देशातील प्रत्येक नागरिकाला वाटते की आपले घर हे स्वतःचे व्हावे व पक्के व्हावे त्यासाठी सरकार घरकुल योजना राबवते ही योजना दरवर्षी राबविल्या जाते या अंतर्गत देशातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबाला स्वतःच्या घरासाठी अनुदान दिले जाते याची यादी 2023 म्हणजेच नवीन वर्षाची यादी प्रकाशित झाली आहे येथे आपण ही यादी डाऊनलोड कशी करायची या निगडित माहिती पाहणार आहोत. प्रधानमंत्री आवास योजना ही योजना देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे या योजनेच्या माध्यमातून गोरगर्जूना घरेही उपलब्ध होत आहे. या योजनेमध्ये दोन प्रकार पडतात जसे शहरी आणि ग्रामीण प्रधानमंत्री आवास योजना ही ग्रामीण भागाद्वारे प्रकाशित केली जाते.
खालील दिलेल्या लेखनुसार आपण आपली यादी डाऊनलोड करून शकतो.
चला तर खाली पाहूया ही यादी डाऊनलोड कशी करावी.
सर्वप्रथम खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून वेबसाईटवर जावे तुम्ही वेबसाईटच्या होम पेजवर गेल्यावर त्यामध्ये तुम्हाला awaassoft हे ऑप्शन दिसणार आहे यावर क्लिक केले असता रिपोर्ट ऑप्शन येईल यामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे रिपोर्ट दिसते त्यामध्ये सोशियल ऑडिट रिपोर्ट यावर क्लिक करा.
आपल्या गावाची घरकुल यादी पाहण्यासाठी बेनिफिशियरी डिटेल्स ऑफ वेरिफिकेशन या पर्यायावर क्लिक करून नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये सर्वप्रथम आपले राज्य निवडावे त्यानंतर आपला जिल्हा निवडावा व त्यानंतर तालुका निवडावा तेथे तुमच्या तालुक्यातील गावाची यादी तुम्हाला पाहायला मिळेल गाव असेल तर गावही त्या ठिकाणी निवडावे.