आज आपण पाहणार आहोत फुल शेती कशी करायची?. फुलशेती करून आपण लाखोंचे उत्पन्न मिळू शकतो.
शेतकरी मित्रांनो आज आपल्याला फुल शेती विषयी माहिती जरी कमी असली तरी, त्याविषयी अधिक माहिती मिळवून आपण फुलशेेती केली केेली पाहिजे.
फुलांच्या शेतीविषयी माहिती बघुया-
Table of Contents
गुलाबविषयी सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे
गुलाब :—
सध्या “व्हॅलेंटाईन डे’साठी फुलांची मागणी वाढली असून, डच गुलाबाप्रमाणेच देशी लाल गुलाबाच्या विविध जातींना चांगले दर मिळू शकतात. त्यासाठी गुलाब फुलांच्या काढणीनंतर प्रतवारी व पॅकिंग करून बाजारात पाठवावेत. काढणी बाजारपेठेतील मागणीप्रमाणे कळी अवस्थेत किंवा 1-2 पाकळ्या फुलकळीपासून अलग झाल्यानंतर करावी.
ग्लॅडिओलस –
ग्लॅडिओलसचे दांडे काढणी केल्यानंतर, त्यांची प्रतवारी फुलदांड्यावरील फुलांची संख्या, रंग व दांड्याच्या लांबीनुसार करावी. कंद पोषणासाठी झाडावर कमीत कमी 4 पाने ठेवून दांड्याची काढणी करावी. काढणी केलेल्या पिकास पाणी द्यावे.
शेवंती :—
पूर्ण उमललेल्या शेवंती फुलांची काढणी करावी. शेवंती फुलांची काढणी पूर्ण झाली असल्यास शेवंतीच्या पुढील लागवडीसाठी भरपूर काड्या उपलब्ध व्हाव्यात म्हणून शेवंतीची झाडे जमिनीपासून 15-20 सें.मी. अंतरावर छाटावीत. लागवडीसाठी शेवंतीची रोपे तयार करताना माती मिश्रणाने (1ः1) पिशव्या भरून घ्याव्यात. या पिशव्यात 8-10 सें.मी. लांबीचे शेंडे छाटून लावावेत. छाट्यांना भरपूर मुळ्या फुटण्यासाठी छाट्याच्या बुडाकडील 2-3 पाने काढून छाट्यांची टोके ह्युमिक ऍसिडच्या द्रावणात बुडवून लावावेत.
मोगरा :—
मोगरा पिकाला वेळेत पाणी द्यावे.
उन्हाळी फुलपिके – उन्हाळी हंगामात फुलझाडे (उदा. झेंडू, गॅलार्डिया इ.) लागवडीसाठी जमिनीची पूर्वमशागत करावी.
पॉलिहाउसमधील फुलशेती
पॉलिहाउसमधील फुलपिकामध्ये प्रामुख्याने डच गुलाबांची लागवड असल्यास हा कालखंड फुलांच्या काढणीचा आहे. या काळामध्ये गुलाब दांड्याची काढणी बाजारपेठेतील मागणीप्रमाणे वेळेवर व काळजीपूर्वक करावी.
गुलाबाच्या दांड्याच्या लांबी, फुलांचा रंग, फुलांचा आकार पाहून प्रतवारी करावी. त्यामध्ये पानावरही रोगकिडीचा प्रादुर्भाव नसावा. एका बंचमधील गुलाबांची वीसही फुले एकसारखी व एका पातळीत लावलेली दिसावीत. या फुलांना चांगला दर मिळतो.
तसेच पिकाचे रोगकिडीपासून संरक्षण करतेवेळी पानावर, फुलांवर डाग राहणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
गुलाब, कार्नेशन फुलपिकांमध्ये फुलदांड्यावरील फुट काढून टाकावी.
जरबेराची वाळलेली व रोगट पाने काढून टाकावीत म्हणजे फुलांची प्रत सुधारण्यास मदत होते.
फुलशेतीचे जागतिकीकरण व विक्री व्यवस्थापन
फुलशेती : भारताची जुनी परंपरा
फुलशेती करणे ही भारताची खूप जुनी परंपरा असली तरी सामाजिक सुधारणा आणि विकासाच्या दृष्टीने एक शास्त्र म्हणून फुलशेती अतिशय महत्वाची कामगिरी बजावत आहे. देशाच्या कानाकोप-यात लहान-लहान क्षेत्रावर ती खूप प्राचीन काळापासून होत असली तरी व्यापारी तत्वावरील आधुनिक फुलशेती ही अलीकडची संकल्पना आहे. पूर्वीपासून उघड्यावर फुलशेती केली जात असल्याने त्यांना जैविक तसेच अजैविक घटकांशी सामना करावा लागतो त्यामुळे या पैिकापासून भरपूर दर्जेदार उत्पादन मिळत नव्हते.
