Pik Vima Yojana Online Form List Maharashtra 2020-21पीक विमा तक्रार कोणाकडे करणार?

Pik Vima Yojana Online Form List Maharashtra – नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या लेखामध्ये जर आपलं नुकसान झालं असेल आणि आपल्याला तक्रार कोणाकडे द्यायची?  हे माहिती नसेल किंवा आपल्याला पिक विमा रक्कम आहे,  ह्या संभ्रमात आपण असाल? असे बरेच प्रश्न तुम्हाला पडले असतील. पिकाचे नुकसान झाले आहे,  आता आपण कोठे तक्रार करायची? कशी करायची? तर हा लेख तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगून जाईल.

Pik Vima Yojana Online Form List Maharashtra पीक विमा तक्रार कोणाकडे करणार?

मागच्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. पीकविमाा नुकसान भरपाई मिळाली तर कुठे मिळाली नाही.

Pik Vima Yojana धोके-

अशा प्रकारची तक्रार सुद्धा शेतकऱ्यांनी सरकारकडे केली. ह्या वर्षी तर पावसाने कहरच केला आणि त्यात अवकाळी पाऊस यामुळे, यामुळे शेतकऱ्यांचे बरेचसे नुकसान झालेले आहे.

शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की,  पिक विमा भरायचा का नाही भरायचा?  पीकविमा काढून नुकसान भरपाई मिळाली नाही, तर शेतकऱ्यांना हा विचार येणे स्वाभाविक आहे.  परंतु शेतकरी मित्रांनो आपल्या कडून सुद्धा काही चुका होता कामा नये.  कारण पुढे पीक विम्याची रक्कम मिळताना आपल्याला बरचसा त्रास होतो.  सर्वप्रथम आपण पीक विमा योजना काय आहे हे जाणून घेऊ.

घरकुल यादी 2020-21 online कशी बघायची? Gharkul Yojana Yadi Online

pik विम्यात शेतकऱ्यांची स्थिती कशी होते?

विमा काढून त्याची रक्कम मिळाली नाही तर काय करावं हे सुचत नाही? म्हणजे विम्याची रक्कम मिळेल का नाही मिळेल?.  हे शेतकऱ्यांना माहिती नसते मग यासाठी कोणकोणत्या बाबी ध्यानात घेणे आवश्यक आहेत, त्याचाच विचार आपण येथे करणार आहोत

Read  शेतकरी श्रीमंत का नाही? Farmer Information in Marathi

आपण जेव्हा विमा घेतो तेव्हा त्यामध्ये आपण ठोके सुद्धा असतात हे अगोदर समजून घेणे आवश्यक आहे. फक्त आपल्याला विम्याची रक्कम मिळेल या हेतूने आपण विमा काढता कामा नये.  ज्यावेळी विमा भरण्याची वेळ येते किंवा तशा प्रकारचा शासनाकडून शासन निर्णय काढला जातो, तेव्हा त्यात समाविष्ट असणारे धोके आणि फायदे आपण समजून घेतले पाहिजे आणि तरच विमा रक्कम भरली. पेरणी करून जर पीक आले तर चांगले नाही आले तर तो सुद्धा एक धोकाच आहे. पुन्हा पुन्हा लागवड  करून पुन्हा जर पीक वाया गेलं किंवा निघालच नाही तर तोही धोका आहेच किंवा विविध प्रकारच्या कीड़ी आक्रमण तर आहेच.

शेती संकटे-

पीक झालं नाही,  पुढे पीक वाढलच नाही किंवा पावसामुळे नष्ट झालं तर आपण बघतो की शेती पिकावर या ना त्या कारणाने अशी संकटे येतात, कि ती संकटे आपल्याला माहिती नसतात. आता हेच बघा ना जेव्हा सोयाबीनची सोंगणी झाली, त्यावर जर पाणी आले, पीक खराब झालं तर काय करणार?. पीक घरांमध्ये येणार होतो परंतु शेतामध्ये पाणी आल्याकारणाने ते पीक नष्ट होईल. पीक वाहून जाण आहे, सडने आहे.

ह्या सर्व गोष्टी यामध्ये समाविष्ट होतात. म्हणजे हे झाले आपले धोके आणि हे सर्व धोके विमा कंपनीने  विम्यामध्ये मध्ये कव्हर केलेली असतात. मग शेतकरी म्हणून आपण या विमा कंपन्यांच्या धोरणाकडे, नियमांकडे लक्ष देणे किंवा अटी ध्यानात घेऊनच विमा घ्यावा.

शेतकऱ्यांनी कधी क्लेम करायचा?-

आपल्याला जर vima company कडे पंचनामा करावा अशी सूचना करायची असेल तर विमा कंपन्यांकडे 72 तासांच्या आत तुम्हाला तुमचा क्लेम करायचा आहे,  आपण यामध्ये एक गोष्ट ध्यानात ठेवा की, आपण आपल्या जिल्ह्याचा आपल्या तालुक्याचा किंवा आपल्या मंडळाचा विमा ध्यानात न घेता, माझं नुकसान झालेला आहे आणि मी या ठिकाणी माझा क्लेम करणार आहे.  अशा प्रकारची तयारी असली पाहिजे.

Read  Pik Karj Crop Loan | शेतकऱ्यांना मिळणार बीन व्याजी पीककर्ज

क्लेम केल्यानंतर पंचनामा होईल? नाही होईल? ह्या गोष्टीनंतरच्या आहेत,  परंतु आपण क्लेम करणे आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो आपण ज्या  ही कंपनी चा विमा काढला असेल, त्या कंपनी ची पावती आपल्याला मिळते आणि त्या पावतीवर आपल्याला त्या विमा कंपनीचे नाव, त्या कंपनीचा फोन नंबर, त्या कंपनीचा ईमेल आयडी आणि त्या कंपनीचा कस्टमर केअर नंबर किंवा लँडलाईन नंबर तुम्हाला दिलेला असतो.

