पी एम किसान योजनेत 6 मोठे बदल, सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर जमा होणार.

पी एम किसान योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर जमा होईल

शेतकरी मित्रांनो किसान सन्मान योजनेत खूप मोठा बदल तर किसान सन्मान योजनेत आपण कोण कोणते बदल सविस्तर पाहणार आहोत. याआधी किसान सन्मान योजने मध्ये काही बदल करण्यात आले होते आता सहा बदल करण्यात आले आहेत तरी शेतकरी मित्रांनो आपले नाव या योजनेतून कमी करण्यात आले का हे पाहणे गरजेचे आहे लवकरात लवकर सातवा हप्ता जमा होणार आहे.

लाखो शेतकऱ्यांना मदत

पीएम किसान योजनेतून आतापर्यंत लाखो छोट्या-मोठ्या शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तरी केंद्र सरकारने या योजनेमध्ये सहा बदल केलेले आहेत . ते आपल्याला पाहणे गरजेचे आहे. केंद्र पी एम किसान योजनेचा आतापर्यंत शेतकऱ्यांना सहा हप्ते मिळाले. आहे तरी सातवा हप्ता शेतकऱ्यांना 1 डिसेंबर 2020 नंतर शेतकऱ्यांच्या खात्यात 2000हजार लगेच जमा होणार आहे. तरी केंद्र सरकार देशभरातील दहा करोड च्या अधीक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देत आहे.
ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत होण्यासाठी केंद्र सरकार राबवत आहे.

Read  PM Kisan Yojana 13 Installment 2022 | पी एम किसान योजना १३ हप्ता २०२२ .

योजनेत केंद्र सरकारने केले 6 मोठे बदल

केंद्र सरकारने पीएम किसान योजनेमध्ये सहा मोठे बदल केले आहेत. तुमच्या खात्यात आतापर्यंत सहा हजार रुपये आले नसतील तर तुम्ही करू शकता तक्रार.

हेल्पलाइन नंबर.155261/1800115526.टोल फ्री. 011-23381092

तुमच्या खात्यात सातवा हप्ता दोन हजार रुपये येण्यासाठी हे बदल करणे गरजेचे आहे. आता एक नवीन मधला केलेला आहे. आता पीएम किसान मानधन योजनेसाठी दस्तऐवज देण्याची गरज नाही पी एम किसन योजनेसाठी सरळ योजनेचा पर्याय निवडू शकता.

पी एम किसान योजना आता जोडले गेले किसान क्रेडिट कार्ड. शेतकरी मित्रांनो आता पीएम किसान योजनेला आपले किसान क्रेडिट कार्ड सुद्धा जोडले गेले आहे आता पीएम किसान योजनेसाठी शेतकर्‍यांना केवायसी बनवण्यासाठी सोपा पर्याय झाला आहे. केवायसी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना सात टक्के व्याजदरावरती लोन मिळणार आहे पण शेतकऱ्यांनी दरवर्षी नेहमीच व्याज भरल्यास शेतकऱ्यांना तीन टक्के व्याज वापस मिळणार आहे. व शेतकऱ्यांना केव्हा अशी मार्फत चार टक्के व्याज भरणार करावा लागणार आहे.

Read  पीक विम्याचे पैसे मिळणार शेतकऱ्यांची निराशा दूर. 85 कोटी पीक विमा मंजूर

आधार कार्ड असणे आवश्यक.

शेतकरयांना पी एम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर. तर शेतकर्‍यांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांकडे आधार कार्ड नाही अशा शेतकरी या योजनेसाठी पात्र धरले जाणार नाही या योजनेसाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

जमीन क्षेत्रफळाची मर्यादा नाही.

पी एम किसान सम्माननिधी च्या सुरुवातीला केवळ दोन हेक्‍टरपर्यंत या योजनेचा लाभ मिळत असे आता दोन एकर ची मर्यादा काढून सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

आता आपणच करा आपले रजिस्टेशन.

पीएम किसान सम्मान निधि चा लाभ घेण्यासाठी आता तुम्हाला कृषी विभाग किंवा कृषी अधिकारी यांच्या जवळ जाण्याची गरज नाहि आता शेतकरी आपले रजिस्ट्रेशन आपले रजिस्ट्रेशन या योजनेसाठी घरी बसूनच करू शकतो आपल्याजवळ सातबारा, आधार कार्ड, मोबाईल नंबर बँक पासबुक ह्या सर्व गोष्टी असणे आवश्यक आहे. आता आपला फॉर्म भरायचा असेल तर(pmkisan.gov.in) या लिंक वर जाऊन आपला फॉर्म भरू शकता.

Read  शेतकरी श्रीमंत का नाही? Farmer Information in Marathi

आपले स्टेटस आपण स्वतः पाहू शकतो.

शेतकऱ्यांनी आपले रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपले स्वतःचे स्टेटस आपण स्वतः चेक करू शकतो जसे की आपण आतापर्यंत आपल्या अकाउंट मध्ये किती हप्ते जमा झाले व किती हप्ते बाकी आहेत हे चेक करायचे असेल तर तुम्हाला पी एम किसान पोर्टल वर आधार नंबर, मोबाईल नंबर ,खाते नंबर (Beneficiary status) याच्यावरती क्लिक करुन आपण आपले स्टेटस स्वतःचेक करू शकता

Leave a Comment