कोणत्या जिल्याकरिता कोणती कंपनी पीक विमा काढणार?

कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारा प्रसारित एक पत्र निघालेले आहे. 20 ऑक्टोबर 2020 रोजी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये रब्बी हंगाम 2020- 21 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. अशा प्रकारचे आव्हान तिथे केला गेलेला आहे.

शासनाने रब्बी हंगाम 2020-21 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. सदर योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना निश्चित करण्यात आलेली असून योजनेमध्ये कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी सहभागी होण्याची मुदत ती रब्बी हंगाम 2020- 21 साठी पीकनिहाय खालील प्रमाणे आहे.

रब्बी ज्वारी यामध्ये सहभागी होण्याची तारीख 30 नोव्हेंबर 2020 आहे, गहू हरभरा आणि कांदा ह्याकरता जर आपल्याला सहभागी व्हायचे असेल तर 15 डिसेंबर 2020 ही तारीख आहे. त्याचबरोबर उन्हाळी भुईमूग किंवा उन्हाळी भात असेल तर याकरता सहभागी होण्याची तारीख 31 मार्च 2021 आहे.

Read  Pik Karj Yojana Vyaj Mafi पिक कर्ज योजना व्याज माफी शासन निर्णय

आता बघू आपण कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणती विमा कंपनी नियुक्त केले गेलेली आहे.

भारती अक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यामध्ये अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर,जळगाव, सातारा या जिल्ह्यांचा समावेश या कंपनीमध्ये आहे.

त्यानंतर रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ह्या मध्ये समाविष्ट असणारी जिल्हे आहेत परभणी, वर्धा, नागपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर, वाशिम बुलढाणा, सांगली आणि नंदुरबार हे जिल्हे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी मध्ये समाविष्ट आहेत

आता बघा पुढची कंपनी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ह्यामध्ये जिल्ह्यात नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, अमरावती आणि गडचिरोली.

पुढची कंपनी आहे एचडीएफसी इरगो इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यामध्ये समाविष्ट जिल्हे आहेत, औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड, हिंगोली, अकोला, धुळे व पुणे या जिल्ह्यांचा समावेश आहे.

Read  अतिवृष्टी मदत पहा कोणाला मिळेल निघाला जी आर नियम व अटी जाणून घ्या

त्याचबरोबर बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये फक्त उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश आहे.

भारतीय कृषी विमा कंपनी मध्ये समाविष्ट जिल्हे आहेत लातूर आणि बीड

अशा प्रकारे वरील प्रमाणे नियुक्त केलेली विमा कंपन्या आणि त्यामध्ये समाविष्ट असलेले जिल्हे वरील प्रमाणे आहेत. योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी बँक व आपले सरकार सेवा केंद्र, म्हणजे CSC यांचेमार्फत विमा कर्ज विमा अर्ज स्वीकारण्यात येतात.

शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पीक विमा संरक्षण मिळण्याचा विहित मुदतीत पूर्वी नजीकचे बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह तसेच आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी www.pmfby.gov.in हे पोर्टल कार्यान्वित केले गेले आहे.

कर्जदार शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकांमार्फत योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करून देणे आवश्यक आहे. जर कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी होणार नसेल तर, तसे त्याने विहित मुदतीत कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेत लेखी कळविने आवश्यक आहे.

Read  पिक विमा मंजुर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा Pik Vima

योजनेतील सहभागासाठी तात्काळ नजीकच्या विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालय तसेच नजीकच्या बँक व आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच सीएससी सेंटर केंद्राशी संपर्क साधावा.

 

 

Categories GR

Leave a Comment