शेतकरी आंदोलन-केंद्राने जे तीन कृषी कायदे केलेले आहेत, त्याविरोधात शेतकरी असून, तिन्ही कायदे रद्द करावेत अशी शेतकरी संघटनेची भूमिका आहे. आता शेतकऱ्यांचे देशव्यापी आंदोलन सुरू झाले असून, आंदोलन तीव्र करण्याचे स्पष्ट संकेत शेतकरी संघटनांनी दिले आहेत. अखिल भारतीय शेतकरी संघर्ष कृती समितीने 5 तारखेच्या टप्प्यातील चर्चेच्या पूर्वसंध्येला आजच्या बैठकीनंतर 8 डिसेंबरला भारत बंद ची हाक दिलेली आहे आणि त्यामुळे बैठकीत सरकारचे प्रतिनिधी कायदे दुरुस्तीवर चर्चा करतील तर आंदोलनाची व्याप्ती प्रचंड स्वरूपात वाढवण्याचा निर्णय संघटनांनी घेतला आहे. यामध्ये मालवाहतूक दारानेही 8 तारखेपासून बेमुदत संप करत असल्याचे जाहीर केले आहे.
शेतकरी आंदोलन-“जनता कर्फ्यु”
आंदोलन वाढत जात असून आपण बघतो की, 9 व्या दिवशीही आंदोलकांची संख्या सतत वाढत होती. मध्य प्रदेश, महाराष्ट्रासह, गुजरात आहे दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये शेतकरी आंदोलन स्थळी दाखल होत आहेत. दिल्लीमध्ये नोयडा, चिल्ला, टिकरी, सिंधु, सिरहोल, गाजियाबाद येथील सीमा वाहतूक पोलीसांनी बंद केल्या आहेत.
दिल्ली पोलीस ठीकठिकाणी वाहनांची कसून तपासणी करत आहेत. त्यामुळे दिल्लीमध्ये वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. पोलीसांनी उभारलेले अडथळे अनेकदा शेतकऱ्यांनी तोडले आहेत. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी आता लोखंडी अडथळा बरोबरच सिमेंटचे जड अडथळे रस्त्यावरती उभे केले आहेत. कारण जंतर-मंतर कडे जाणाऱ्यांची संख्या अधिक असल्याकारणाने ह्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे.
5 तारखेला अदानी, मोदी आणि अंबानी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात येईल व 8 तारखेपासून ‘भारत बंद’ म्हणजेच शेतकर्यांचा जनता कर्फ्यू पुकारण्यात येईल, अशी माहिती समन्वयक संदीप गिड्डे पाटील यांनी दिली आहे.
भारतीय किसान युनियन चे महासचिव एच. एस. लाखोवाल यांनी सांगितले की, सरकारकडून उद्या पुन्हा कायदा दुरुस्ती हा शब्द आम्हाला ऐकायचा नाही आहे. दुरुस्ती नको, तर कायदाच रद्द पाहिजे आहे. असं त्यांचं म्हणणं आहे. तीनही कायदे रद्द झालेच पाहिजे त्याशिवाय आम्ही पुढे चर्चा करणार नाही, असे भारतीय किसान महासंघाचे नेते राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. उद्याच्या चर्चेमध्ये आम्ही ठरू की आम्हाला पुढच्या चर्चांमध्ये सामील व्हायचे का नाही.
योगेंद्र यादव म्हणाले की 8 तारखेनंतर एका दिवशी आम्ही शेतकरी नेते निश्चित करतील. त्या दिवशी देशातील सारे टोलनाके मुक्त करू. त्याचबरोबर अखिल भारतीय शेतकरी काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेंद्र सोळंकी म्हणाले की, तिन्ही काळे कायदे जर मागे घेतले नाहीत तर आम्ही हे कायदे मंजूर झाली आहेत, त्या दिवसापासून पंतप्रधानांना अनेकदा पत्र लिहिली आहेत. आमच्या संघटनेतर्फे 5 तारखेला देशव्यापी शेतकरी धरणे प्रदर्शन आयोजन करण्यात आलेले आहे. 8 तारखेस देशव्यापीशेतकरी आंदोलन-“जनता कर्फ्यु” करू.