कोरोनामुळे मयताच्या नातेवाईकांना मिळणार 50 हजार रुपयांची मदत Corona Covid 19 Death

Corona Covid 19 Death करुणा मुळे मृत्यू झालेल्या मयताच्या नातेवाईकांना 50 हजार रुपयांची मदत मिळणार अशा प्रकारचा शासन देणार आहे 26 नोव्हेंबर 2021 रोजी काढण्यात आलेला आहे.

या शासन निर्णयाच्या माध्यमातून याची अंमलबजावणी कशी केली जाणार आहे कोणते नियम आणि अटी असणार आहेत. अर्ज प्रक्रिया याबद्दलची संपूर्ण माहिती या लेखामध्ये बघूया.

शासन निर्णय मध्ये म्हटल्याप्रमाणे covid-19 या आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्रदान करणेबाबत.

शासन निर्णय

महाराष्ट्र राज्यात जी व्यक्ती covid-19 या आजारामुळे निधन पावली आहे त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास रुपये पन्नास हजार रुपये इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत निधीमधून प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

हे सानुग्रह सहाय्य देण्याकरता covid-19 मृत्यू प्रकरणे खालील प्रमाणे निर्धारित करण्यात येतील.

1.  RT-PCR / Molecular Test/RAT या चाचण्यांमधून पॉझिटिव अहवाल आलेल्या ज्या व्यक्तीचे अथवा आंतररुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल झालेल्या या व्यक्तीचे Clinical Diagnosis covid-19 असे झाले होते याच व्यक्तीचे प्रकरण covid-19 मृत्यू प्रकरणासाठी कोणी प्रकरण म्हणून समजण्यात येईल.

2.  वरील प्रमाणे समजण्यात येत असलेल्या covid-19 प्रकरणात अशा व्यक्तींचा मृत्यू अशा चाचण्यांच्या दिनांकापासून किंवा रुग्णालयात क्लीनिकल डायगणोसिस च्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत झाला असल्यास त्या व्यक्तीचा मृत्यू क्रोवेड एकोणवीस चा मृत्यू समजण्यात येईल जरी हा मृत्यू रुग्णालयाच्या बाहेर झाला असेल अथवा त्या व्यक्तीने covid-19 चे निधन झाल्यामुळे आत्महत्या केली असेल तरी.

Read  Free Gas Connection Scheme | मोफत गॅस वितरण 16 कोटी मंजूर

3.  Covid-19 चे प्रकरणात जर व्यक्तीचा रुग्णालयांमध्ये दाखल असताना मृत्यू रुग्णालयात झालेला असेल जरी मृत्यू 30 दिवसाच्या नंतर झाला असेल तरी अशा व्यक्तीचा मृत्यू देखील covid-19 चा मृत्यू समजण्यात येईल.

4.  ज्या covid-19 याप्रकरणात व्यक्ती covid-19 पासून बरी झालेली नव्हती अशा प्रकरणातील व्यक्तीचा मृत्यू रूग्णालयात अथवा घरांमध्ये झालेला आहे आणि त्या व्यक्तीचा मृत्यू प्रकरणी जन्म व मृत्यूची नोंदणी अधिनियम 1969 च्या कलम 10 खाली Madical Certificate of Cause of Death (MCCD) हे form 4 व 4A मध्ये नोंदणी प्राधिकारयाला निर्गमित केले आहे अशा व्यक्तीचा मृत्यू covid-19 चा मृत्यू समजण्यात येईल.

5.  Madical Certificate of Cause of Death (MCCD) मध्ये covid-19 मुळे मृत्यू याच प्रमाणे नोंद नसली तरीही वरील 2.1 ते 2.4 मधील अटींची पूर्तता होत असल्यास ती प्रकरणे रुपये पन्नास हजार च्या सानुग्रह हा यासाठी पात्र असतील.

Read  Omicron Variant of Coronavirus in Maharashtra | कोरोना काळात महाराष्ट्रामध्ये काय सुरू काय बंद?

हे सहाय्य मिळण्याकरता covid-19 या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकाने राज्यशासनाने याकरता विकसित केलेल्या वेब पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील यासाठी अर्जदार स्वतः किंवा सेतू केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत CSC – SPV  मधून अर्ज करू शकेल.

हा अर्ज दाखल करताना अर्जदाराने खालील कागदपत्रे किंवा माहिती सादर करणे बंधनकारक राहील.

1) अर्जदाराचा स्वतःचा तपशील आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक

2)अर्जदाराचा स्वतःचा बँक तपशील

3) मृत पावलेल्या व्यक्ती चा तपशील

4) मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 खालील मृत्यू प्रमाणपत्र

5) इतर निकट नातेवाईकांचे नाहरकत असल्चे स्वयंघोषणापत्र.

मृत पावलेल्या व्यक्ती चा आधार तपशील किंवा आधार नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास व सार्वजनिक आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेल्या covid-19 या आजारामुळे मृत्यू पावलेल्या राज्यातील व्यक्तींच्या विद्यांमध्ये उपलब्ध असलेल्या आधार क्रमांकाशी मृत व्यक्तीचा आधार क्रमांक जोडल्यास संगणकीय प्रणालीवर आपोआप स्वीकृत करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

ज्या अर्जदाराकडे मृत व्यक्तीचा आधार तपशील नसेल किंवा हा आधार क्रमांक वरील नमूद डाटाबेस मध्ये उपलब्ध आधार क्रमांकाशी सोडला नाही तर अशा अर्जदाराकडे Madical Certificate of Cause of Death (MCCD) प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास ते तपासणीसाठी संबंधित जिल्हा शल्य चिकित्सक मनपा क्षेत्रातील मुख्य आरोग्य अधिकारी निश्चित करतील अशा वैद्यकीय अधिकाऱ्याकडे संगणकीय प्रणालीवर पाठवण्यात येईल हे वैद्यकीय अधिकारी हे प्रमाणपत्र तपासून त्यात covid-19 हे मृत्यूचे कारण त्यात नमूद असल्यास त्यास संगणकीय प्रणालीवर सहाय्य मिळणेबाबतचा अर्ज स्वीकृत करतील.

Read  PM Kisan Yojana 13 Installment 2022 | पी एम किसान योजना १३ हप्ता २०२२ .

अर्ज स्वीकृत झाल्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या सानुग्रह अनुदान वितरित करण्यासाठी संगणकीय प्रणालीवर अंतिम मंजुरी देण्यात येईल सर्व प्रकरणे संगणकीय प्रणालीवर सर्वसामान्य जनतेला माहिती व सूचना हरकती साठी उपलब्ध राहील त्यानंतर सात दिवसांनी सदर सानुग्रह सहाय्य अर्जदाराच्या बँक खात्यावर थेट डीबीटी जमा करण्यात येईल या दरम्यान मृत व्यक्तीच्या अन्य निकट नातेवाईकास अर्ज केलेल्या निकट नातेवाईक याबाबत काही तक्रार असल्यास संबंधित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडे तक्रार नोंदवण्याची मुभा असेल अशी तक्रार प्राप्त झाल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आवश्यक ती छाननी करून सानुग्रह सहाय्यक कोणत्या निकड नातेवाईकांना देय असतील याबाबतचा अंतिम निर्णय घेतील.

शासन निर्णय बघण्याकरता येथे क्लिक करा

 

 

 

Leave a Comment