भारत हा शेतीप्रधान देश असून यातील खूप शेतकरी बांधव हे शेळी पालन करतात यातून चांगला नफाही होतो व शेतकऱ्यांना आर्थिक मदतही होते आपल्या राज्यामध्ये शेळी पालन मोठ्या प्रमाणावर होते तर याच व्यवसायाला वाढवण्यासाठी राष्ट्रीय पशुधन अभियाना अंतर्गत ग्रामीण परसबाग शेळी विकास योजना सरकार घेऊन आले आहे याला अहिल्या शेळी योजना 2022 असेही नाव आहे .
विहीर अनुदान योजना महाराष्ट्र २०२३
या योजनेअंतर्गत आपल्याला दहा शेळी व एक बोकड असे अनुदान मिळणार आहे . या योजनेसाठी 18 ते 60 वर्षांमधील दारिद्र्यरेषेखालील , अल्पभूधारक, अनुसूचित जाती / जमाती अशा लाभार्थ्यांकडून अर्ज मागविल्या जात आहे
या योजनेमध्ये महिलांना खास प्राधान्य आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे
या योजनेची काही वैशिष्ट्ये ही आहे ते आपण जाणून घेऊया .