वेलवर्गीय पालेभाज्या पिकावरील कीड रोग आणि व्यवस्थापन

महाराष्ट्रामध्ये बागायती शेती असणारे शेतकरी वेलवर्गीय पालेभाज्या पिकांना प्राधान्य देतात. पालेभाज्यांची लागवड देशात सर्वच राज्यांमध्ये केली जाते, आणि महाराष्ट्र राज्यात सोलापूर नाशिक, सातारा ,कोल्हापूर ,अकोला ,औरंगाबाद ,नागपूर, परभणी ,अहमदनगर ,पुणे, नाशिक येथे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते त्यामध्ये तांबडा भोपळा, दुधी भोपळा ,कारले, दोडका, घोसाळी पडवळ ,टिंडा , कलिंगड ,काकडी असे नानाविध प्रकारचे वेलवर्गीय पालेभाज्या पिके घेतलीजातात.

वेलवर्गीय पालेभाज्या पिकात सुरुवातीला पानातील रस शोषणाऱ्या किडी.  उदाहरणार्थ फुलकिडे मावा पांढरी माशी लाल कोळी तसेच तांबळे आणि काळे भुंगेरे पाने खाणारी अळी फळमाशी अशा किळी सर्वत्र प्रामुख्याने आढळून येतात. मावा फुलकिडे पांढरी माशी व तांबडे कोळी यांची ओळख नुकसानीचा प्रकार व त्यांचे नियंत्रण शेतकऱ्यांना माहीत असणे आवश्यक आहे.  त्यासाठी खालील बाबी जाणून घेणे शेतकऱ्यांच्या शेतीच्या हितावह ठरते.

* पांढरी माशी –

पांढऱ्या माशीची अंडी किंवा पिल्ले हे वेलाच्या पानाच्या खालच्या बाजूस असतात पांढऱ्या माशीची पिल्ले ही पिवळसर आणि अतिशय सूक्ष्म असतात.  ही सामान्यतः डोळ्यांनी दिसत नाहीत.

एक पूर्ण वाढ झालेली पांढरीमाशी मात्र डोळ्यांनी पूर्णपणे दिसू शकते पांढरी माशी या किडीच्या जीवनक्रम पिल्ले अंडी, कोश, आणि प्रौढ अवस्था असतात . ही पानांच्यामागील बाजूस अंडी घालत असल्यामुळे ते अंडी सहज दिसत नाहीत आणि मादी साधारण 100 अंडी एकाच वेळी देते .

या अंड्यातून पिल्ले बाहेर पडण्यास मात्र चार ते पाच दिवसाचा कालावधी निश्चित लागतो. आणि पिल्लांची पूर्णपणे वाढ होण्यास दहा ते चौदा दिवसांचा कालावधी लागतो. अशाप्रकारे पानाच्या मागील बाजूस या किडीच्या अनेक पिढ्या तयार होतात.  वेलवर्गीय पालेभाज्या लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र पांढरीमाशी या किडी बद्दल संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.

पांढऱ्या माशी मुळे होणारे नुकसान –

या किडीची पिल्ले व प्रौढ पानांतील रस शोषून घेतात त्यामुळे पाने पिवळी पडू लागतात.  तसेच पांढरी माशी शरीरातून गोड पदार्थ बाहेर सोडत असते यामुळे पानावर काळ्या बुरशीची वाढ होते,  व पाण काळी पडतात पर्यायाने कर्बग्रहण क्रिया मंदावते प्रत्यक्ष नुकसानीपेक्षा किडीमुळे रोगाचा प्रसार होऊन जास्त नुकसान होते .

* मावा –

 ही कीड हिरवट पिवळसर आणी लहान असून पानाखाली मोठ्या संख्येने आढळून येते पिल्लांना पंख नसतात परंतु प्रौढांना पंख असतात.  मावा कीटकांमध्ये अंडी पिल्ले आणि प्रौढ अवस्था असतात परंतु बऱ्याच वेळा अंडी न घालता मध्ये पिल्लांना जन्म देते .

मावा मुळे होणारे नुकसान –

Read  Adhaar Ration Link | आधार कार्ड राशन कार्डला लिंक कसे करायचे?

 या किडीची पिल्ले आणि प्रौढ मादी दोघेही पानाखाली राहुन पानांतील रस शोषून घेतात त्यामुळे पाणी पिवळी पडतात.  पानांच्या कडा खाली पडतात झाडांची वाढ खुंटते तसेच हे किड त्यांच्या शरीरातून पारदर्शक चिकट गोड पदार्थ बाहेर टाकत असतात हा पदार्थ पानावर असतो,  त्यामुळे पाणे चिकट होऊन जातात .

या पदार्थावर काळी बुरशी वाढून कर्भ ग्रहणाची क्रिया मंदावते पर्यायाने उत्पादनात भरपूर घट होते .