आताच्या जागतिकीकरणाच्या युगात मात्र निर्यातक्षम फुलोत्पादनास महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे मागणी तसा पुरवठा या संज्ञानुसार सध्याच्या स्पर्धात्मक युगात उचप्रतेिचे दर्जेदार फुलोत्पादन घेणे क्रमप्राप्त आहे. जगात सध्या फुलांचा व्यापार तेजीत आहे. त्यामध्ये ६ ते २० टक्के प्रतिवर्षी वाढ होत आहे. परंतु फुलांच्या जागतिक बाजारपेठेत भारताचा वाटा अतिशय नगण्य (०.०७ टक्के ) आहे.
गेल्या काही वर्षांमधील फुलशेती विषयी केंद्र शासनाची धोरणे लक्षात घेता मुंबई, पुणे, बेंगलोर, हैद्राबाद, दिर्ली यासारख्या मोठ्या शहरांच्या आसपास अत्याधुनिक फुलोत्पादनासाठी उभारलेल्या उच्च तंत्रज्ञान हरितगृहांची उभारणी वाढ्ल्याचे दिसून येत आहे.
तमिळनाडू हे भारतातील फुलोत्पादनात अग्रेसर असलेले राज्य असून त्याखालोखाल कर्नाटक राज्य आहे. या दोन्ही राज्यांमध्ये भारतात फुलशेतीखाली असलेल्या एकूण क्षेत्राच्या ७५ टक्के क्षेत्र आहे. तसेच कर्नाटकमध्ये बंगळूर शहरात भारतातील पहिले फुलांचे संगणकीकृत लिलाव विक्री केंद्र कर्नाटक अॅग्रो इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनने सुरु केले आहे.
फुलांचे जागतिकीकरण
जगातील बहुतांश देशामधील फुलशेती ही खेळते भांडवल निर्माण करणारा व्यवसाय आहे. फुलपिके व शोभिवंत झाडे ही देशी आणि परदेशी व्यापारासाठी लागवड करण्यास उपयुक्त असून त्यांच्यापासून प्रती एकर मिळणारे उत्पादन हे तुलनात्मकदृष्ट्या शेतीतील इतर नगदी पिके. भाजीपाला पिकांपेक्षा जास्त आहे. शेती उत्पादन हे बाजारात केिलो अथवा फ्रेिंटलमध्ये विकले जाते, परंतु फुलांच्या दांड्यांची विक्री ही नगावर केली जाते. त्यामुळे फुलदांड्यापासून मिळणारे उत्पादन जास्त असते.साधारणत: ग्लॅडीओलस, गुलाब,जरबेरा,कानेंशन, ऑर्केड्स, अॅन्थुरियम इत्यादि फुलांचे बाजारात फुलदांडे सुद्धा विकले जातात.
तुलनात्मकदृष्ट्या फुलपिके ही हंगामी असून लागवडीपासून त्यांना फुलावर येण्यासाठी कमी काळ लागतो. म्हणजे उत्पादकता अवस्था लवकर सुरू होते.
सध्याच्या आधुनिक युगात फुलशेती करणे म्हणजे बाजारात चढ्त्या दराने विक्री होणा-या लांब दांड्याच्या फुलपिकांची शेती करणे असे मानले जाते.
उंच प्रतिची लांब दांड्याची फुले प्रामुख्याने घराच्या आतील भाग सुशोभिंत करण्यासाठी, सभा, संमेलन व समारंभासाठी लागणारे स्टेज डेकोरेशन करण्यासाठी तसेच फुलांचे गुच्छ, पाकळ्या, तुरे इ. तयार करण्यासाठी वापरतात.
भारताच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीत सण व समारंभामध्ये जाई, जुई, मोगरा, अबोली, झेंडू अॅस्टर,शेवंती, गॅलार्डिया इत्यादिंच्या सुट्या फुलांना मोठी मागणी असते आणि असे सण, समारंभ आणि उत्सव भारतात वर्षभर चालूच राहतात.
