वर्तमानपत्रातील बातमी नुसार 2021 या वर्षाचा खरीप पिक विमा 25% दिवाळीपूर्वी येणार खात्यात जमा होणार. म्हणजेच पीक विम्याची 25% रक्कम आगाऊ स्वरूपात दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल.
Kharip Pik Vima 2021
पिक विमा योजना राबवण्यात करता सरकारने प्रत्येक जिल्हा करता एका समितीचे गठन केले होते. या समितीचे अध्यक्ष हे त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असणार. या समितीला काही अधिकार देण्यात आले होते. ज्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होईल किंवा पावसाचा खंड पडेल, अशा मुळे सर शेती पिकाचे नुकसान 50 टक्के पेक्षा जास्त दाखवण्यात आले तर अशावेळी अशा पिकांचे सर्वेक्षण करून समितीच्या माध्यमातून शेती पिकाचे 50 टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आगाव स्वरूपात 25 टक्के पीक विमा दिला जावा. अशा स्वरूपाचे 29 जून 2020 रोजी निघालेल्या पिक विमा योजनेच्या जीआर मध्ये समाविष्ट बाबी आहेत.
पीक विमा
लातूर सोलापूर उस्मानाबाद हिंगोली परभणी जालना नांदेड या बाबीसाठी अधिसूचना काढण्यात आली होती. पुणे जिल्ह्यातील बारामती इंदापूर या तालुक्यासाठी सुद्धा अधिसूचना काढण्यात आली होती. सांगली कोल्हापूर अमरावती अकोला याठिकाणी अतिवृष्टी जून-जुलैमध्ये झालेली होती. याच पार्श्वभूमीवर अधिसूचना काढण्यात आली होती.
अशा प्रकारे ज्या ज्या जिल्ह्यांचे नुकसान झालेला आहे नुकसान झालेल्या आणि अधिसूचना काढलेल्या 23 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना 25 टक्के पर्यंत पीक विम्याचे वाटप केलं जाणार आहे.
नांदेड जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाकरिता सर्व मंडळी पात्र दाखवण्यात आलेली आहेत. खरीप ज्वारी तूर कापूस या पिकांकरिता काही मंडळ पात्र आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मका उडीद बाजरी तूर कापूस याकरता काही मंडळी पात्र दाखवण्यात आलेली आहेत, सर्व मंडळ सोयाबीन या पिकांसाठी पात्र दाखवण्यात आलेले आहेत.
अकोला जिल्हा करता मूग, तूर, उडीद, कापूस, सोयाबीन या पिकांकरिता पीक विमा मिळणार आहे. अहमदनगर जिल्हा करता भुईमूग, बाजरी, कापूस, सोयाबीन या पिकाकरिता पीक विमा लागू असणार आहे. नाशिक जिल्हा करता मका, भुईमूग, बाजरी, कापूस, भात, नाचणी कराळा आणि सोयाबीन या पिकाचा पिक विमा मिळणार आहे.
बीड जिल्ह्यामध्ये मूग, उडीद, सोयाबीन या पिकासाठी अधिसूचना काढण्यात आलेले आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये मूग, उडीद, बाजरी आणि कापूस या पिकासाठी पीक विमा मिळणार आहे. नंदुरबार जिल्हा करता भात, कापूस, सोयाबीन या पिकाकरिता पीक विमा मिळेल. बुलढाणा जिल्हा मका, कापूस याकरता काही मंडळी पात्र असणार आहेत आणि सर्व मंडळ सोयाबीन या पिकाकरिता पात्र असणार आहेत.
औरंगाबाद जिल्हा करता मका, कापूस आणि सोयाबीन या करता अधिसूचना काढण्यात आलेली आहे. पुणे जिल्हा करता बारामती आणि इंदापूर या तालुक्यातील काही निवडक मंडळ बाजरी, भुईमूग, तूर, सोयाबीन या पिकाकरिता पात्र ठरणार आहेत. तूर आणि सोयाबीन करता याव्यतिरिक्त दुसरी अधिसूचना काढण्यात आली तर ते सांगण्यात येईल. हिंगोलीतील उडीद, सोयाबीन या पिकाकरिता काही मंडळ पात्र ठरवण्यात आलेली आहेत.
याचबरोबर धुळे जिल्ह्याकरता उडीद, ज्वारी, बाजरी, मूग पिक विमा देण्यात येणार आहे. सोलापूर जिल्हा सोयाबीन, भुईमूग या पिकाकरिता पात्र ठरवण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली त्यामुळे सोयाबीन या पिकाकरिता सर्व मंडळं पात्र आहेत. लातूर जिल्ह्यांमधील सोयाबीन या पिकाकरिता सर्व मंडळ पात्र आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील भात पिकासाठी तर जालना जिल्ह्यातील सोयाबीन या पिकाकरिता शेतकरी पात्र असणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामधील सोयाबीन, भुईमूग या पिकाकरिता शेतकरी पात्र असतील. परभणी जिल्ह्यातील सोयाबीन या पिकाकरिता 23 मंडळ पात्र होती त्याची अधिसूचना अगोदरच आलेली आहे. सांगली जिल्ह्यामधील सोयाबीन या पिकाला करतात पिक विमा मिळणार आहे. पालघर आणि रायगड जिल्ह्यामधील भात पिकासाठी शेतकरी पात्र असतील.
अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो या 23 जिल्ह्यांमधील शेतकरी वेगवेगळ्या पिकांकरिता पात्र असणार आहेत याकरता शेतकऱ्यांना 25 टक्के रक्कम आगाऊ म्हणून मिळेल तेही दिवाळीपूर्वी.