विज पडण्यापासून स्वतःला वाचण्याच्या काही सोप्या पद्धती

विज पडण्यापासून वाचण्याचे महत्त्वाच्या काही सोप्या पद्धती आपण जाणून घेऊया.

वीज का पडते? हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्यावेळेस जमीन गरम झालेली असते, त्यावेळेस थंड हवा गरम होते. त्यामुळे ती हलकी होते आणि वर ढकलली जाते. पुन्हा दुसरी थंडी हवा येते. ती जळ असल्यामुळे ती खाली असते. त्यामुळे दवबिंदू मध्ये तयार होते आणि या दवबिंदुपासून एक वातावरण तयार होते.

म्हणजेच ऋण प्रभार आणि धन प्रभार तयार होते. त्यामुळे धन प्रभारा कडून ऋण प्रभाराकडे वीज लवकर पडू शकते. हेच कारण आहे वीज पडण्यासाठी.

जमिनीच्या वाफेचे ढगांमध्ये रूपांतर होते आणि ढगांचे एकमेकात घर्षण झाली की तेथे वीज निर्मिती होते.  वीज ऋण प्रभारा कडे आकर्षित होते, हे सविस्तरपणे थोडं लक्षात यायला पाहिजे.

पृथ्वीवर केवळ 5 टक्के वीज पडत असतात. त्यापैकी 95 टक्के वीज ढगातच लुप्त होतात.  वीज तीन प्रकारची असते.  म्हणजे जी वीज ढगातल्या ढगात तयार होते त्याचा आवाज जास्त प्रमाणात येत नाही.  दुसरा विजेचा प्रकार म्हणजे वीज एका ढगाकडून दुसऱ्या ढगाकडे जात असतांना दिसते.

ढगांचे थोडाफार घर्षण होते व आपल्याला आवाज ऐकू येतो. तिसरा प्रकार म्हणजे ढगापासून ते जमिनीपर्यंत वीज पडणे. पृथ्वीवर येणारी वीज खूप धोकादायक असते. ती पृथ्वीवर सृष्टीला हानि पोहोचू शकते.

Read  Yaas Chakriwadal Mansoon in Maharashtra- 3 ते 4 दिवसात मुसळधार पाऊसाची शक्यता

ही वीज येत असताना प्रथम तापलेला लाईट किंवा लख्ख प्रकाश दिसतो आणि काही मायक्रो सेकंदातच लुप्त होतो. थोड्या वेळाने आवाज येत असतो म्हणजेच असे का होते? तर प्रकाशाचा वेग हा आवाजाच्या वेगापेक्षा वेगाने असतो. त्यामुळे आपल्याला आधी प्रकाश दिसतो आणि नंतर चार-पाच सेकंदाने आवाज ऐकू येतो.

वीज आघात कश्या कशाप्रकारे करू शकते, तर थेट ते आपल्या अंगावर पडू शकते. ती पडू नये म्हणून यासाठी भरपूर उपाय आहेत. एखाद्या झाडावर ती वीज पडू शकते आणि आपण जर त्या विजेच्या प्रभावात आलो तर आपल्याला सुद्धा त्यापासून हानि होऊ शकते.

दूर कुठेतरी वीज पडली, परंतु आपल्या पायाखाली जमिनीतून वायर, तार गेली असेल तर त्या वायरच्या, तारिच्या मार्फत आपल्याला अपघात करू शकते.

ही काळजी कशी घ्यायची, ते आपण पाहणार आहोत.  या अगोदर काही लोकांचे गैरसमज आहेत ते आपण दूर करूया.  काहींचे म्हणणे असते की, देवीचा प्रकोप झाला म्हणजे वीज पडते. असं काही नाही वीज पडणे ही एक नैसर्गिक आपत्ती आहे.  पायाळु व्यक्तीच्या अंगावर वीज पडते असं बऱ्याच लोकांचे म्हणणे असते, असही काही नाही.  बऱ्याचदा म्हटले जाते कि, एकदा वीज पडल्यानंतर पुन्हा तिथे वीज पडत नाही परंतु असं नाही.

Read  राज्यात पुन्हा पावसाचा तडाखा Hawaman Andaz Maharashtra

मित्रांनो एकदा पडलेल्या ठिकाणी वीज पुन्हा पुन्हा शकते. विजेपासून आपण स्वतःला वाचण्यासाठी काय केलं पाहिजे?  त्या गोष्टीची आपण पहिल्यांदा काळजी घेतली पाहिजे. आपण शेतामध्ये असतो, वातावरण कधी बदलेल आणि विज कधी पडेल हे सांगता येत नाही.  जोराचा पाऊस चालू असताना झाडाखाली उभे राहणे धोक्याचे असते.  त्यामुळे आपण एखाद्या झोपडीचा सहारा घ्यावा झाडाखाली का बसायचं नाही तर, झाडांची पाने एक एकमेकात घर्षण होत असतात आणि त्यामुळे ऋण प्रभार तयार होतो.

त्यामुळे धन प्रभाराकडून, ऋण प्रभाराकडे वीज आकर्षित केले जाते. वीजा पाहून काही लोक पळत सुटले तर काय होते, पळताना जमिनीवरील गवत आहे त्याच्यामध्ये घर्षण होऊन ऋण प्रभार तयार होतो. पडणारी वीज हे धन प्रभार कडून जमिनीकडे आकर्षित होते. एक गोष्ट म्हणजे वीज पडताना घाबरायचं नाही आणि तिथून धावायचं नाही.

तर दोन पायावर किंवा गुडघ्यावर बसा आणि पायाखाली एक कोरडे लाकूड घ्या जमीनीला आपल्या शरीराचा कोणत्याच अवयव स्पर्श होता कामा नये, याची दक्षता घ्यावी. यामुळे आपण विजेपासून स्वतःचा बचाव करू शकतो.  मोकळ्या मैदानात जास्त प्रमाणात वीज पडू शकतात. एका ठिकाणी चार-पाच जण बसले असतील आणि विजा चमकत असतील तर जवळजवळ व्यक्तीमध्ये पंधरा-पंधरा फुटाचे अंतर ठेवावे.

Read  Underground Water Searching Method in Marathi जमिनीतील पाणी कसे शोधावे?

वीज पडण्याचा धोका आपल्याला टाळता येऊ शकतो. त्याचबरोबर शेतामध्ये वीजेचा तार किंवा खांब असतात किंवा टावर असेल तर त्याच्याजवळ सुद्धा उभे राहायचं नाही किंवा बसायचं नाही. कारण हे धातूची बनलेली असतात. त्यामुळे वीज लवकर आकर्षित होते.

शेताभोवती तारेचे कुंपण असेल तर तेसुद्धा वीज आकर्षित करते. त्याच्या आसपास उभे राहायचं नाही. विजांचा कडकडाट होत असताना, आपल्या स्वतःचा मोबाईल असेल तर तो बंद करून ठेवावा. कारण की मोबाईल टावर ला कनेक्ट असल्यामुळे मोबाईल वर वीज पडण्याची शक्यता जास्त असते.

या सावधानी बाळगल्यामुळे तुम्ही या पद्धतीने विजेपासून स्वतःचे संरक्षण करू शकता. हा प्रसंग आला तर घाबरून न जाता या प्रसंगांना सामोरे जावे. हे साधे सोपे उपाय केल्यामुळे वीजे मुळे होणारे मृत्यूचे प्रमाण खूप कमी होईल.

हे आपण वाचले का?

Leave a Comment