फुलांचा वाढता उपयोग व्यक्ती जीवनात करण्याला सध्या भारतात वेगळेच महत्व येत आहे. अगदी मानसाच्या जीवनशैलीला फुलांचा उपयोग जोडला जात आहे. असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही. याशिवाय बरीच लोक फुलशेती, लँड्स्केप, हरितगृहातील फुलशेती या महत्वपूर्ण विषयाचे सलागार म्हणून काम करत आहेत. तर काही लोक या विषयाच्या अद्ययावत ज्ञानाचे धडे घेऊन इतरांना प्रशिक्षण देण्याचा व्यवसाय करतात. फुलशेतीतील काही यशस्वी उद्योजक आपल्या या व्यवसायात इतर सुशिक्षित लोकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देताना दिसतात.
याशिवाय फुलशेतीमध्ये संशोधन आणि फुलपिकांचे उत्पादन या व्यवसायामध्येही खूप मोठी संधी आहे. मोठ्या शहरामध्ये सुंदर शहराचे नियोजन, त्याचा आराखडा तयार करणे, आखणी करणे आणि स्मार्ट सिटीची उभारणी करणे ह्या हृलीच्या वाढ्या शहरीकरणामध्ये अतिशय उचप्रतिचा आणि फायदेशीर व्यवसाय झाला आहे. जगामध्ये जवळजवळ १४६ देश फुलांचे उत्पादन व विक्री या व्यवसायामध्ये अग्रेसर आहे.
अशा या व्यापारी दृष्टिकोनातून महत्व असलेल्या फुलशेतीला सध्या सौंदर्याच्या दृष्टिकोनातूनही फार महत्व आलेले आहे. स्मार्ट सिटीची संकल्पना आणि सध्या केंद्र शासनाने भारतातील ४६ शहरांची सुंदर शहरांमध्ये परिवर्तन करण्याची तसेच अनेक स्मार्ट सिटीची उभारणी करण्याची महत्वाकांक्षी योजना सुरू करून त्याअंतर्गत करोडो रुपयांचे उत्पादन देणारा बांधकाम उद्योग नावारूपाला येत आहे. यामध्ये फुलशेती, शोभिवंत झाडे, वनश्री. लॅप्ड स्केपींग हेच मुळात स्थावर मालमत्तेचे तसेच घर व वास्तू मूल्यवर्धेित करण्याचे प्रमुख साधन झाले आहे. त्यासाठी शहरांची निर्मिती ही प्रामुख्याने जैव-सौंदर्यपूर्ण अशी करावयास हवी.
म्हणजेच ती शहरे प्रदूषणमुक्त विकसलेली करणे तेव्हाच शक्य आहे जेव्हा शहरे ही इमारतीने न बहरता झाडझुडपांनी, फुलाफुलांनी, बागबगीचांनी, हिरवाईने नटलेली असायला हवीत. तेव्हाच देश सदृढ व संपन्न होईल. शहराच्या सौंदर्याबरोबर घराचे आंतर्बाह्य सौंदर्य वाढवायला हवे. घरातील सौंदर्य वाढवण्यासाठी शोभिवंत पानाफुलांच्या कुंडीतील झाडांची व फुलांची कल्पकतेने सौंदर्यपूर्ण मांडणी करून घराच्या आतील शोभा वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत.
तर अशाच प्रकारे घर, व्हरांडा, आणि घराच्या सभोंवतालचा मोकळा परेिसर यामध्ये बागेला वेिकसित करुन शोभिवंत घरकूलासाठी कल्पक तापुर्वक सौंदर्यवृद्धी केल्यास घराची किंमत तर वाढतेच परंतु त्याचबरोबर मन प्रफुलित राहून आरोग्यसंपन्न जीवन जगता येते. शुद्ध व खेळती हवा, सुंदर प्रसन्न वातावरण आणि सभोवार पसरलेली हिरवळ माणसाच्या मनाची उमेद वाढवते. मन निरोगी ठेवते. मन निरोगी ठेवण्याचे हे एक प्रभावी माध्यम आहे.
जगामध्ये जागतिकीकरण झाल्यानंतर कृषी क्षेत्रात फुलशेती एक महत्वाचा व्यवसाय ठरला आहे .
कमीतकमी क्षेत्रावर अधिकाधिक उत्पन्न मिळवण्याचे साधन म्हणून अल्पभूधारक असलेला शेतकरी याच्याकडे आकर्षित होत आहे.
