Mgnrega Scheme 2022 | मनरेगा योजना अनुदान

Mgnrega Scheme 2022 – शेतकरी मित्रांनो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत चालू वर्ष दोन हजार दहा वीस ते वीस करिता कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या व्हर्मीकंपोस्ट, नाडेप कंपोस्ट, शेततळे, फळबाग / फुलपिके लागवड या घटकांकरता 100% अनुदान पाहिजे असल्यास अर्ज करण्याचे आव्हान कृषी विभागाच्या वतीने करण्यात आल आहे.

मनरेगा चे मागेल त्याला काम देणे व गावांमध्ये आर्थिक समृद्धी आणणे हे उद्दिष्ट आहे. म्हणूनच मनरेगाअंतर्गत  अनुदान मिळण्याकरिता अर्जदारास खालील गोष्टींची आवश्यकता आहे.

अनुदानास कोण पात्र असेल?

अर्जदार हा जॉब कार्ड धारक असावा

Read  Pradhanmantri Jandhan Yojana 2022 | प्रधानमंत्री जनधन योजना २०२२ .

अर्जदार अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जमाती, दारिद्र रेषेखालील इतर कुटुंबे, स्त्री कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे, दिव्यांग व्यक्ती कुटुंबप्रमुख असलेली कुटुंबे, जमीन सुधारणांचे लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना, इतर पारंपारिक वननिवासी या सर्वांना प्राधान्यक्रमाने कृषी कर्ज माफी योजना अल्पभूधारक व सीमांत भूधारक यांना प्राधान्य देण्यात येणार आहे

अर्जदाराची जमीन जास्तीत जास्त 0.05 ते 2 हेक्‍टरपर्यंत असावी.

आवश्यक असणारी कागदपत्रे

आधार कार्ड, सातबारा 8 अ, बँक पासबुक व जॉब कार्ड ही कागदपत्रे आवश्यक असून अर्ज गावातील ग्रामपंचायतीमध्ये करावा.

मिळणारे अनुदान

  • फळबाग / फुल पिके जास्तीत जास्त रक्कम रुपये दोन लाख प्रति हेक्‍टरी याप्रमाणे मिळेल.
  • व्हर्मी कंपोस्ट रक्कम रुपये 11944 प्रति युनिट, नाडेप कंपोस्ट रक्कम रुपये  10537 प्रतियुनिट.
  • शेततळे आकारमानानुसार रक्कम रुपये 60 हजार ते रक्कम रुपये 3 लाख पर्यंत.
Read  Post Office Bharti India Online Form 2023 | पोस्ट ऑफिस भरती इंडिया ओनलाईन फॉर्म २०२३ .

या योजनेमध्ये अंजीर, साग, सुपारी, कडीपत्ता, कडुलिंब, शेवगा, केळी, ड्रॅगन फ्रुट, करवंद, तुती, जट्रोफा, गिरिपुष्प, पानपिंपरी, द्राक्ष, चंदन, आंबा, काजू, चिकू, पेरू, डाळिंब, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, चिंच, सीताफळ, नारळ, आवळा, कवट, बोर, जांभूळ, कोकम, फणस, खाया, निम, चारोली, महोगणी, बाभूळ, अंजन, खैर, ताड, बांबू, शीरीश चीनार, महुआ, गुलमोहर, निलगिरी, शिसव, रबर, सुरू ही फळपिके व वृक्ष अंतर्भूत आहेत.

फुलपीके

मोगरा, निशिगंध, सोनचाफा, गुलाब

अनुदान कसे मिळेल?

या योजनेचे अनुदान लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यांमध्ये जमा करण्यात येते अधिक माहिती करता जवळच्या कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी आपण संपर्क साधावा.

अनुदानामध्ये अंतर्भूत असलेल्या बाबी

खड्डे तयार करणे, कांड्या किंवा कलमांची बिले,  नांगी भरणे, खते देणे, जमीन तयार करणे, आंतर मशागत करणे, पीक संरक्षण व पाणी देणे. Mgnrega Scheme 2022 ही पोस्ट आपल्याला कशी वाटली नक्की कमेंट करा

Read  Ration Card Aadhar link Update | राशन कार्ड आधार कार्डला लिंक कसे करावे?

आमच्या बातमी मराठी या ब्लॉगला सुद्धा अवश्य भेट द्या.

 

 

 

 

Leave a Comment