* फुल किडे –

सर्व प्रकारच्या किडी मध्ये फुलकिडे ही एक महत्त्वाची कीड आहे कारण प्रत्यक्ष नुकसानीपेक्षा या किडी कीटकापासून होणाऱ्या विषाणूजन्य किडीमुळे जास्त नुकसान होते ही कीड सूक्ष्म म्हणजे सर्वसाधारणपणे एक मिलीमीटर लांबीचे पिवळसर रंगाची असते व ते पानावर दिसून येते या कीटकाच्या जीवनक्रमात अंडी ,पिल्ले ,कोश आणि प्रौढ अवस्था असतात

यांची पिल्ले बाहेर पडण्यास पाच ते दहा दिवस लागतात किल्ले पांढरट पिवळसर असून ते पानांवर आढळतात पिल्ल आठ ते पंधरा दिवस राहते त्यानंतर ते कोषावस्थेत जमिनीत जातात कोषावस्था चार ते सात दिवस राहते तर रोड अवस्थेतून ते बाहेर पडतात.

फुलकिडे यांच्या पासून होणारे नुकसान –

पिल्ले आणि प्रौढ फुलकिडे पानातील रस शोषून घेतात त्यामुळे पाने वाकडी होतात त्याच बरोबर हे कीटक स्पॉटेड बिल्ट किंवा करपा या विषाणूजन्य रोगाचा प्रसार करतात या किडीचा प्रादुर्भाव कोरड्या हवामानात जास्त होत असतो.


* तांबडे कोळी –

वेलवर्गीय पिकामध्ये या किडीमुळे अधिक नुकसान होते या किडीची अंडी गोलाकार व ती 0.1 मिली मीटर आकाराची असतात ते उघड्या डोळ्यांनी कधीच दिसत नाहीत अंड्यातुन बाहेर पडलेली पिल्ले 0.2 मिलिमीटर गोलाकार असुन पांढरट तांबूस असतात त्यानंतर वाढ झालेल्या पिल्ल्यांचा आकार वाढून ते 0.5 मिलिमीटर एवढा होतो.

तांबडी कोळी पासून होणारे नुकसान –

तांबडी कोळी कुठेही पानाच्या खालच्या बाजूस मोठ्या संख्येने आढळते ते पानातील रस शोषून घेतात त्यामुळे पानातील हरितद्रव्य कमी होऊन पाणी पांढरे होतात तसेच हे प्राणी पानावर जाळी तयार करतात

त्यामुळे झाडांची वाढ खुंटते व पर्यायाने उत्पादनात भरपूर घट येते या किडीचा प्रादुर्भाव शक्यतो जानेवारी ते मे या कालावधीमध्ये जास्त असतो जोराच्या पावसामुळे प्रमाण घटून जाते तसेच तापमान कमी झाले की सुद्धा प्रमाण थोडे फार घटते.

* तांबळया कोळीचे व्यवस्थापन कसे करायचे –

Read  शेतकरी आंदोलन-"जनता कर्फ्यु"

नत्रयुक्त खतांचा मर्यादित वापर करावा नांगरणी खोल करावी अनावर रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतात डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 15 मि .ली. 10 लिटर पाण्यात टाकून योग्य मिश्रण करून हात पंपाने फवारणी करावी .

अधून मधून पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करत राहावी कीटकांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फेनपायरोकसीमेट पाच टक्‍के प्रवाही 10 मिली किंवा फेनाकझा क्वीन दहा टक्‍के प्रवाही 20 मिली प्रति लिटर पाण्यात टाकून साध्या पंपाने फवारणी करावी.


* तांबडे व काळे भुंगेरे –

काळे भुंगेरे व तांबडे भुंगेरे सर्व पालेभाज्या पिकाचे नुकसान करतात या कीटकांची अंडी गोलाकार पिवळसर गुलाबी रंगाची असुन अळी भुरकट पांढरी असते . पूर्ण वाढलेली अळी 22 मि.मी. लांब असते.

कोश जमिनीत असतात कोष तांबळे आणि काळसर निळ्या रंगाचे असतात त्यांची लांबी सहा ते आठ मि.मी. असते तिच्या जीवनक्रमात अंडी अळी कोश आणि भुंगेरे अशी अवस्था असते.

तांबडे व काळे भुंगेरे यांच्या पासून होणारे नुकसान –

यांच्यातील मादी भुंगेरे ओल्या जमिनीत पिकाच्या जवळ अंडी घालतात अंड्यातून अळी बाहेर पडल्यावर मुळे खातात त्यामुळे झाडे सोकुन जातात मुळाबरोबर त्यावर हल्ला करतात पानांची चाळणी करतात यामुळे उगवलेली झाडे मरतात अशावेळी झाडांची संख्या कमी होऊन परत लागवड करायची वेळ शेतकऱ्यांवर येते.

या किडीचा प्रादुर्भाव मार्च ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये जास्त होतो विशेषतः पावसाळ्यात अंडी घालण्यासाठी जमीन ओली असते त्यामुळे प्रादुर्भावात अतिशय जोमाने वाढ होते.