जागतिकीकरणामुळे विविध बाजारपेठा फुलांसाठी खुल्या झाल्या आहेत आणि त्यामुळे अनेक देशांमध्ये फुलांची विक्री करण्याची संधी आहे. असे करून त्यातून बरीच परकीय गंगाजळी आपल्या देशात येऊ शकते व शेतक-यासोबतच देशाचीही प्रगती होण्यास मदत होईल. जगभरात फुलशेतीचा विकास १० टक्के दराने होत आहे आणि ५0 पेक्षाही जास्त देश मोठ्या प्रमाणावर फुलांचे उत्पादन व व्यवसाय करत आहेत.
फुलांच्या उत्पादन मूल्यानुसार अमेरिका, जपान, इटली, जर्मनी आणि कॅनडा हे देश अग्रेसर आहेत तर चीन आणि भारतामध्ये फुलांखालील लागवडीचे क्षेत्र जास्त आहे. जगामध्ये जास्तीत जास्त फुलांचा वापर करणाच्या देशांमध्ये युरोप, अमेरिका आणि जपानचा समावेश होतो. परंतु बरेच आफ्रिकन देश आता या क्षेत्रामध्ये आगेकूच करत आहेत व उत्पादन करण्यासाठी एक नवा मार्ग उपलब्ध होत आहे.
आशिया बाजारपेठाच्या जवळ आहे शिवाय निसर्गातच भारतामधील हिवाळा सौम्य आहे. युरोपीन देशामधील हिवाळ्याइतका तो तीव्र नसतो. त्यामुळे अतिशय उत्तम आल्हाददायक वातावरणात उच्चदर्जाच्या फुलांचे उत्पादन घेऊन फुलांची निर्यात करण्यास मोठा वाव मिळतो कारण युरोपमध्ये हिवाळी हंगामातच तेथील महत्वाचे सण व उत्सव साजरे करतात. अशावेळी युरोपातून फुलांना खूप मागणी असते. सध्या युरोपमध्ये मंदीचे वातावरण आहे. तसेच अति थंडीमध्ये वाढणारा उत्पादन खर्च व मजुरांच्या वाढलेल्या समस्या यामुळे बरेच युरोपिअन देश फुलांचे उत्पादन न करता दुस-या देशातून आयात करत आहेत.
भारतात असलेली वातावरणाची विविधता आणि आधुनिक पद्धतीने केलेली शेती ही एक जमेची बाजू आहे आणि त्याचमुळे भारतातून मोठ्या प्रमाणावर फुले उत्पादन करू शकतो व युरोपियन देशांची गरज भागविण्याचे सामथ्र्य त्यामध्ये आहे. फुलांची वाढती मागणी पुरवण्याची क्षमता भारत देशात आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भारतासारखेच काहीचे हवामान असणा-या नेदरलँन्ड, जपान व इस्राईल देशामधील मजुरांपेक्षा भारतातील मजूर १० ते १५ टक्के स्वस्त आहेत.
शिवाय, भारतामध्ये ते सहज उपलब्ध होतात. शेतक-यांचे हित लक्षात घेऊन या गोष्टींचा फायदा उठवण्यासाठी भारत सरकारनेसुद्धा फुलांच्या निर्यातीसाठी काही सोयी व सुविधा पुरवण्याची जबाबदारी घेतली आहे. भारत गॅट करारामध्ये सहभागी झाल्यापासून युरोपियन देशांनी फुले व फुलांचे उत्पादने यांच्यावरील आयातकर जवळजवळ १५ टक्क्यांनी कमी केला आहे.
फुलांचा आंतरराष्ट्रीय बाजार
फुलांचे आंतरराष्ट्रीय बाजार ८ ते १० टक्क्यांनी प्रतिवर्षी वाढत असून फुलांची जागतिक स्थरावरील वार्षिक मागणी ही १०० अब्ज वाढत आहे. दैनंदिन जीवनात जागतिक फुलांचा उपयोग २० टक्क्यांनी उपयोग वाढत आहे. त्यामुळे भारतातील फुलउत्पादकांना भरपूर व दर्जेदार फुलांच्या उत्पादनाचे आव्हान पेलवे लागणार आहे.
