यानुसार जी मदत आहे, ती सर्व शेतकऱ्यांना सरसकट मिळणार नाही आहे.

काही शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी आहे, या मदती करता शासनाने नियम लावलेले आहेत, तर आपण या लेखात पाहू की, कोणाला ही मदत मिळणार आहे. या विषयी संपूर्ण माहिती या लेखामध्ये आहे. दोन  हप्त्यात ही रक्कम मिळेल.

जीआर मध्ये दिल्यानुसार जून ते ऑक्टोबर 2012 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत देण्याबाबतचा जीआर आहे.  हा जीआर 9 नोव्हेंबर 2020 रोजी निघालेला आहे.

जीआर मध्ये दिलेल्या नुसार राज्यात जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत विविध राज्यांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत करण्यास संदर्भात माननीय मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 23 10 2020 रोजी झालेल्या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयास दिनांक 29 10 2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

Read  Ration Card Online Maharashtra in Marathi | ही राशन कार्ड होणार रद्द?

या संदर्भात संदर्भात दिन क्रमांक नऊ येथील शासन निर्णयान्वये धोरणात्मक आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. बाधीत झालेल्या नागरिकांना मदत देण्यासाठी आवश्यक निधीची मागणी करणारे प्रस्ताव संदर्भाधिंन क्रमांक तीन ते आठ येथील पत्रान्वये शासनास प्राप्त झाले आहेत. राज्य कार्यकारी समितीच्या 3:11 2020 रोजी झालेल्या बैठकीत निधी वितरणात प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

2). या आपत्ती शेती पिकाच्या व बहुवार्षिक पिकाच्या झालेल्या नुकसानीसाठी खालील प्रमाणे खालील दराने मदत देण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

बाब

शेती पिकाच्या व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत

यामध्ये द्यावयाची मदत आहे ती कशी आहे बघू, जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे किमान 33 टक्के नुकसान झाले आहे. अशा बाधित शेतकऱ्यांना शेती पिकाच्या म्हणजेच जिरायत व आश्वासित सिंचनाखालील पिके याकरता नुकसानीसाठी 10 हजार रुपये प्रति हेक्‍टर व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर या दराने दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात यावी.

Read  Pik Nuksan Bharpai 2021 पीक नुकसान भरपाई जाहीर

3). वरील प्रमाणे बाधित नागरिकांना मदतीचे वाटप करण्यासाठी राज्य कार्यकारी समितीने दिनांक 3 /11 /2020 रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार या शासन निर्णय सोबत जोडलेल्या विवरणपत्र मध्ये नमूद केल्याप्रमाणे पहिल्या हप्त्यापोटी एकूण रुपये 229706.37 लक्ष ( रुपये दोन हजार दोनशे सत्त्यांनऊ कोटी सहा लक्ष सदोतीस हजार फक्त)

4). उपरोक्त निधीचे बाधितांना वाटप करताना संदर्भातधीन क्रमांक 12 व 9 येथील शासन निर्णयातील अटी व शर्ती चे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

5) सध्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकांची आदर्श आचार संहिता या विभागात लागू आहे त्या विभागात मदतीचे वाटप करताना आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांनी त्यांच्या क्रमांक 437/LET/ECU/MT-LC&T/2020 9/11/2020 रोजीच्या पत्रान्वये कळविले आहे त्याचप्रमाणे सदर पत्रान्वये भारतीय निवडणूक आयोग क्रमांक 464/INST/2007-PLN-I, दि. 07/01/2007 मधील अटींचे काटेकोर पालन करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.  तसेच सदरची मदत वाटप करण्याबाबत भारत निवडणूक आयोगाने नाहरकत कळवली आहे.

Read  Digital Satbara Utara Download Maharashtra डिजिटल सातबारा उतारा

आपल्याला जर जिल्हावार विवरणपत्र अ पाहायचे असल्यास आपण खाली क्लिक करून ते बघू शकता GR मध्ये जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती व त्यानंतर मिळणारा लाभ लाखात मध्ये दिलेला आहे.

येथे क्लिक करा 

हे आपण वाचले का?

 

 

Leave a Comment