राज्य सरकारच्या वतीने वेश्याव्यवसायातील महिलांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे. कारण या महिलांकरता शासनाने एक जीआर पारित केलेला आहे. या शासन निर्णयामुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधी करता प्रत्येक महिन्याला या महिलांना 5 हजार रुपये मिळणार आहेत.
त्याचबरोबर ज्या महिलांची मुलं शाळेमध्ये जातात अशा महिलांना अतिरिक्त अशी 2500 रुपयांची मदत सुद्धा सरकारने जाहीर केलेली आहे. 26 नोव्हेंबर 2020 रोजी चा हा शासन निर्णय आहे. महिला व बाल विकास कार्यालयाने हा शासन निर्णय जारी केला आहे.
शासन निर्णय मध्ये काय बघा-
वेश्याव्यवसाय मध्ये कार्यरत महिला व त्यांच्या मुलांना माहे ऑक्टोबर 2020 ते माहे डिसेंबर 2020 या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये अर्थसहाय्य म्हणून बत्तीस जिल्ह्यांमध्ये एकूण 51.18 कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत.
जि आर मध्ये जिल्हावार यादी सोडलेली आहे आणि त्या जिल्ह्यांना किती किती रुपये मिळणार आहेत हे त्यामध्ये व्यवस्थित दर्शविण्यात आलेले आहे.
आता आपण बघू की, कोणत्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे त्या जिल्ह्यातील जे विद्यार्थी आहेत जे महाविद्यालयामध्ये शिकतात त्यांचे परीक्षा शुल्क कसे माफ होणार आहे.
शासनाने त्याबाबत 26 नोव्हेंबर 2020 रोजी शासन निर्णय केलेला आहे. या शासन निर्णया प्रमाणे दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या तालुक्यांमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता परीक्षा शुल्क माफ करणे बाबत.
महाराष्ट्रातील बऱ्याच तालुक्यांमध्ये दुष्काळ पडलेला होता आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कटलेले होते. म्हणून अशा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना त्यांची महाविद्यालयीन फि माफ करून सरकारने एक प्रकारे मदतीचा हात पुढे केलेला आहे.
21 नोव्हेंबरला जो शासनाने जीआर काढला होता, त्यामध्ये फक्त 325 तालुक्यांचा समावेश होता. आता शासनाने नवीन जीआर पारित केलेला आहे आणि त्यामध्ये तालुक्यांची संख्या म्हणजे जवळजवळ 24 तालुके समाविष्ट केले आहेत. आता 349 तालुक्यांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
34 जिल्ह्यांमधील 349 तालुके या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. पूर्ण जीआर बघण्यासाठी आपल्याला maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन पूर्ण GR बघता येईल.