त्यावर आपण फोन करायचा आहे आणि त्यांना आपली स्थिती समजून सांगायची आहे. परंतु सर्व शेतकऱ्यांना हे जमतं का?  तर नाही, कारण मागच्या वेळेस बऱ्याच शेतकऱ्यांनी एका कंपनीचा विमा घेतला आणि दुसऱ्याच कंपनीला फोन करत बसले, ईमेल पाठवले तर त्याचा कुठलाही उपयोग झाला नाही.

कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवाव्या?-

म्हणून आपल्या पावतीवर  जो फोन नं दिलेला असतो, त्याच कस्टमर केअरला म्हणजे pik vima  कंपनीला आपण फोन केला पाहिजे. काही शेतकरी समजलं नाही तर, थेटे कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये जातात आणि त्यावेळी कृषी अधिकारी यांना हे काहीच माहिती नसल्याने, ते कृषी अधिकारी थेट त्या कंपनीच्या एजंटचा फोन नंबर देऊन टाकतात. शेतकऱ्यांकडून हा फोन लागतो तर कधी लागत नाही.

कधी त्यांचाच नंबर स्विच ऑफ असतो आणि त्यामुळे शेतकरी भांबावून जातो. मग अशावेळी शेतकऱ्यांनी काय करायचं? इकडून तिकडून शेतकरी माहिती जमा करतो  फेसबुक वर,  कोणी व्हाट्सअप वरून. शेतकरी अडचण आणखीनच वाढत जाते अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांना कळत नाही की, काय करायचं?  कुठला मार्ग निवडायचा. कोणा कोणा शेतकऱ्यांचाही प्रॉब्लेम असतो की अकाउंट नंबर चुकतो, आयएफसी कोड चुकते किंवा बँकेचे नाव चुकून जाते किंवा स्वतःच्या नावांमध्ये चूक असते तर अशाप्रकारे सर्व प्रॉब्लेम शेतकऱ्यांना येत असतात.

तक्रार कोणाकडे करावी?-

कोणी कोणी शेतकऱ्यांची ही तक्रार असते की माझा विमामा परत गेला आहे मी काय करायचं ह्यापैकी तुमची कुठलीही तक्रार असो ज्यावेळी आपला विमा काढला जातो त्यावेळी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, विभागीय जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय समित्या नेमलेले असतात.  विमा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी आपल्याला दाद दिलीच नाही,  तर आपली तालुकास्तरीय समिती असते त्या समितीला जाऊन आपण भेटलो पाहिजे.  यामध्ये तहसीलदार हे आपल्या तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष असतात.

Read  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना | Mahatma Jyotirao Phule Shetkari Karjmukti Yojana

त्याचप्रमाणे तालुका कृषी अधिकारी हे सदस्य असतात, त्यानंतर बीडीओ पंचायत समितीमध्ये कृषी अधिकारी असतील,  त्याचबरोबर काही शेतकरी आणि अशा प्रकारे त्या सर्वांनी मिळून एक समिती बनत असते.  विभागीय समिती वरती राज्यस्तरीय समिती असते, ह्या सर्व कृषी समित्यांची निर्मिती याच करता केलेली असते की, शेतकऱ्यांचे काही पिक विमा संबंधित प्रश्न असले किंवा शेती संबंधी प्रश्न असले, तर तेथे मांडू शकतील.

विमा पावती जपून ठेवावी-

आपण जर विमा घेतलेला असेल तर, आपल्या सुद्धा काही प्राथमिक जबाबदारी आहेत म्हणजेच विमा घेतल्यानंतर जी आपल्याला पावती मिळते ती पावती प्रथम जपून ठेवणे, दुसरी गोष्ट म्हणजे की आपण लागवड केली आहे ते क्षेत्र आहे किती आहे.

आपण पिक विमा काढताना सांगितलेलं क्षेत्र, याचा ताळमेळ बसला पाहिजे. खूप शेतकरी चुका करतात आणि त्यामुळे मग .त्यांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. म्हणजेच क्लेम केल्यानंतर पंचनामा झाला तर,  पंचनामा मध्ये तुमचं क्षेत्रफल वेगळे दिसेल. क्षेत्रफळ दोन्ही ठिकाणी एकच असलं पाहिजे म्हणून ह्या चुका करू नका.

म्हणजेच आपलं क्षेत्र आणि आपण जो विमा भरतोय त्या मधलं क्षेत्र हे एकच असायला पाहिजे. जर क्लेम करायचा असेल तर 72 तासाच्या आत करा. काही सीएससी धारकाकडून चुका होतात, म्हणून त्या चुका होऊ नये याकरता शेतकऱ्यांनी जो विमा भरलेला आहे, त्याची त्या विम्यामध्ये आपण सविस्तर माहिती भरलेली आहे का?  अकाउंट नंबर, आयएफसी कोड आहे, इतर माहिती आहे ही सविस्तर भरणे खूप गरजेचा आहे.

यामध्ये दुरुस्त करायचे असेल तर 30 दिवसाच्या आत आपल्याला दुरुस्तीसाठी अर्ज करता येतो. ह्या जबाबदारी आपण पार पाडल्या तर आपल्याला आपल्या विम्यामध्ये कुठलीच तक्रार राहणार नाही. म्हणजेच आपण या Pik Vima Yojana साठी 100% पात्र राहू.

आपण आमच्या अद्भुत मराठी या ब्लॉगला पण भेट द्या

Leave a Comment