मेथी कोथिंबीर लागवड आणि व्यवस्थापन

शेतकरी मित्रांनो आपण अनेक पाल्याभाज्या वापरतो व खातो सुद्धा आज पापण मेथी व मेथी व कोथिंबीर याविषयी पाहणार आहोत.  मेथी हे पालेभाज्यांमध्ये एक महत्त्वाचे पीक आहे मेथीची हिरवी पाने ही भाजीसाठी वापरतात.  मेथीच्या बिया मसाल्यामध्ये आणि लोणच्यामध्ये तसेच भाजी करताना वापरतात मेथीमध्ये औषधी गुणधर्म सुद्धा आहेत.  मेथी मुळे यकृत आणि प्लीहा यांची कार्यक्षमता वाढून पचनक्रिया सुधारते.  मेथी मध्ये क जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात मेथीमध्ये प्रोटीन्स मॅग्नेशियम ,पोटॅशियम ,फॉस्फरस लोह इत्यादी खनिजे सुद्धा आहेत.

मेथी साठी लागणारे हवामान आणि जमीन – मेथी हे एक कमी दिवसात येणारे पीक असून, विविध प्रकारच्या हवामानात मेथी चे पिक घेता येतअसले,  तरी उष्ण हवामानात त्याची वाढ कमी होऊन चांगल्या दर्जाचे भाजी मिळत नाही.  मेथीच्या लागवडीसाठी मध्यम ते कसदार आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असावी लागते.  कारण मेथी हे थंड हवामानात वाढणारे पीक आहे.


मेथीचे सुधारित वाण –


* कसुरी सिलेक्शन – या मेथीची पाने गोलसर लहान असून तिची वाढ सुरवातीला फारच सावकाशपणे होते.  तिची रोपे लहान झुडुप असतात आणि फांद्या आणि नेहमीच्या पेक्षा बारीक असते.  या मेथीची फुले आकर्षक रंगाची असतात.  ही मेथी अधिक सुगंधी आणि स्वादिष्ट असते,  तरी मेथी मध्ये कसुरी सिलेक्शन सुधारित वाण भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली यांनी विकसित केली आहे.

* फुले कस्तुरी – फुले कस्तुरी हे वान महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथुन 2019साली महाराष्ट्रात प्रसारीत करण्यात आले. या मेथीच्या पानांच्या कडा लालसर असतात अधिक फुटवे आणि अधिक उत्पादनशील वैशिष्ट्ये या मेथीचीआहेत मर,  भुरी या रोगाला नाग अळी किडीस मध्यम प्रतिकारक्षम आहे तसेच जीवनसत्त्व आणि तंतुमय पोषणमूल्य भरपूर प्रमाणात आहेत.

बऱ्याच ठिकाणी स्थानिक मेथी ची निवड केली जाते.  त्यामध्ये हिरवी कोवळी लुसलुशीत पाने लवकर येणारे जास्तीत जास्त टिकून राहणे याला महत्त्व दिले जाते . फुले कस्तुरी महाराष्ट्रामधे येणारे उत्तम वाण आहे.

*लागवड – फुले कस्तुरी हे थंड हवामानातील पीक असले तरी,  महाराष्ट्रातील खरीप आणि रब्बी हवामानात घेतले जाते या मेथी ची लागवड खरीप हंगामात जून-जुलै महिन्यात आणि रब्बी हंगामात सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यात करता येते.

*बियाण्याचे प्रमाण – कसुरी मेथी चे हेक्‍टरी 20 किलो बियाणे लागते हे पीक आंतरपीक म्हणून घेतले जाते.  या वेळी बियाणे मात्र कमी प्रमाणात लागते. 


*लागवड पद्धतया मेथीची लागवड सपाट वाफ्यामध्ये वीस ते पंचवीस सेंटिमीटर अंतरावर ओळीतून पेरून किंवा बी फेकून करतात आंतरपीक म्हणून मेथीचे पीक घेताना मुख्य पिकातील मोकळ्या जागेत 20 ते 25 सेंटिमीटर अंतरावर ओळीत पेरावे.