भविष्यातील फुलोत्पादनाचे आव्हान पेलण्यासाठी भारत सरकारमार्फत फुलोत्पादनाचा उद्योग वाढावा म्हणून मुंबई, पुणे, बंगलोर, दिली, कोलकता, चेन्नई, हैद्राबाद, नागपूर इ. मोठ्या सर्व जातीधर्माच्या लोकांची वसाहत असलेल्या मोठ्या शहरांच्या सभोवार हा उद्योग वाढावा म्हणून उद्योजक शेतक-यांना मूलभूत गरजा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. अपेडासारख्या सरकारी संस्था फुले व फुलांची उत्पादने निर्यात करण्याच्या व्यवसायिकांच्या व्यवसायवृद्धीसाठी आर्थिकसाह्य करत आहेत.
त्याचबरोबर उच्च तांत्रिक फुलोत्पादन व्यवसायात पडू पाहणा-या नव तरुण शेतक-यांना बँकाची सहज व सुलभ पद्धतीने आर्थिक मदत करण्याची उद्दिष्ट्ये ठरलेली आहेत. या गोष्टींचा फायदा घेऊन पुणे, हैद्राबाद, बंगलोर, दिली, गुरगाव, म्हैसूर, लोणावळा, इ. ठिकाणी १o0 टक्के निर्यातक्षम उत्पादन घेणारी अनेक हरितगृहे शेतक-यांनी व उद्योजकांनी उभारली आहेत.
१०० टक्के निर्यातक्षम फुलोत्पादन करणा-या या संस्थांना सरकारकडून सुध्दा ५० टक्क्यापर्यंतचे अनुदान हरितगृहातील पुष्प उत्पादनांसाठी दिले जात आहे, शिवाय अशा उत्पादनातून निघणा-या मालाला स्थानिक बाजारपेठ उपलब्ध असेल तर ५0 टक्के माल स्थानिक बाजारामध्ये विकण्याची सवलतही या संस्थांसाठी आहे.
निर्यातक्षम फुलोत्पादनाचा उद्योग भारतात वाढावा म्हणून भारत सरकारने उद्योग उभारणीसाठी लागणा-या कच्च्या मालावरील १o टक्के करसवलत दिली आहेत. तसे आयात/निर्यातीवरील या उद्योगाशी निगडीत असलेले नियमही शिथिल केले आहेत.
यामुळे भारतात हरितगृहातील फुलशेती हा उद्योग सध्या नावारुपाला आला आहे. याची कारणेही अनेक आहेत. एक म्हणजे भारताच्या जवळ सिंगापूसारखी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध आहे. भारताचे हवामान या उद्योगाला अत्यंत पोषक आहे. कारण भारताच्या वातावरणात भरपूर सूर्यप्रकाश असून येथील हिवाळा अतिशय कृत्रिम प्रकाश व तापमान याची भारतातील हरितगृहांना गरज पडत नाही
तो त्यांना योग्य प्रमाणात नैसर्गिकरीत्या वर्षभर उपलब्ध होतो. त्यामुळे साहजिकच फुले व फुलोत्पादनांच्या निर्यातीमुळे देशाला २० ते २५ टक्के जास्त परकीय चलन इतर शेती उत्पादनाच्या तुलनेत मिळते. तसेच प्रति हेक्टर उत्पादनही इतर पिकांच्या तुलनेत फुलशेतीपासून जास्तच मिळते.
फुलांच्या निर्यातीत असलेला वाव व फायदे लक्षात घेऊन अपेडा या संस्थेने भारतात नोयडा, बंगलोर, मुंबई या ठिकाणी फुलांचे लिलाव केंद्र स्थापन केलेले आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक केंद्र पुणे येथेसुद्धा लवकरच स्थापन होत आहे. याशिवाय भारतातील पुष्प उद्योजकांना फुले निर्यातीस प्रोत्साहित करण्यासाठी ‘आल्समेर’ (नेदरलँन्ड) येथे फुलांचे बाजारकेंद्र उपलब्ध आहे.
मानवी जीवनातील फुलांचे महत्व व फुलोत्पादनात असलेला वाव लक्षात घेऊन भारत सरकारनेही देशातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून व फुलपिकांवर संशोधन करून त्याचा विकास करण्यासाठी खालीलप्रमाणे प्रादेशिक विभाग पाडले आहेत.
अशा प्रकारे फुलशेतीस असलेले महत्व विचारात घेऊन शेतकरी बंधूनी उच्चतंत्रज्ञानावर आधारित फुलशेती करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्याचा निश्चित प्रयत्न करावा अशाप्रकारे आपण फुलांची शेती चांगल्या प्रकारेकरू शकतो.