भुंगेरे यावर नियंत्रण कसे करायचे –

दहा टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी वेलवर्गीय पालेभाज्या पिकांमध्ये पाने खाणाऱ्या अळीला लिफ मायनर असे संबोधले जाते दुसरी मेलान वर्म पाने व फळे खाणारी अळी
व कटवर्म इत्यादी चार प्रकारच्या महत्वाच्या किडी आढळून वेलवर्गीय पिकांवर येत असतात .


* लीप मायनर –

या किडीची अळी लहान तपकिरी रंगाची पिवळसर असून कोष तांबूस रंगाचा असतो मादी पानावर छिद्र पाडून पांढरी अंडी टाकते अंड्यातून अळी बाहेर पडण्यास एक-दोन दिवस लागतात किडीची वाढ होण्यास पाच ते दहा दिवस लागतात आणि पाण्यातून बाहेर पडून जमिनीत कोषावस्थेत जाते.

Read  MPSC Recruitment 2023 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३

ही कोषावस्था जवळपास दहा ते बारा दिवस राहते अशाप्रकारे किडीचा जीवनक्रम पंधरा ते वीस दिवसात पूर्ण होतो .

लीप मायनर अळीचे नुकसान –

 ही अळी पानाच्या आत मध्ये शिरून आतील भाग खाते त्यामुळे पानांवर नागमोडी वळणाच्या रेषा पडतात.  प्रादुर्भाव जास्त असल्यास पूर्ण पांढरे होते यामुळे पिकाच्या उत्पादनात 30 ते 40 टक्के घट होते याचे दोन ते तीन महिने सोडल्यास किडीचा प्रादुर्भाव आपल्याला वर्षभर दिसून येतो.

लीप मायनर अळीचे नियंत्रण –

अळीचा प्रादुर्भाव दिसून येताच दहा टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा सायपरमेथ्रीन 10% ट्रायझोफॉस 40% दहा लिटर पाण्यामध्ये 15 मि.ली. एवढे प्रमाण घेऊन हातपंपाने गरजेनुसार फवारणी करावी.


* मेलान वर्म –

ही कीड कारले, कलिंगड, खरबूज, काकडी इतर पिकांमध्ये शक्यतो आढळून येते या किळीच्या जीवनक्रमात अंडी अळी कोश आणि पतंग अशा चार अवस्था आहेत यामध्ये पिकास हानिकारक असनारे पतंग पांढरी अंडी पानावर किंवा पानाखाली घालतात अंड्यातून बाहेर पडणारी अळीही फिकट हिरवी असते.

पूर्ण वाढलेली अळी हिरवी असून पाठीवर पांढरे पट्टे असतात तसेच ही अळी पानावर किंवा फळावर शक्यतो दिसून येते किडीचे कोष तपकिरी असून ते पानाखाली सापडतात पतंग पांढरे असून पंखाच्या कडा ह्या काळ्या असतात. व शेपटीला नारंगी गोंडा असतो ही पतंग रात्री कार्यरत असतात.

मेलान व मुळे होणारे नुकसान –

ही पाणे खाते त्यामुळे वेलीवर पाणे शिल्लक राहतच नाहीत त्याचबरोबर ती फळात प्रवेश करून फळाचे नुसकान सुद्धा करते त्यामुळे अशा फळांचा खाण्यासाठी उपयोग होत नाही या किडीचा प्रादुर्भाव ढगाळ परंतु पाऊस नससतांना कोरड्या हवामानात जास्त होतो तसेच उन्हाळ्यातही प्रादुर्भाव दिसून येतो परंतु तापमानात वाढ झाल्यास किडीचे प्रमाण घटते.

मेलान या किडीचे नियंत्रण –

शेतकऱ्यांनी फळातुन अळी काढून नष्ट करावीत किंवा खोल खड्ड्यात टाकून माती टाकून गाडुन घ्यावे पानाखाली असलेले कोष नष्ट करावेत किडीचे प्रमाण पाच टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असेल तर कार्बोसल्फान 25% 20 मि .ली. किंवा ट्रायझोफॉस 40% दहा लिटर पाण्यात 20 मी.ली.साध्या पंपाने फवारणी करावी.

अशा प्रकारे शेतकरी पालेभाज्या व पिकांवर योग्य जैविक आणि रासायनिक व्यवस्थापन करून आपल्या पालेभाज्या पिकात वाढ करू शकतात.

आमचे खालील अन्य लेख सुद्धा वाचा 

शेळीपालन करून मिळवा लाखो रुपये 

रब्बी फळपीक विमा योजना 2020-2021, 2021-2022, नानासाहेब कृषी संजीवनी योजना POCRA

प्रधानमंत्री पिक विमा योजना 2020 ते 2021 व 2022 ते 2023

द्राक्ष बागेतील फळे छाटणी व त्यानंतर करायचे व्यवस्थापन

Leave a Comment