Read  Maharashtra 12th Result 2021 12वी निकाल

या मेथीच्या लागवडीसाठी तीन बाय दोन मीटर आकाराच्या किंवा त्यापेक्षा अधिक लांबीचे सपाट वाफे तयार करून त्यात डाबी फेकून किंवा ओळीत पेरणी करता येते.  पेरणीनंतर कसुरी मेथी उगवण्यासाठी सहा ते सात दिवस लागतात .

खते आणि पाणी व्‍यवस्‍थापन पानांची आणि झाडांची चांगली वाढ होण्यासाठी शेतीमधे खताची आवश्‍यकता असली तरी,  हे शेंगवर्गीय कुळातील पीक असल्यामुळे सुरुवातीला जमीन तयार करताना एकरी 10 ते 12 टन शेणखत 20 किलो नत्र त्यानंतर 15 दिवसांनी खुरपणी करून घ्यावी .

20 किलो नत्र दिल्यास पिकाची वाढ जोमदार होते.  पेरणीनंतर तीन आठवड्यांनी दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. तसेच या मेथीला नियमित पाणी देणे आवश्‍यक आहे पाण्याचा योग्य पुरवठा केला तर उत्पादन मिळते 4 ते 5 दिवसांच्या अंतराने पाणी देत रहावे.

मेथीवरील महत्वाचे रोग , किड आणि त्यांचे नियंत्रण-

मेथी वर पाने खाणारी अळी (लीप मायनर) आणि मावा या किडींचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळतो.  मावा किड काळसर रंगाचे असून पानाच्या खालच्या भागावर आणि शेंड्यावरून मोठ्या प्रमाणात पानातील रस शोषून घेते.  त्यामुळे रोपे निस्तेज होऊन रोपांची प्रत खराब होते.  पाने खाणारी ही पानावरील रस शोषून घेत वेडीवाकडी पुढे पुढे जाते.  त्यामुळे पानावर पांढरया रंगाच्या वेड्यावाकड्या रेषा दिसतात आणि रोपाची प्रत खराब होते.

Read  Online Application Driving License at Home आता ड्रॅविंग लायसेन्स बनवा घरबसल्या

या किडीच्या नियंत्रणासाठी पीक लहान असताना 10 लिटर पाण्यात डायमीथोएट मिसळून फवारावे तसेच पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी केली तरी चालेल पी काढण्याची आठ दिवस आधी औषधे फवारू नयेत मेथीच्या पिकावर रोगाचा फारसा प्रादुर्भाव होत नाही मात्र काही वेळा मर रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसतो या रोगाच्या नियंत्रणासाठी पिकाची फेरपालट करावी . कोथिंबीर लागवड

पिकामध्ये कोथिंबीर ला विशेष मागणी आहे पालेभाज्या हे पीक देशातल्या सर्वच राज्यांमध्ये घेतले जाते.  ते एक महत्त्वाचे पीक असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये कोथिंबिरीला भरपूर मागणी असते.

कोथिंबीर साठी हवामान आणि जमीन

कोथिंबीर या पिकाची लागवड कोणत्याही प्रकारच्या हवामानात करता येते.  यामुळे पावसाचे प्रदेश वगळता महाराष्‍ट्रातील हवामानात वर्षभर कोथिंबीर ची लागवड करता येते.  उन्हाळ्यात तापमान 36 अंश सेल्सिअसच्या वर गेल्‍यास कोथिंबीरीची वाढ कमी होते.  कोथिंबीरीच्‍या पिकासाठी मध्यम कसदार आणि मध्‍यम खोलीची जमीन निवडावी सेंद्रिय खते भरपूर प्रमाणात असल्यास हलक्‍या किंवा भारी जमिनीत कोथिंबीरीचे पीक चांगले येते.

*कोथिंबिरीच्या सुधारित वाण –

*कोकण कस्तुरी – कोकण कस्तुरी हे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथून 2013 मधे प्रसारित करण्यात आली,  ही जात अधिक सुगंध देणारी व पानांची संख्या जास्त असणारी ही जात अधिक उत्पादन देणाऱ्या हिरव्या पानांसाठी तसेच रोग व किडींपासून मुक्त राहून रब्बी आणि उन्हाळी लागवडीसाठी अतिशय उपयुक्त आहे .

