पाऊसाची शक्यता, ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या तूर पिकावर मोठे संकट

शेतकरी मित्रांनो गेल्या तीन-चार दिवस झाले, ढगाळ वातावरण दिसत आहे उत्तर मध्य महाराष्ट्र व पश्‍चिम मध्य प्रदेश व आजूबाजूच्या परिसरात चक्रीय स्थिती निर्माण झालेली आहे.

यामुळे राज्यांमध्ये दोन-तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे तुरीच्या पीकावर संकटाचे ढग अतिशय गडद दिसू लागलेले आहेत आणि त्यामुळे तुरीवर शेंग माशी व शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने तुरीचे पीक नाहीसे होते की काय? अशा चिंतेत शेतकरीवर्ग आहे.

मध्य महाराष्ट्र मधल्या सांगली सोलापूर सातारा या जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरी पडतील, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. तुरीचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परभणी, उस्मानाबाद, लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण क्षेत्रावर लागवड झालेली नाही. गेल्या दोन-तीन दिवसाच्या ढगाळ वातावरणामुळे तुरीवर किडीचा प्रादुर्भाव होत असल्याकारणाने शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढली आहे.

Read  Pik Vima Complaint 2022 | पीक विमा मिळण्याकरिता करावी लागतील 5 कामे

अरबी समुद्राच्या दक्षिण भागांमध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र चक्रीय वाड्यांमध्ये रूपांतरित झाले आहे ते आता उत्तर दिशेला सरकले असून, त्यामुळे पावसासाठी पोषक असे वातावरण बनत आहे. अशा परिस्थितीत रोगांना पोषक वातावरण असेच राहिल्यास शेतकऱ्यांची नुकसान वाढण्याची भीती वाढत आहे.

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पाऊस झाला असून उकाडा वाढला व थंडी गायब झाली चंद्रपूर येथे 17.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. रासायनिक कीटकनाशकांची फवारणी खंड पद्धतीने अथवा पट्टा पद्धतीने केल्यास परोपजीवी कीटकांच्या संवर्धनास मदत होते.अशावेळी कीटकनाशक फवारणी करताना स्वतःची काळजी जरूर घ्यावी. पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे उत्तरेकडील वाऱ्यांना अडथळा निर्माण होत असल्याकारणाने हवेतील गारठा कमी झालेला आहे.

बंगालच्या उपसागरावरून भाजपाचा पुरवठा होत असल्याने राज्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालेले आहे विदर्भातील तापमानात किमान सरासरीच्या तुलनेत 6 अंश सेल्सिअस पर्यंत वाढ झालेली आहे तर किमान तापमान 17 ते 22 अंश सेल्सियस आहे

Leave a Comment