Pik Vima Complaint 2021 पीक विमा मिळण्याकरिता करावी लागतील 5 कामे

मित्रांनो आपल्याला जर पिक विमा pik vima पाहिजे असेल, तर आपल्याला पाच काम करावे लागतील.

पिक विमा Pik Vima मिळण्याकरीता करा ही 5 कामे

या वर्षी पीक विमा करता 25 लाखांच्या वर अर्ज आलेले आहेत. खरीप पिक विमा 2021 आपण भरला असेल तर आपल्याला पाच कामे करावी लागतील.

1) पीक विमा भरणे

मित्रांनो 2021 मध्ये आपण पिक विमा भरला असला पाहिजे. पिक विमा भरल्यानंतर जी मिळालेली पावती आहे ती जपून ठेवून आवश्यक आहे. कारण पुढील काळामध्ये तेव्हा तुम्ही पिक विमा क्लेम करणार तेव्हा ही पावती तुमच्या जवळ असणे गरजेचे आहे.

Read  Underground Water Searching Method in Marathi जमिनीतील पाणी कसे शोधावे?

2) 72 तासांच्या आत क्लेम करा

अतीवृष्टी असेल किंवा पिकावरील किड असेल यामुळे पिकांचे नुकसान झाले असेल, पंधरा दिवसांचा पावसाचा खंड पडला असेल तर आपल्याला 72 तासांच्या आत ज्या पिक विमा कंपनी कडून आपण पिक विमा घेतला असेल त्या कंपनीकडे करणे आवश्यक आहे. क्लेम केल्यानंतर कंपनी कडून तुम्हाला एक डॉकेट नंबर दिला जातो. तो तुमच्याजवळ जपून ठेवणे आवश्यक आहे.

3) क्लेम कसा करायचा?

कंपनीकडे क्लेम करण्याच्या दोन पद्धती आहेत, एक म्हणजे कंपनीच्या टोल फ्री नंबर वर कॉल करून आपण 72 तासांच्या आत आपली नुकसान भरपाई सांगून आपला पीक विम्याचा क्लेम करू शकता. हा टोल फ्री नंबर आपण पिक विमा भरताना ची पावती मिळालेली आहे त्यावर मिळेल आणि दुसरी पद्धती म्हणजे पिक विमा pik vima क्रॉप इन्शुरन्स crop insurance या ॲप वर जाऊन आपल्या शेतातील नुकसानीचा फोटो काढून आपण त्या ॲप वर अपलोड करून आपला पिक विम्याचा दावा करू शकता.

Read  महाराष्ट्रात हिवाळ्यात पावसाची शक्यता ! बुधवार नंतर येऊ शकतो पाऊस

4) कागदपत्रांची पूर्तता करणे

72 तासांच्या आत पिक विमा क्लेम केल्यानंतर ही सर्व टीम तुमच्या शेतामध्ये पिक विमा सर्वे करायला येईल, म्हणजेच आपल्या कागदपत्रांची पडताळणी करायला येईल, त्यांच्याकडे आपल्याला सातबारा, आधार कार्ड आणि पीक विम्याची पावती याच्या झेरॉक्स द्यावे लागतील.

5) 21 दिवसाच्या आत पिक विमा चे पैसे आले की नाही आले ते तपासणे

पिक विमा कंपनीच्या सर्वे टीमकडून आपली कागदपत्रे व्हेरिफाय झाल्यानंतर, त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर पिक विमा कंपनीने आपल्या खात्यावर 21 दिवसांच्या आत पीक विमा रक्कम जमा केली किंवा नाही याची खातरजमा आपल्याला करावे लागेल. जर 21 दिवसांनंतरही तुमच्या खात्यात पिक विम्याची रक्कम जमा झाली नाही तर पीक विम्याची रक्कम व 21 दिवसानंतर चे व्याज तुम्हाला मिळेल. जर असे पिक विमा कंपनीने केले नाही तर आपण जिल्हा कार्यालयात तक्रार करू शकता.

Read  Seeds Safety in Marathi | साठवलेल्या धान्याला अजिबात किडे लागणार नाही, हे करून बघा

तुम्हाला आमचा पिक विमा pik vima 2021 हा लेख आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा. आपल्याला हा लेख कसा वाटला कमेंट जरुर करा आणि हो आमच्या Marathi School मराठी स्कूल व Batmi Marathi बातमी मराठी या ब्लॉगला सुद्धा भेट द्या

One thought on “Pik Vima Complaint 2021 पीक विमा मिळण्याकरिता करावी लागतील 5 कामे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x