*को-1. – हे वान तमिळनाडू कृषी विद्यापीठाने विकसित केलेले असून या वाणाचे 40 दिवसात हेक्‍टरी दहा टन कोथिंबिरीचे उत्पादन मळते.

*को-1 लागवड पद्धत या कोथिंबीरीच्‍या लागवडीसाठी शेतात उभे आडवे चांगले नांगरले पाहीजे.  जमीन भुसभुशीत करून तीन बाय दोन मीटर आकाराचे सपाट गादीवाफे करुन घ्यावेत प्रत्येक वाफ्यात आठ ते दहा किलो चांगले कुजलेले शेणखत टाकून मिसळून घ्यावे.  वाफे सपाट करून त्यात बी एक सारखे पडेल या बेताने फेकून द्यावे.

Read  Gas Cylinder Subsidy गॅस सिलेंडर सबसिडी

तसेच उन्हाळी हंगामात पेरणीपुर्वी वाफे चांगले भिजवून घ्यावेत.   वाफ्यात ओलावा आल्यावर बियाणे पेरावे कोथिंबीरीच्‍या लागवडीसाठी हेक्‍टरी 60 ते 70 किलो बी लागते पेरणीपूर्वी बियाण्यावर चांगली उगवण होण्यासाठी प्रक्रिया करणे आवश्‍यक आहे.  पेरणीपूर्वी धने फोडून बिया वेगळ्या कराव्यात यासाठी धने लाकडी फळीने रगडून बी वेगळे करावे.  तसेच पेरणीपूर्वी बी 12 तास पाण्यात भिजत ठेवावेत आणि नंतर लागवडीसाठी वापरावे,  त्यामुळे उगवण 15 ते 20 दिवस दिसत असून कोथिंबीरीच्‍या उत्‍पादनात वाढ होते .

*खते आणि व्यवस्थापन –  या कोथिंबीर वाहनाच्या पिकाच्या चांगल्या आणि त्याच्या दरवाढीसाठी बी पेरणी करताना हेक्‍टरी 10 ते 12 टन शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. कोथिंबीरीच्‍या पिकाला पेरणीच्या वेळी 50 किलो 15.15.15. मिश्रखत द्यावे.  बी उगवून आल्यावर 20 ते 25 दिवसांनी हेक्‍टरी 40 किलो नत्र द्यावे.  अधिक उत्पादन घेण्यासाठी कुरबनी नंतर तीन बाय दोन मीटर आकाराच्या वाक्यात लागवड करावी कोथिंबिरीला पाणी जास्त लागत असल्यामुळे पाच सहा दिवसांनी पाणी देत राहावे अशाप्रकारे शेतकरी आपल्या पिकात वाढ करुन अधीक्षक उत्पादन घेवुन शकतात.

अशाप्रकारे मित्रांनो आपण कोथिंबीर व मेथीची उत्कृष्ट रीत्या लागवड करून भरगोस उत्पन्न काढू शकतो,  म्हणून हा लेख आवडला असेल तर, जरूर आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत WhatsApp  Facebook ला पाठवा. आमचे ब्लॉग ला नेहमी भेट देत चला.  आपल्याला या ब्लॉग वर उपयोगी अशी माहिती मिळणार आहे, आपण आम्हाला comment करून सांगू शकता की आपल्याला शेतीविषयक कोणती माहिती हवी आहे.  आम्ही त्याच प्रकारची माहिती नक्की देऊ.  ब्लॉग भेट दिल्याबद्दल आपले धन्यवाद !

आमचे  खालील अन्य लेख सुद्धा वाचा 

शेळीपालन करून मिळवा लाखो रुपये 

रब्बी फळपीक विमा योजना 2020-2021, 2021-2022, नानासाहेब कृषी संजीवनी योजना POCRA

प्रधानमंत्री पिक विमा योजना 2020 ते 2021 व 2022 ते 2023

द्राक्ष बागेतील फळे छाटणी व त्यानंतर करायचे व्यवस्थापन

Leave a Reply

Your email address will not be published.

x