Aadhar Card Franchise आपण जर एखाद्या नवीन व्यवसायाच्या शोधात असाल आणि आपण तसा विचार करत असाल तर आपल्याला घरबसल्या लाखो रुपयांची कमाई करून देणारा आणि अत्यंत कमी भांडवलाची गरज असणारा व्यवसाय सुरू करता येणार आहे तो व्यवसाय आहे आधार कार्ड फ्रॅंचाईझीचा Aadhar Card Franchise तुम्ही आधार कार्डची फ्रॅंचाईजी विनामूल्य घेऊ शकता. परंतु त्याकरता तुम्हाला लायसन्स म्हणजे परवाना घ्यावा लागेल. त्याकरता तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागेल ती उत्तीर्ण होऊन सर्व प्रक्रिया पार पाडावी लागेल.
Aadhar Card Franchise आधार कार्ड केंद्र
Table of Contents
यूआयडीएआय UIDAI प्रमाणपत्रासाठी तुम्हाला यूआयडीएआय तर्फे ऑनलाइन परीक्षा द्यावी लागणार आहे. यामध्ये तुम्ही पास झाल्यानंतर तुम्हाला आधार नोंदणी आणि बायोमेट्रिक पडताळणी करावी लागेल त्यानंतर तुम्ही फ्रॅंचाईजी घेऊ शकता मान्यताप्राप्त केंद्रामध्ये देखील तुम्ही त्याचे रूपांतर करू शकता त्याकरता तुम्हाला कॉमन सर्विस सेंटर ची नोंदणी करावी लागेल ज्यास आपण सीएससी केंद्र CSC Centre सुद्धा म्हणतो.
आधार कार्ड केंद्राची कार्य
1. आधार कार्ड बनविणे
2. ग्राहकांच्या आधार कार्ड वरील नावातील स्पेलिंग चुकले असेल तर ते दुरुस्त करून घेणे.
3. आधार कार्ड वरील पत्ता चुकला असेल किंवा पत्ता बदलायचा असेल तर तो दुरुस्त करणे.
4. आधार कार्ड वरील जन्मतारीख चुकीचे असेल तर तीसुद्धा दुरुस्त करणे.
5. फोटो खराब असेल किंवा स्पष्ट नसेल तर तो बदलणे.
6. आधार कार्डशी मोबाईल नंबर अपडेट करणे.
7. ई-मेल आयडी अपडेट करणे.
तुम्हाला आधार कार्ड सेंटर उघडण्या करिता आधी ऑनलाइन परवान्यासाठी अर्ज करावा लागेल त्यानंतर तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना हा परवाना मिळत असतो.
परवान्या करता अर्ज कसा करायचा?
1. सर्वात पहिल्यांदा आपल्याला एन एस ई आय टी NSEIT च्या वेबसाईटवर जावे लागेल. https://uidai.nseitexams.com/UIDAI/LoginAction_input.action
2. तिथे गेल्यानंतर तुम्हाला Create New User यावर क्लिक करायचे आहे
3. आता XML फाईल उघडेल.
4. येथे तुम्हाला Share Code enter टाकण्यास सांगितले जाईल.
5. एक्स एम एल फाईल आणि शेअर कोर्ट साठी आपण आधारच्या वेबसाईटला https://resident.uidai.gov.in/offine-kyc भेट देऊन ऑफलाईन आधार डाऊनलोड करू शकता.
6. तुम्हाला एक चॅनेल फाईल आणि शेअर कोड दोन्ही सुद्धा डाउनलोड केले जातील वर सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी त्याचा वापर करावा लागेल.
7. यापुढे आणखी एक फॉर्म येईल त्यामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती द्यावी लागेल.
8. हा फॉर्म भरून सबमिट केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी यावर युजर आयडी आणि पासवर्ड येईल.
9. त्यानंतर तुम्हाला आधार टेस्टिंग अँड सर्टिफिकेशन पोर्टल वर लॉग इन करता येईल.
10. नंतर तुम्ही कंटिन्यू बटन वर क्लिक करायचे आहे.
11. त्यानंतर आणखी एक फोन येईल त्यामध्ये विचारलेल्या प्रश्नांची योग्य रित्या माहिती भरावी लागेल.
12. हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो आणि सही अपलोड करावी लागेल
13. त्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू चे ऑप्शन मिळेल यामध्ये आपण फॉर्ममध्ये दिलेली सर्व माहिती बरोबर आहे किंवा नाही हे आपल्याला खात्री करून घ्यायचा आहे.
14. यानंतर तुम्हाला डिक्लेरेशन बॉक्स यावर क्लिक करून proceed to submit form करण्यासाठी क्लिक करायचे आहे.
पेमेंट कसे करायचे?
वरील सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर आपल्याला पेमेंट करावे लागेल पेमेंट केल्यानंतर साईटच्या मेनूवर आपल्याला जावे लागेल आणि पेमेंट वर क्लिक करावे लागेल आता आपले बँक खाते निवडावे लागेल त्यानंतर please click here to generate receipt यावर क्लिक करा आणि तिथून तुम्हाला चलनाची पावती डाऊनलोड करून ती प्रिंट करावी लागेल.
केंद्र कसे बुक करावे?Aadhar Card Franchise
सर्व माहिती भरुन झाल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे त्यानंतर 24 ते 36 तासानंतर वेबसाईटवर परत लॉगिन करून पहावे त्यानंतर ब्लॉक सेंटर वर क्लिक करून इथे आपल्याजवळचे कोणतेही केंद्र निवडायचे आहे तुम्हाला या केंद्रावर आधार परीक्षा द्यावी लागेल. तारीख आणि वेळ निवडावी लागेल आणि फॉर्म सबमिट करावा लागेल. त्यानंतर थोड्या वेळाने तुम्हाला प्रवेश पत्र मिळेल हे प्रवेश पत्र डाऊनलोड करून प्रिंट करून घ्यावे.
तुम्हाला आमचा आधार फ्रेंचायझी कशी घ्यावी?Aadhar Card Franchise हा लेख कसा वाटला नक्की सांगा आणि हो आमच्या योगा टिप्स Yoga tips आणि आई मराठी Aai Marathi या ब्लॉगला अवश्य भेट द्या